पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २५८) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. सांडून पुसून टाकण्याचे प्रयोजन काय ? कोणता मुद्दा नाहींसा करण्यासाठी ती पुसून टाकळी ? चीफ जस्टिस महाराज, या मुकदम्यांत आणखी एक चमत्कारिक गोष्ट आहे. दामोदरपंत यानें स्वतः कांहीं त्या कागदांवर शाई सांडली नाही. त्या- ने एका कारकुनास सांगित होते. त्या कारकुनास माझ्या विद्वान मित्रांनी कोर्टा- समोर आणलें होतें. तो कारकून म्हणतो की दामोदरपंत यांच्या सांगण्यांतील एक अक्षर देखील खरें नाहीं. त्या कागदांकडे तात्काळ लक्ष जावें या हेतूखेरीज दुस प्या कोणत्या कारणासाठी त्या कागदावर मनुष्यमाण्यासारख्या विचारी प्राण्यानें शा. ई सांडळी असेल ते मला कळत नाहीं. सामान्य अक्कल, सामान्म अनुभव आणि सामान्य विचार पांवरून तरी असें मानतां येतें काय, कीं कांहीं गोष्ट छपविण्याकरि तां पाहिल्याबरोबर जिकडें मनुष्याचें लक्ष जाईल अशा अडाणीपणाचे कृत्य कोणी करील ? खरें असो अगर नसो पण मला असे कळविण्य आले आहे कीं हिंदु- खरवडून टाकण्यांत स्थानांतील लोक कागदावरील अक्षरें पुसून टाकण्यांत अथवा कांहीं कमी निष्णात नाहीत. तेव्हां जिकडे मनुष्याचें तात्काळ लक्ष्य जावे असा अडाणीपणा यांच्या हातून कसा होईल ? मी जर कोणास असा प्रश्न केला की त्या कागदावर असा कांहीं मजकूर होता कीं तो लपविण्याची जरूर होती, तर तूं तो कागद विस्तवांत किंवा फाडून का टाकला नाहीस? तर तो काय बरे उत्तर देईल ? ह्या मलीन मुकदम्यांत पुरावा मिळावण्याकरितां ज्या लबाड्या करण्यांत आल्या आ. हेत त्यांतीलच हा एक भाग आहे. अदूरदृष्टी मनुष्याचें हें कृम आहे. अज्ञान म ·नुष्याचें हें कर्म आहे. ज्यास झणून अक्कल आहे तो असे कस कही करणार ●नाही कारण ते कर्मच स्वतः होऊन अशी साक्ष देते कीं तें मूर्खपणाचें कृत्य आहे. परंतु ही गोष्ट मात्र अगदर्दी संभवनीय आहे की ज्यांना हा पुरावा बनविला आहे त्यास असे कधीही वाट नव्हतें कीं, या मुकदम्यांची चौकशी आपल्या सारख्या विद्वान, अनुभवीक आणि निष्पक्षपाती न्यायाधिशापुढे होईल. त्यांस असे वाटले होते की, या मुकदम्याची अशा कोणा तरी सामान्य बुद्धीच्या मनु- व्यापुढे चौकशी होईल कीं, त्यापुढे जे कांहां आपण सांगू तें निःसंशय पटेल. अ शा प्रकारचे मूर्ख विचार त्यांच्या मनांत भरले होते. या मुकदम्यांत जो कांहीं पु. •रावा आणला आहे तो सर्व अशाच प्रकारचा आहे. यासाठी कमिशनास मी वि- नयानें प्रार्थना करतों कीं, यांनी प्रत्येक पुराव्यावर फार बारीक नजर पोहोंचवावी. मीं पूर्वी सांगून ठेविले आहे कीं, नरसू आणि रावजी यांनीं जे काहीं सांगित होते ते दामोदरपंत यास माहित होते. त्यानेंच कबूल केले आहे कीं, मला कैद करण्या- पूर्वी विषप्रयोग करण्यांत सोमल आणि हिप्याची मुकी यांचा उपयोग केल्याबद्दल समजलें होतें. तेव्हां ज्यांत सोमल आणि हियाची मुकी यांचा संबंध येईल अशी विषाची गोष्ट रचण्यास त्याचें मन पूर्णपणे तयार बनून राहिलें होतें. सोमल आणि महिन्याच्या मुकीविषयीं दामोदरपंतानें जी कांहीं हकीगत सांगितली ती व त्याजवर मीं जो चर्चा केली आहे ती आपल्या ध्यानात आहेच. त्याविषयीं येथें अगदीं