पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सारजंट बालंटाईनचें भाषण. (२६३) ण्याचा इरादा केला होता त्याबद्दल त्यास आपण हरामजादा समजा की त्याचे पा हिजेल तें करा, पण माझ्या मनाची कोणत्याही रीतीनें अशी खातरजमा होत नाहीं कीं कर्नल फेर यांचे चाकर अशा प्रकारच्या विचारपूर्वक कृत्यामध्ये वांटेकरी होते. मी असें झणत नाहीं की ते वांटकरी नाहीत पण ते वांटेकरी होते असे माझे मन मला साक्ष देत नाहीं. रावजीची हकीगत आणि ह्या कुपीचा वृत्तांत ह्याविषयी विचार करणे फार महत्वाचे आहे. ही अत्तराची कुपी रावजीच्या हातांत आली पण ती केव्हां आली हा काल निर्णय करणे फार कठीण आहे. रावजी तारीख ९ नोव्हेंबरच्या सुमारास ती कुपी आपल्या हातांत आली असे सांगतों, परंतु भीं जी काल कल्पना केली होती त्यापूर्वी ती त्याच्या हातांत आली असे मला कळविण्यांत आले आहे; तेव्हां आक्टोबर महिन्यांपूर्वी ती त्यास मिळाली असें ठरतें. ती त्याचें हातात आल्यावर पुष्कळ मोठी झाली हे मी पूर्वी सांगितलेंच आहे. आतां हा प्रश्न आहे कीं, तिचा उपयोग त्यास करावयाचा होता तो कसा? त्याची अशी समजूत झाली होती की त्याने तिच्यांतील पदार्थ कर्नल फेर याच्या स्नान कुंडांत टाकावा आणि त्यासाठी ती त्यास दिली होती. दामोदरपंत याच्या सांगण्यावरून त्या कुपतील मिश्रीत पदार्थ काय होता है आपणास समजले आहे आणि रावजीने तिचें काय केलें हेही आपणास कळले आहे. त्यानें ती आपल्या इजारीमध्ये किंवा दुसऱ्या ए खाद्या चमत्कारिक ठिकाण ठेविली होती, आणि तिजपासून त्याच्या जठरावर एक फोड झाला आणि मग त्याच्या ध्यानांत आले की, जर तिचा उपयोग कर्नल फेर यांजवर कोणत्याही रीतीने केला तर साहेबास इजा होईल. ती कुपी कर्नल फेर यांचा नाश करण्याकरता दिली होती पण रावजी यास तिचा प्रादुर्भाव पाहून घेरी आळी आणि कर्नल फेर यांचा प्राणनाश करण्याचा त्यानें पत्कर घेतला होता अ से असतां व त्यासाठींच ती त्यांस दिली असता त्याने निश्चय केला कीं, तिचा उपयोग करावयाचा नाहीं, आणि त्या कुपींतील द्रव्य फेंकून दिलें. तथापि त्यानें तो रिकामी कुपी आपल्या जवळ ठेविली आणि त्याच्या सांगितल्याप्रमाणें सोमळ किंवा जो कांहीं तो पदार्थ असेल तो ज्याच्या शेवटच्या विष प्रयोगांत उपयोग केला असे झणतात तो तींत घातळा. त्याळा असे सांगितलें होते की ती वस्तू तूं एका कुपित घालून तींत पाणी घाळ आणि हळवून मग सरबतांत ओत त्याप्रमाणे करण्यांत त्या कुपीचा मी शेवटीं उपयोग केला असे तो झणतो. आतां याविषयी विचार करतांना पाहिल्याने ही गोष्ट मनांत येतें की अर्ध्या बोटा इतक्या लांब कुपीमध्यें सोमल किंवा दुसरे काहीं विष हैं आणि पाणी किती मावळे असेल, आणि तींत विष आणि जल हैं दोन पदार्थ घालून ते हळवितां कसें आ ? त्या कुपी खेरीज दुसरी कुपी उपयोगांत आ. ते णली होती असे कांहीं निमित्तदेखील सांगितलें नाहीं. खरोखर या कुपीविषयीं चा वृतांत अगदी थोतांडाचा आहे आणि या शीशीच्या परीमाणाविषयीं रावजी आणि दामोदरपंत यांच्या सांगण्यांत तफावत आहे. कारण एकानें काय सांगितलें तें त्यानें