पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

•सारजंट बालंटाईनचें भाषण. ( २५५ ) याजपासून सोमल मिळविला असें तो ह्मणतो आणि नुरुद्दीन यानें तर तशी साक्ष दिली नाही. अर्थात दामोदरपंत यांचे बोलणे अगदीं खोटें ठरतें. त्यानें कदाचित सोमल मिळविला असेल तर तो दुसरीकडून मिळविला असेल. आणि तो मिळविण्या- 'चा उद्देशही निराळाच असेल. गायकवाडांच्या संबंधानें दामोदरपंत यानें ज़े कांहीं सांगितले ते सर्व कुभांड आहे. परंपरेनें अखेरीस कर्नल फेर यांच्या सरबताच्या प्याल्यांत सोमल जाऊन पोहोचला तो हा. सोमलाच्या संबंधानें आणखी असे सांगण्यांत आले आहे की, काषांतील बोहऱ्या. पासून तो मिळविण्यांत आला होता पण त्यास देखील कोटीपुढे साक्ष देण्याकरितां आणला नाही तेव्हां याहून उलट साक्षी त्या गायकवाडांनी कोणत्या आणाव्या; झ- णजे जी गोष्ट शाबीत होऊं शकत नाहीं ती खोटी आहे असा पुरावा करण्याचे प्रयोजन काय ? आतां एका हकिमापासून एक विषाची शिसी मिळाली होती असे सांगण्यांत आलें आहे, याजविषयीं मी विवेचन करतों. सत्पंबर किंवा अक्टोबर महिन्यांत कर्नल फेर यांच्या कपाळावर एक गळं झालें होतें त्यास लावण्याच्या पटींत विष घालण्या करितां साप, मुंगळे, आणि सारंग्या घोड्याचें मूत्र यांचे एक विष तयार केलें होते असे कथन करण्यात आले आहे. एकुणिसाव्या शतकांतील मनुष्यकृतीचा हा एक अपूर्व मासला आहे. दामो- दरपंत यानें या संबंधी जी हकीगत सांगितली आहे ती फार मनोवेधक आहे, तशी मला सांगता येणार नाहीं सचच त्याने काय ह्मटले आहे तेंच मी येथें वाचून दाख- वितों. तो ह्मणतो “ त्याच वेळेस ह्मणजे जेव्हां रसिडेंन्ट यांस एक क्षत पडलें होते ( मला वाटतें कर्नल फेर यांच्या कपाळावरील गळवाविषयीं तो म्हणतो ) तेव्हां मोठ्या हकीमाच्या धाकट्या भावानें, हकीमानें तयार केलेली एक विषाची कुपी आणली होती पण आमच्यांपैकी पुष्कळ लोक हजर होते म्हणून यावेळेस ती त्याने दिली नाहीं; आणि त्याबदल त्यास कांहीं पाहिजे असेल. एके दिवशीं अस्तमानी जेव्हां कर्नल फेर यांच्या कपाळावर गळं झाले होते तेव्हा महाराज मला म्हणाले कीं कांहीं मुंगळे मोठ्या हकीमाच्या धाकट्या भावास पाहिजेत ते फौजदारा- च्या द्वारे वाघन्याकडून आणवून हकीमाकडेस पाठवून दे. मी नारायण बाकसकर फौजदारींत आहे त्यास त्या प्रमाणें सांगितलें. दुसरे दिवशीं हरीबा यास महाराजांनी माझे समक्ष सांगितले की हकीमसाहेब यांच्या कनिष्ठ भावास औषधासाठीं कांहीं सांप पाहिजे आहेत. एक गारुडी दोन तीन दिवसांनी मजकडे आला आणि म्हणाला की मला सर्प आणावयास सांगितले होते ते मजपाशी तयार आहेत; मी त्यांस सांगितले की ते हरीवाकडे घेऊन जा आणि हकीमाकडे नेण्यापूर्वी त्यांचे काय करावयाचें त्याविषयों हरीबाचा हुकूम घे. वाघऱ्याकडून जे मुंगळे धरून आणविले होते ते नारायणराव यांनी मला दाखविले. आणि दुसरे दिवशीं नानासाहे- ब खानवेलकर यांचा चाकर गुजावा याने त्याच जातीचे मुंगळे मला दाखविले. मीं व्यास सांगितले की मोठ्या हकीमाच्या धाकच्या भावाकडे ते ने आणि त्यास ते पसंत 66