पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २६२ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. बद्दल कांहीं प्रमाण नाहीं; झणजे ज्या खाणींतून ह्या वस्तू प्राप्त झाल्या म्हणून सांग- ण्यांत आले आहे व ज्यावर या मोकदम्याचा मूळ पाया रचळा आहे त्या खाणीचाच मुळी कोठे पत्ता नाहीं; व दामोदरपंत याच्या पुराव्या स्खेरीज दुसरें कांहीं विश्वासार्ह प्रमाणच नाहीं. आतां दामोदरपंताच्या संबंधाने विचार कर- तां तो आरंभापासून शेवट पर्यंत खोटेच बोलत आहे असे दिसून आले असून, विषप्रयोगाचा मुख्य कर्ता तोच असावा असी माझी मन देवता मळा सांगते. साक्षीच्या पिंजऱ्यांत मी त्याला पाहिले तेव्हां त्याच्या चर्येवरूनच तो कोणते प्रकारचा मनुष्य आहे हें- मला समजलें. त्याची मुद्रा क्रोध मुद्रित आणि दुर्मुखलेली आहे कोणतीही सोदी गिरी करण्यास तो मागें सरणारा मनुष्य नाहीं. ज्या रीतीने त्याने प्रश्नांची उत्तरे दिलीं त्याव- रून कोणतेही अघोर कर्म करण्याची त्यांच्यामध्ये शक्ति आहे असे मला दिसून- आले आहे. कर्नल फेर यांस त्याचेविषयी संशय सप्तन्न झाला होता. त्यांच्या बंगल्याच्या आवारांत पाऊल ठेवण्याची त्याची मगदुर नव्हती. आणि स्वतः त्यानें आपल्या धन्याच्या. द्रव्याचा अपहार केला होता, आणि त्याच्या वह्यांचा कधी तरी तपास केला जाईल अर्से त्यांस भय होते. त्यावरून विषप्रयोगाच्या पातकाचा मुख्यकर्ता बहुत करून तो असावा अशी माझी खातरजमा होते, आणि जर त्यानेच हे पातक केळ व रावजी आणि नरसु आपले साह्यास घेतले तर मी सत्यस्मरून आपल्यास पदर पसरून मागणे मागतों कीं, त्या दुर्देवी राजांस त्यांवर अगदी निर्बळ प्रमाणांवरून जे आरोप ठेविले आहेत त्यांतून मुक्त करावे; आणि महाराजांनी आपण अगदीं निरपराधी आहों असे आपल्यास प्रतिज्ञापूर्वक सांगितले असून या न्याय सभेच्या अधिका-यांच्या न्यायबुद्धीवर पूर्ण विश्वास ठेऊन ते निश्चित झाले आहेत. महाराज, मी दामोदर पंताच्या पुराव्या विषयीं विवेचन केले आहे आणि जरी त्यास येथें सर्वांच्या शेवटीं आणिले होते तरी मी त्यास सर्व गोष्टीचा मूळ उत्पादक असे मानितों. या मोकदम्यांत नरसू आणि रावजी हे दोन बरेच महत्वाचे साक्षी आहेत. रावजीच्या पुराव्याविषयों मी हली विस्तारपूर्वक सांगण्यास इच्छित नाहीं, पा मोकदम्यांत एक किंवा दोन उपकथा आहेत आणि त्या या मोकदम्यांतील सर्व गोष्टींच्या द्योतक आहेत. यासाठी त्यांच्या मुळापासून क्रम धरून चालणे फार सुगम पडेल. मीं आपल्यास पूर्वी या कुपीविषयीं दर्शवून ठेविलेंच आहे. रावजीच्या बोटाच्या परीमाणाची ती कुपी ( गुलाबीअत्तराची कुपी ) होती आणि तिजमध्ये फार च थोडे द्रव्य राहण्याचा संभव होता. या कुपीत कोणत्याही रीतीनें कांहीं फेरबदल झाली असे आपणास सांगण्यांत आले नाही, तथापि रावजीच्या हातांत ती परीमाणा- नें पुष्कळ वाढली. कमिशनास स्मरत असेल की मी टिका करतांना कर्नल फेर यांस विषप्रयोग करण्याचा त्यांच्या चाकरांचा कांहीं उद्देश होता की काय, यावि षयीं माझे मनांत जो संशय शिरला होता त्याविषयीं मी माझा विचार प्रदर्शित केला आहे. दामोदरपंत याच्या पुराव्यावर मीं टिका केली आहे आणि त्यास आपले हवा- ली केला आहे; त्यानें आपण होऊन कबूल केले आहे की, मी कर्नल फेर यांस मार-