पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सारजंट बालंटाईनचें भाषण. (२६१) ●टाकावयाची आहे असें नानाजी विठ्ठल बोलले त्यावरून हेमचंद याच्या साक्षीच खरेंपणा सिद्ध होतो आणि हिरे मुळींच खरेदी घेतले नाहीत हे खरे ठरते. ही गोष्ट माझे लक्षांत वसत आहे कीं, हेमचंद याने मला हिंदुस्थानी भाषा सम- जत नाहीं असें कोर्टात सांगितले तेव्हां त्याच्या मनाची स्थीति चांगली नव्हती. असे त्यानें झटळें हा त्याचा असंमजसपणा होता; परंतु हें ही खरें आहे की, हेमचं- द यांस हिंदुस्थानी भाषा चांगली येत नाहीं, आणि गजानन याच्या हकीगतीव- रूनही त्यास बळकटी येते; त्याची जबानी कांहीं हिंदुस्थानीत आणि कांहीं गुजरा थींत घेतली आहे तेव्हा मला हिंदुस्थानी भाषा समजत नाहीं हे त्याचें ह्मणणें योग्य होते. जेव्हां तो असे झणाला कीं, तें काय आहे हे मला माहित नाहीं तेव्हां त्याचें मन अगदी घोंटाळ्यांत पडले होते आणि पोलिसांची त्यास इतकी जबर धास्ती ब- सली होती की, जेव्हां तो साक्षीदाराच्या पिंजप्यांत उभा होता तेव्हां वेळों वेळीं त्यास असा भास होत होता की, मी पोलिसांच्या पंजात आहे की काय, आणि झणून प्रत्येक शब्द उच्चारण्यास तो भीत होता. ज्या लोकांनी कोर्टा पुढे साक्षी दिल्या आहेत आणि ज्यांच्या साक्षीवर माझा पूर्ण विश्वास आहे त्यांवर कोर्टानी किती वजन द्यावें यावि- षयीं विनंति करण्याचें माझें कर्तव्यकर्म आहे, हेमचंब याने साक्षी देतांना कांहीं चू- क केली असेल परंतु कर्नल फेर यांच्या साक्षीकडे आपण लक्ष द्याल तेव्हां हेमचंद याच्या चुकीबद्दल आपल्यास कांहीं विशेष वाटणार नाहीं. कर्नल फेर यांचे मनांत खोटा मजकूर सांगावयाचा नव्हतां असे मी गृहीत करतों, परंतु त्यांच्या सारख्या विद्वान गृहस्थाची देखील कोर्टापुढे साक्ष देतांना वेधा ठडाली आणि त्यांनी ज्या चुका केल्या त्या त्यांस मग सुधाराव्या लागल्या तर त्या बापड्या भयत्वस्त हेमचंदाची बिशाद काय. माझी खा तरजमा आहे की आपण दोन्ही साक्षीदारांच्या चुका समान दृष्टीने पहाल. हेमचंद यानें सत्यापासून घ्युत व्हावे या बुद्धीने चुका केल्या असा त्याजवर दोष ठेवणार नाहीत. आतां या मोकदम्यांतील या प्रकर्णावर मळा कांहीं विशेष बाळावयाचें नाहीं आपल्यास इतकेच दर्शवून ठेवावयाचें आहे की, नानाजी विठ्ठल यानें दामोदरपंत यांस हिप्याच्या दोन पुड्या दिल्या होत्या त्यात एक हिन्याच्या भुकीची व दुसरी हिरकण्याची असे फिर्यादीतर्फे सांगण्यांत आलें आहे; आणि नानाजी स्वतः असें ह्मणतो कीं, हिप्याची मुकी झणजे काय हे मला माहित नाही, आणि हिरकण्याची पुडी मी कधीं दामोदरपंत यास दिली नाहीं. मी तर त्यास हिरे दिले होते. आणखी असा पुरावा केला आहे कीं महाराजांच्या जामदारखान्यांत हिरक- ण्या आणि लहान हिरे प्रचूर होते त्यांचा उपयोग करण्याची महाराजांस सत्ता होती, आणि ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस त्यांस एका शब्दा बरोबर मिळावयासारखे होते, व महाराजांजवळ देखील पुष्कळ हिरें होतें; आपल्यास निरनिराळ्या साक्षीदारावरून या मोकदम्यांतील प्रत्येक मुद्याविषयीं निवाडा करावयाचा आहे. सोमल नुरुद्दीन बोहल्यापासून मिळाला है शाबीत झाले नाही. त्याने ज्यापासून सोमल खरेदी घेतला म्हणून म्हटले आहे त्याच्या वह्या पुराव्यांत आणिल्या नाहीत. हिरे खरेदी केल्या.