पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सारजंट बालंटाईनचें भाषण. ( २५३ ) खोट्या वह्या ठेविल्या होत्या, त्यांत खोटे हिशेब लिहिले होते, पैक्याचा उपाड के. ला होता, व खोट्या रकमा खर्चा लिहिल्या होत्या; त्याबद्दल जर गायकवाडांनी त्याज- जवळ जवाब मागितला असता तर त्याचे उत्तर देण्यास त्यास कांहींच मार्ग नव्हता. त्याच्याच वह्यांनी त्याच्या विरुद्ध साक्षी दिल्या असत्या. मी त्यास प्रश्न विचारले होते की याबद्दल तुझ्यावर आरोप ठेविला तर त्यांतून मुक्त हेण्यास तुजपाशी काय साधन आहे तेव्हां त्याने उत्तर दिले कीं या आरोपातून सुटण्यास माझ्या जवळ कांहीं सामोश्री नाहीं व त्याबद्दल मला कांहीं उत्तर देता येणार नाही. तो ह्मणतो कीं मध्यंतरी भोजनास जाण्याची वेळ खेरीज करून मी प्रातःकाळचे आठ वाजल्यापासून रात्रीचे दहा वाजे पर्यंत राजवाड्यांत रहात होतो हे जर खरे आहे तर रेसीडॅन्सीतील मनुष्यें राजवड्यांत येत जात होती त्याविषयी तो कांहींच सांगत नाहीं हें करें ? व त्या लोकांबरोबर जी मसलत होत होती असे म्हणतात त्यांत ह्याचा काहीच संबंध नव्हतां हे काय ? आणि गायकवाडांचा जर ह्याजवर भरवसा होता तर विषप्रयोग करविण्याचे काम व रेसिडेंन्सीतून बातमी मागविण्याचे काम त्या एकट्यावर न सौंप वितां अशा मयंकर आणि नाशकारक कामांत खंडीभर मनुष्यांबरोबर मसलत कर- ण्याची गायकवाडांस काय बरें जरूर होती ? आतां आपण दामोदरपंत याची सोन- ल मिळविण्याच्या संबंधाने काय हकीकत आहे त्याकडे लक्ष देऊं. गायकवाडांना खरजेच्या औषधासाठी फौजदारीतून सोमल मागविण्याविषयीं मला सांगितले असे तो ह्मणतो, आणि फौजदार यास चिठी लिहिली त्यांत घोड्याच्या औषधा करितां पाहि जे म्हणून लिहितो, आणि त्या नंतर त्याचे सांगणे असे आहे कीं फौजदार यास... हुकूम दिला परंतु सोमल मिळविण्यास मी शक्त झालो नाहीं, आतां कमिशनांनी ह्या- गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे, फौजदारीत हुकूम दिला असता त्यास सोमल मिळाला नाहीं अशी त्याची काहाणी आहे ही अगदर्दी लबाड़ी आहे. फौजदारीतून कांहीं आडचण पडल्यावांचून त्यास सोमल मिळाला आसता; माझे विद्वान यांनी फो जदार यास कमिशन पुढे आणिला होता. त्याने असे सांगितले आहे की महाराजांचा हुकुम सर्व प्रकारें बरोबर होता आणि फौजदारीतून सोमळ मिळण्यास दामोदरपंत. त्यास सोमल जर गायकवाडांकरतांच- पाहिजे होता तर हुकूम झाला होताच त्याप्रमाणे फौजदारीतून मागावेण्यास कोणती अडचण होती? या ठिकाणी इतकाच विचार करावयाचा आहे की फौजदारीतून सोमल मागविला होता तो गायकवाडांच्या माहितीनें मागविला होता किंवा त्यास कळविल्यावांचून; अथवा गायकवाडांसाठींच मागविला होता किंवा दामोदरपंत यानें आपल्यासाठी. गायक- वाडांतच जर सोमलाची गरज असती तर त्यास माहित होते की माझ्या हुकूमावांचून सोमल मिळावयाचा नाही तेव्हां त्यांनी प्रथमच दामोदरपंत यास सोमल मागविण्यास सांगितले व नसतें आणि दामोदरपंत याजकडून कर्नल फेर यास विषप्रयोग करण्यासाठी गायक- व्राडांनीं सोमल मागविला असता तर दामोदरपंतासारख्या सोद्या मनुष्याने आपल्या बचावासाठी काही साधन करून ठेवल्यावांचून फक्त महाराजांच्या तोंडच्या सांगण्या यास कोणत्याही प्रकारचा अडथळा नव्हता.