पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( ३२ )

मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास.

करितां आला असता हे कबूल आहे, परंतु त्यांनी जे द्रव्य खर्च केले तें सर्व त्यांच्या प्रजे- च्या कामी लागले असे म्हटले तरी चालेल. त्यांच्या खर्चाची प्रत्येक बाबत पाहिली असत तिचा प्रत्यक्ष व परंपरेने रयतेच्या हिताशी संबंध नाही, अशी एक देखील बाब नाही. मकरपुरा येथे त्यांनी चाळीस लक्ष रुपये खर्च करून भव्य इमारती बांधिल्या. त्या इमारती- साठी परदेशांतून जो काही माल आणावा लागला तो खेरीजकरून बाकीचा सर्व माल त्यांच्या प्रजेचा होता, व एकंदर मजुरीचा पैसा त्यांच्या रयतेच्या घरांत गेला, व मक्तेदारांनी जो नफा मिळविला तोही त्यांच्याच राज्यांत राहिला. आतां प्रमाणे हजारों रुपये दरमहाचे युरोपियन इंजिनियर चाकरीस ठेवून व परदेशांतील लोकांस मक्ते देऊन त्यांनी आपल्या राज्यांतील पैसा युरोपांत व इतर देशांत घालविला नाहीं. मल्हारराव महाराज यानी नजर बागेत जो बंगला तयार करविला आह तें काम फार सुंदर झाले आहे असे म्हणतात. ते काम सर्व बडोद्यांतील शिल्पशास्त्र जाणत्या लोकांनी तयार केले असतां आतां राजे सर टी. माधवराव यांस युरोपियन शिल्पशास्त्राचीच कां गरज लागली ते समजत नाहीं.

खंडेराव महाराज यानीं मोठमोठ्या देणग्या देण्यांत लाखो रुपये खर्च केले, तो पैसाही

बडोद्याच्या प्रजेच्याच घरांत आला. पैसा संवत १९२०-२१चे सालांत गुजराथेमध्ये इतकी महागाई झाली होती की, खंडेराव महाराजांसारखा उदार राजा, व गोविंदराव रोडे यांजसारखा सदय दिवाण, हे जर बडोद्याच्या राज्यामध्ये नसते तर ह्या आलीकडील तीन वर्षांत मुंबई इलाख्यांत व मद्रास इलाख्यांत दुष्काळामुळे जसे हजारों लोक मेले तसे गुजरायेंत मेले असते. त्याच संधीस मारवाडांत दुष्काळ पडला होता यामुळे तिकडून असंख्य भिकार गुजरायेंत लोटले होतें. देऊन धान्य खरेदी करणारास ती वर्षे दुष्काळापेक्षांही भयंकर होती. त्या प्रसंगी भिकारी लोकांस पोटभर अन्न मिळण्याची उत्तम सोय केलेली होती. लोकांच्या चरितार्था- साठी निराळीच योजना केली होती, व चाकर लोकांचे पगार त्या वेळच्या खर्चाच्या प्रमाणाने वाढविले होते; त्या खेरीज देवस्थान, धर्मादाय, या निमित्तानें हजारों गरीब कुटुंबी यांचे संरक्षण होत असे. जसा महाराजानी शेतकरी लोकांपासून पैका घेतला तसाच त्यानी आपल्या रयतेच्या व देशबांधवांच्या चरितार्थाकडे खर्च केला. सभ्य

आणखी एक गोष्ट लक्षांत ठेविली पाहिजे की, मनुष्यास अति नीचत्व आणणारें

मद्य, स्त्री आणि द्यूत, यांपैकी एकही व्यसन महाराजांस नव्हते, यामुळे दुष्ट वासना पूर्ण कराव्या या हेतूने महाराजांच्या हातून एक पैसा देखील खर्च झाला नाहीं.

खंडेराव महाराज यांचा स्वभाव वाजवीपेक्षां ज्यास्त उग्र असे, यामुळे त्यांच्या हातून अप-

राध्यांस कडक शासने झाली होतीं, व रागाच्या सपाट्यांत निरपराधी लोकांसही क्वचित उपद्रव झाला होता, परंतु त्यांचा स्वभाव दयाळूही तसाच होता. ज्याजवर त्यांची इतराजी होई त्याजवर ते मग फार दया करीत असत. गणेश रघुनाथ हुजुरातवाले, गणपतराव अनंत महाजन, आणि दुसरे पुष्कळ लोक त्या महाराजांच्या दयाळू स्वभावाची प्रमाणे आहे- त. त्यांजवर महाराजांची इतराजी झाली तेव्हां लोकांस असे वाटले नाहीं कीं, अतःपर कधीं