पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २६४) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. दुसऱ्यास माहित नव्हतें यामुळे तफावत पडली आहे परंतु ही सगळी गोष्ट अगदर्दी असमंजस पणाची आहे. सोमल आणि पाणी त्या कुपीत घालून हलवि तां येणे शक्य नव्हतें. महाराज, जर आपल्या मनांत असे येईल की त्या कुपीविषयीं- हकीकत लटकी पडली आहे तर तिच्या बरोबर दुसरीही गोष्ट ढंगडी पडली. मी जर माझ्या विद्वान मित्रांस विचारोन की शिशीच्या उपकथेविषयीं तुमच्या ध्यानास काय येतें तर त्यांच्याने असा कांहीं आग्रह धरवणार नाहीं कीं दोन कुप्या होत्या. जर तसे असेल तर त्या अत्तराच्या कुपीचें मग काय झाले ? त्याचें झणणे असे आहे काय कीं रावजीने दुसरी कुपी मिळविली होती ? जर, ते तसें ह्मणतील तर रावजी यानें दामोदरपंत याजपासून कुपी निळविली झणून सांगितले आहे त्याचे काय होईल? मी कमिशनास असे विचारतों की कर्नल फेर यांस इजा करण्यासाठी जी वस्तू दिली होती तिचा उपयोग केला नाहीं या रावजीच्या झणण्य विषयीं आपल्या मनांत काय विचार येत आहे? साहेब यांस इजा होईल ह्मणून मी तिचा उपयोग केला नाही हा त्याचा खुलासा मनस्तोषकर नाहीं का? दामोदरपंत याच्या मनांत खून करण्याचा होता पण क- र्नल फेर यांच्या चाकरांच्या मनांत नव्हता है मीं शनवारच्या भाषणांत सांगितले आ- हे तें समर्पक नाहीं कां ? कमिशनचा जर असाच सिद्धांत होईल तर मला फार आनंद होईल कारण जरी ते लोक खोटी शपथ खाऊ आणि मात्रागमनी आहेत तरी कर्नल फेर यांचा प्राण घ्यावा असा त्यांचा उद्देश नव्हता. रावजी यास ही कुपी कोणते वेळेस मिळाली त्या काळाकडेसही आपण लक्ष दिले पाहिजे. रावजी ह्मणतो कीं कर्नल फेर यांच्या कपाळावर गळं झालें होते तेव्हां ती मला मिळाली आणि त्यावेळेस नरसु जवळ होता. कुत्रीच्या प्राप्तीविषयी नरसु रावजीच्या हकी- कतीस पुष्टी देतो. कर्नल फेर यांस विषप्रयोगाचा प्रयत्न झाला त्यापूर्वी तीन किंवा चार दिवस अगोदर ती कुपी रावजीस मिळाली असे ह्मणतो. बुसरी एक गोष्ट लक्षांत ठेवण्यासारखी आहे कीं रावजी याने सूटरसाहेबांस जबानी दिली त्यांत या कुपीविषयीं एक शब्द नाही. दामोदरपंत यानें कुपीविषयीं सांगितल्यावर रावजीने त्याबद्दल हकीकत सांगितली. अध्यक्ष-मला असें स्मरतें कीं कुपी दिल्याच्या काळाविषयीं नरसु आणि रावजी याच्या सांगण्यांत तफावत आहे. आडव्होकेट जनरल - रावजी यानें आपल्या जबानींत लहान कुपीविषयीं सांगितलें आहे व तो असें ह्मणाला “ मी तें एका लहान कुपींत हलविलें आणि नंतर त्यांत ओतलें ". सारजन्ट बालंन्टाईन-परंतु त्यानें असें कधीं सांगितलें नाहीं कीं विषानें भरले, ली कुपी मला दिली होती किंवा दामोदरपंतापासून मिळाली होती. तो एवढेंच झ णतो कीं मला एक कुपी मिळाली होती परंतु विषाच्या दुसऱ्या कुपीविषयीं तो कांहीं सांगत नाहीं. ज्या कुपीविषयीं मी वर्णन केलें आहे तिचाच त्यानें विषप्रयोग कर- ण्यांत उपयोग केला ही गोष्ट त्याच्याच साक्षीवरून शाबीत झाली आहे. आणि ती