पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २५४) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. वरून दुसरीकडून सोमल मागविला नसता. सोमलाबद्दल फौजदारींत त्यानें चिठी लिहिली त्यांत गायकवाडांचें नाव लिहिले आहे. आणि फौजदाराने त्याजवर अ- सा शेरा लिहिला आहे की गायकवाडांचा हुकूम झाला आहे सवच सोमल द्यावा. त्या चिठीवरून सोमल न आणतां दामोदरपंतानें गायकवाडांच्या हुकूमानें बिन अ धःराने दुसऱ्यापासून सोमळ मागविला हे संभवत नाहीं; पण खरी गोष्ट अशी आहे आणि आपले मनही आपल्यास साक्ष देतें की गायकवाडांस माहीत केल्यावांचून दामोदरपंत यास सोमल मिळवावयाचा होता सचब फौजदारींतून सोमल मिळण्यास कांही एक हरकत नसतां त्यानें तेथून मागविला नाहीं. सोमल मिळविण्यांत त्याचा कांहीं उद्देश असावा असे दिसते. आपण त्याच्या स्थीतीकडे पहा. कर्नल फेर दरबारांतील खरात्र मनुष्यांस काढून टाकण्यास सर्व प्रकारें तप्तर होता. आणि दामोदरपंत यानें खोटे हिशेब ठेविले होते त्याजबद्दल त्यास धास्ती होती; रेसि- डेंन्सोत तर त्याची अब्रू गेलीच होती, त्यास रेसिडेंन्सीच्या हद्दीत पाऊल ठेवण्याची परवानगी नव्हती यासाठी विषप्रयोगाचे काम त्यानेच केलें असेल तर आपण तरी नाही कसे ह्मणावें- पुरावा मिळविण्यासाठी पोलिसांनी कोणत्या रीतीनें बंदोबस्त के ला होता व काय व्यवस्था केली होती त्याजकडे आपल्यास लक्ष दिले पाहिजे. या कामांत नुरुद्दीन बोहरी याचे नांव सांगण्यांत आले आहे; आणि संबंध असा दाखविला आहे की त्यापासून दामोदरपंत यानें सोमल मिळविला. नुरुद्दीन यांचे नांव सांग- ण्यांत मोठा अर्थ होता; गायकवाडांचा तो कट्टा वैरी होता यानें सन १८७३च्या कमि- शनापुढे फिर्याद केली होती हैं सर रिचर्ड मीड यास माहीत आहेच; त्याच्या अप्ता. स गायकवाडांनी फटके मारविले होते आणि त्यापासून ५००० रुपये दंड घेतला होता त्यावरून गायकवाडांच्या विरुद्ध तो साक्ष देईल अशी आशा ठेवण्यांत आली होतो; परंतु या अब्रूदार आणि प्रामाणिक गृहस्थानें सत्यस्मरून गायकवाडांच्या विरुद्ध साक्ष दिली नाहीं. त्यास पोलिसाने कैदेत ठेविला होता, त्याजवर अतिशय जुलूम केला होता व धमकी दिली होती, आणि अकबरअल्लीच्या सांगण्याप्रमाणे त्यास कोणत्याही अम्मलदारापुढे नेला नाहीं आणि दाद फिर्णदीवांचन व्यास तुरुंगांत पाठविलें तथापि त्यानें सत्यासाठी सर्व सोशिले आणि एका निरपराधी मनुष्याविरुद्ध खोटी साक्ष देण्यापासून तो मागें सरला. या कामांत जे साक्षीदार आहेत त्यांच्या "साक्षीवरून साफ कळून आले आहे की पोलिसांनी पूर्वी पाढा पढविल्या वांचून कोणत्याही साक्षीदारास मूटरसाहेब यांच्या समोर नेण्यांत येत नव्हते आणि त्यावरून च मी सांगू शकतों की गायकवाडांच्या विरुद्ध जे लोक साक्ष देण्यास सिद्ध होत त्यांस मात्र सूटर साहेब याजपुढे नेण्यांत येत असत; याप्रमाणे जेथे माजिस्ट्रेट यांची धास्ती नाहीं, जेथे कोणी दाद फिर्याद ऐकत नाहीं, आणि जेथे पोलीस अशा प्रका- रचा जुलूम करीत आहेत. तेथें निरपराधी मनुष्याचें जिवीत, अब्रू आणि मालमत्ता धो- क्यांत असेल यांत नवळ तरी काय ! चीफ जस्टिस महाराज, दामोदरपंत यास सोमल मिळाल्याविषयीं त्याच्या सांगण्या खेरीज दुसरा काही पुरावा नाहीं. नुरुद्दीन