पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २६०) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. घ्या मर्जीप्रमाणे मला लिहून देणे भाग पडलें. हियाच्या किमतीबद्दल पैका दिला असे दिसून येऊं नये ह्मणून वह्यांतील जमाखर्चाची फिरवाफिरव केल्याविषयीं ह्मण- ण्यांत आले आहे; पण नानाजी विठ्ठल यांस पुण्यांतील सावकाराकडून हेमचंद यामें माळ देवविला होता त्याबद्दल नानाजी विठ्ठल यांजकडून ऐवज मिळाला होता तो हेमचंद याच्या वह्यांत जमा झालेला आहे. तो व्यवहार झाला होता है हुड्यांवरून शाबीत असून त्यासंबंधानें हेमचंद याचे चोपड्यांतील जमाखर्च खरा आहे. आणि त्या हुंड्या गजानन विठ्ठल यांच्या खिशांत असतां मीं हटकुन विचारलें तोपर्यंत त्या संबंधानें तो काही बोलला नाहीं. हिऱ्याच्या किमतीचा ऐवज छपविण्यासाठीं वह्यांत कांहीं फेरबदल झाली नाही. मला येथें सां- गितलें पाहिजे कीं खरोखर ही गोष्ट मयंकर आहे. पोलिसाने पाहिजे या मनुष्यास त्याच्या घराहून ओढून आणावें, त्यास दटावून कैदेत टाकावें, शासनाचें भय घालावें, आणि पोलिसांस अनकूळ असेल तशी गोष्ट सांगण्यास तयार झाला असतां त्याची सुटका करण्याचें त्यास अभिषचन द्यावें. चीफ जस्टिस महाराज, या स्थितीच्या वाईटपणाबद्दल आतां मी ज्यास्त बोलण्यास इच्छीत नाहीं; जेव्हां हो गोष्ट पाहिल्याने माझे मनांत आली तेव्हां भी फार साशंक होतो कांहीवेळ पर्यंत मला या गोष्टीविषयीं मोठा संशय उत्पन्न झाला. माझ्या मताविषयी माझीच खातरजमा होईना, माझ्या समजुतीविषयींच मला शंका उत्पन्न झाली. आणि जोपर्यंत मी ते सर्व दस्तऐवज लक्षपूर्वक अवलोकन केले नव्हते व अजूबाजूच्या गोष्टी ध्यानांत घेतल्या नव्हत्या तोपर्यंत माझ्या बोधाविषयीं माझीच खात्री नव्हती. परंतु या संबंधानें पोक्त विचार केल्यावरून माझी जी समजूत झाली ती जर खरी आहे, आणि आपल्या मनाचा तसाच ग्रह होईल तर हा सर्व मोकदमा नखशीखांत अग. दीं कुचका झाला आहे. आणि विचारी मनुष्यापुढें ज्याचा कधीही टिकाव लागणा- र नाही अशा प्रकारच्या लबाड्यांनी आणि बनावट कागदांनी हा मुकदमा व्यापून टाकला आहे. ज्याच्या अब्रुला कांहीं कलंक लागला नाहीं असा हेमचंद जव्हेरीही आपल्यासमोर आहे आणि तो गजानन विठ्ठलही आपल्यासमोर आहे व त्याची चा- ● कशी आहे हे आपल्यास माहित आहे; मी आपल्यास असे विचारतों कीं या दो- घांत विश्वासाला अधिक पात्र कोण आहे ? हिरे खरेदीकरण्याचे कामांत दामोदर- पंत आणि हेमचंद यांच्यामध्ये नानाजी विठ्ठल हा मध्यस्त आहे; त्याने पहिल्याने जी जबानी दिली ती कोर्टापुढे कबूल केली आहे हिन्याची एक पुढी खरेदी घेतली आणि त्याचे किमतीबद्दल तिन हजार रुपये हेमचंद पास दिले असें तो झणतो, परंतु हे त्याचें झणणे अगदीं खोटें आहे. नानाजी विठ्ठल याच्या हाताखालचा का- रकून आत्माराम रघुनाथ यास कोर्टापुढे आणिले होते त्याने अशी साक्ष दिली आ हे कीं नानाजी मला ह्मणाला कीं, मी ही यादी परत घेऊन जातों कारण हिरे कांहीं खरेदी करावयाचें नाहीत; हे त्याचें म्हणणें हिऱ्याच्या दुसऱ्या पुढीविषयीं आहे आणि तो स्पष्ट ह्मणतो की हिरे खरेदी घ्यावयाचे नाहीत सबब त्याबद्दलची यादी फाडून