पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सारजंट बालंटाईनचें भाषण.. (२५९)

या निष्पक्षपाताने आणि अत्युत्तम पवित्र बुद्धीने विचार होईल. माझे विचार स्पष्टपणें लक्षांत पावें. यासाठी माझ्यानें जितका प्रयत्न करवळा तितका केला आहे आणि माझे विद्वान मित्र ऑॉडव्होकेट जनरल त्याचें उत्तर देण्यास समर्थ होतील असें. मीं जाणून तसे केले आहे. त्यांजकडे या देशांतील मोठ्या अधिकारांपैकी एक. अधिकार आहे. यास ते योग्य आहेत; त्यांचे बुद्धीपाटव मला माहीत आहे आणि विषयावर विवेचन करण्यास. ते समर्थ, आहेत, आणखी मला हैं. पण माहीत आहे कीं, ते आपल्या हुद्याच्या कर्त व्य कर्माकडे लक्ष घेऊन वाजवी न्याय व्हावा, यास्तव में कांहीं करणें उचित आहे तेष ते करतील ते येथें कोणी कडून तरी राजाला पदच्यूत करावे म्हणून आले. नाहीत. व त्यांस जितकी न्यायाची गरज आहे तितकी पोकळ यशाची नाहीं. या मुकदम्याचा न्याय कसा काय होतो हे पहाण्याकडे हिंदुस्थानांतील सर्व लोकांचें लक्ष ढागून राहिले आहे. आणि त्यांत युरोपांतीळ आत मोठ्या मनाचे व अतिशय मु द्धिमान लोकांचे या गोष्टीकडें लक्ष लागेल. आतां दामोदरपंताचा पुरावा बळकट. करण्याकरितां जे साक्षी आणिले होते त्यांपैकी हेमचंद फत्तेचंद हा एक आहे. त्या दुर्दैवी मनुष्यास जेव्हां साक्षीच्या पिंजऱ्यांत उभे केर्ले तेव्हां त्याची मुखभी किती म्लान झाली होती ते आपल्या लक्षांतून गेलें नसेल. अगदी भयानें गर्भगळीत झा.. लेला आणि तोडांवर वैवर्ण्य आलेले असा मनुष्य कोटीपुढे साक्ष देण्यासाठी आले- ला माझे पाहण्यांत नव्हता. त्याने सुटर साहेब यांस जवानी दिली होती आणि आतां ती जबानी खोटी आहे असे सांगण्यासाठी तो कोटीपुढे आला होता. त्याला, मिती घातल्यामुळे त्याने सुटर साहेब यांस खोटी जबानी दिली होती. इतर साक्षी- दाराविषयों जें कांहीं पोलिसांनी केलें तेंच यासाठी केले होते आणि पोलिसांच्या, मताप्रमाणे साक्ष देण्यास तो कबूल झाला तोपर्यंत त्यास कैदेत ठेविले होते आणि दुसरे पोलिसांनी त्याच्या वह्यांत फेरफार करणे त्यांस भाग पाडळे होते. स्टरसाहेब यांजपुढे व्यास जबानी देण्याकरितां ने तेव्हा त्यांस पोलिसांनी इषारा केला होता की, तूं जे कांहीं पूर्वी कबुल केले आहेस तें जर तूं खरें करून देणार नाहींस तर तुला परत तुरूंगांत जावे लागेल यामुळे त्यास सुटर साहेब यांपुढे खोटी हकीकत लि. हून देणे भाग पडलें. नानाजी विठ्ठल यानें त्याजपासून हिरे खरेदी घेतले व त्याबद्दल यांस तिन हजार रुपये दिले. ती रकम त्यास कसरीचा ऐवज शिलक होता त्यांतून दिली असतां ब्राह्मणभोजनाकरितां हो रकम दिली असा खोटा खर्च लिहिला. त्यास हिन्याच्या कि. मतीबद्दल ऐवज दिला तो समजण्यांत येऊ नये ह्मणून खोटा खर्च लिहिला व त्यास हिन्याच्या किमतीबद्दल रुपये दिले असतां त्याच्या वह्या फिरवून खेमचंद खुशालचंद याचें नांवें ती रकम जमा करविली. इतक्या गोष्टी शाबीत करण्यासाठी सरकार तर्फे हेमचंद यास साक्ष देण्याकरितां आणिला होता; परंतु त्याने तर कोर्टापुढे अशी साक्ष दिली की, गायकवाडांस मों मुळींच हिरे खरेदी दिले नाहीत आणि सुटरसा- हेब यांजपुढें जी जबानी दिली ती खोटी आहे; मळा पोलिसानें भय घातल्यामुळे त्यां