पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २५६) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. या आहेत की नाही हेंही विचार त्याच सुमारास महाराजांनी मला सांगितले की हकीम साहेब यांच्या भावास सारंग्या घोड्याचें मूत्र पाहिजे आहे. मी खासपागेचा काम गार बापाजी यास हुकून दिला की हकीमाच्या भावाकडे तसें मुत्र पाठीव " हल्लीं हा हिंदुस्थान देश कोणत्या अज्ञान दर्शत आहे हें कांहीं मला चांगले माहित नाहीं; परंतु प्राचीन काळांत ज्या काही गोष्टी या देशांत घडल्या असतील तशा प्रकार- च्या आज एकुणिसाव्या शतकांत घडूं शकतील असे मला वाटत नाहीं. विषयावर मी माझा अभिप्राय द्यावा असा पोकळ गर्व मी बाळगीत नाहीं. या देशांतील लोकांच्या या संबंधानें काय समजुती असतील याविषय मत बांधण्यास आपण मज पेक्षा जास्त योग्य आहांत. कारण की या देशाशी आपला संबंध पुष्कळ घडला आहे. मला असे वाटतें कीं ही गोष्ट कोर्टापुढे सांगतांना माझे विद्वान मित्र यांस कांहीं संकोच वाटला होता. मी तर अशी अशा धरून बसलो होतों कीं वचन दिल्याप्रमाणे गारुडी यास कोर्टापुढे आणून सापापासू- न कोणत्या रीतीने विष काढण्यांत येतें त्याविषयी माझे विद्वान मित्र आपणास चाकब करतील आणि एका अपूर्व गोष्टींची माहिती करून देण्याची आपल्यावर कृपा करतील. परंतु त्यांनी तसे कांहींच केलें नाहीं. आणि आपला आशाभंग केला. असो. या विस्मयकारक पदायांचा एक शुभ्र प्रवाही अर्क बनून एका कुपीत 'शिरला आणि तो परंपरेनें रात्रजच्या हातांत गेली. ज्या पदार्थाचा प्रयोग त्या दुर्दैवी कर्नल फेर यांजवर करावयाचा होता तो कोणत्या कोणत्या वस्तूंपासून बनविला हें आपणास समजले आहे. याचें कथानक जरा हास्यजनक आहे. रावजीच्या पुराव्यावर जेव्हा मी टीका करीन तेव्हा आपल्यास कळून येईल कीं, या संबंधी वृत्तांत अतीशय महत्वाचा आहे. दामोदरपंत यांच्या सांगण्यांत असें आहे की, हा प्रवाही पदार्थ प्रथम ज्या कुपीत होता ती कुपी बो- टा इतकी लांब होती, आणि त्यापैकी त्याने ज्या कुपत तो पदार्थ ओतून घेतला ती अर्ध्या बोटा इतकी लांब होती. आणखी तो असे सांगतो कीं, ती अत्तराची कुपी होती. अत्तराच्या कुप्या कशा असतात हे प्रसिद्ध आहे. त्या कुप्या फार जाड कांचेच्या असतात आणि त्यांत अत्तराचें थेंब फार थोडें रहातात. आपण त्या कु- पीच्या परिमाणाकडे लक्ष द्याल तेव्हां त्यांत पुष्कळ प्रवाही पदार्थ रहाण्याची शक्यता नाहीं असे आपणास कळून येईल. आतां हियाच्या भुकटीविषयों आपणास मला निवे- दन करावयाचें आहे. हिऱ्याच्या आंगीं विषाचा गुण आहे असे सिद्ध झाले आ- हे असें ह्मणणारा मूर्ख मनुष्य या जगांत कधी निर्माण झाला होता असे मला वाटत नाहीं. मीं टेलर आणि बेक आणि दुसरे ग्रंथकार यांचे ग्रंथ काळजी पूर्वक तपासले परंतु मला याविषयी किंचित देखील प्रमाण सांपडळे नाहीं. याविषयावर ज्या साक्षीदारांच्या साक्षी घेतल्या आहेत (सोनार, नानाजी विठ्ठल आणि दुसरे) त्या सर्वांनीं प्रतिज्ञापूर्वक सांगितलें आहे कीं,हिऱ्याची भुकटी होते असे आह्मी साया आमच्या जन्मांत ऐकिलें ना हीं. सर्प, मुंगळे आणि सारंग्या घोड्याचें मूत्र यापासून विष उत्पन्न होते अशी एक