पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २५२ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. पाहयत ठेविले. त्यास कोणा माजिस्ब्रेटासमोर नेले नाही किंवा त्यास आपराधी ह्मणणारा समोर नेऊन त्याचा रुजु मुकाबलाक केला नाही किंवा त्याबद्दल दुसरा कांहीं तपास केला नाही. सत्रा दिवसपर्यंत त्यास सोलजरांचे पहान्यांत ठेविला होता; नुसता त्यास पहायत ठेविला नव्हता तर दु:ख आणि यातना यांत ठेविला होता. तो देखील असे ह्मणतो की कैदेतून मुक्त व्हावें या साठी मी जबानी दिली, रावजी आणि नरसू यांनी गायकवाडांवर आरोप आणिला होता हे त्यांस माहीत झाले होते. आणि विषप्रयोग करण्यास सोमल आणि हिमाची भुकी यांचा उपयोग केला होता असे त्यांनी सांगितलें होतें तेंही त्यास माहीत होते. तेव्हां सोमलाचा आणि हियाच्या भुकीचा संबंध आणण्याकरितां त्यास थोडीशी रचना करावी लागली. या रचनेंत त्यानें सोमलाच्या कुपीबद्दल हकीकत सांगितली आहे आणि ही गोष्ट त्याजपासूनच प्रथम निघाली. दामोदरपंतानें तो हकीकत किती चातुर्यानें सांगितली आहे त्याविषयी आपणास सुचना करण्याची मला जरूर नाहीं; ती गोष्ट आपल्या लक्षांत आहेच. दामोदरपंत यास सुचना झाली होती की जर गायकवाडांस तुली आपराधी ठरवाल तर तुमची सुटका होईल आणि गायकवाड मुक्त झाले तर तुमचे दिवस भरले हें पक्के समजा. त्यास अटीचे सरटी- फिक्रीट दिले त्यांत तरी असाच भाव सूचीत केला होता की, पोलीस ह्मणतात त्या- प्रमाणें तुझी साक्ष दिली तर तुझी जिंकाल व तुझाला स्वातंत्र्य प्राप्त होऊन कदाचित जहागीरही मिळेल परंतु तसे झाले नाहीं तर तुमच्या दुष्ट कृत्यांची फळे तुह्मास चा खावीं लागतील; आणि अशा कारणानेच गाईकवाडांच्या विरुद्ध झाला साक्षी द्यावी लागली असे त्यानेच कबूल केले आहे. याप्रमाणे दामोदरपंत याच्या गळ्यास फांस घालून त्यास पोलीसाने आपले पुढे उभा केला होता आणि तो फांस ओटून त्याचा प्राण घ्यावा किंवा त्यास जीवदान द्यावें हें त्याच्या कृतीवर अवलंबून राहिले होते. सत्यासाठी मनुष्याने सर्व प्रकारच्या यातना सोसून सर्वस्व गमाविले परंतु सत्याचा लोप केला नाहीं अशी उदाहरणें आहेत, परंतु दामोदरपंतासारख्या अधम आणि निलाजऱ्या मनुष्यास सत्याची चाड काय ? या कोर्टापुढे जे साक्षी आले त्यांत दामो दरपंत फार हुशार आणि अट्टल सोदा आहे असे माझ्या अनुभवास आले आहे. त्यानें आपली साक्ष फार वाक्चापल्याने दिली आहे. त्याचे मुद्रेवरून असे दिसत होते कीं साक्ष देतांना त्यास शरम वाटत होती परंतु तो शपत वाहून खोटी साक्ष देण्यास मागें सरला नाहीं; त्याच्या जबानीत काय वैगुण्य आहे आणि त्याच्या पुरा व्यास बळकटी आणण्याकरितां जो दुसरा पुरावा आणिला आहे त्याचा त्याशी कसा मेळ जमतो हैं पहावयाचे आहे याविषयीं मी बयान करीन तेव्हां पोलीसांनीं या कामांत मोठ्या खबरदारीने अतिशय धारीष्टाचा आणि अनर्थननक जो हस्त- व्यापार केला आहे त्याविषयों मी आपल्या निवेदन करीन. प्रथम दामोदरपंत याच्या स्थितिविषयीं विचार केला पाहिजे. तो गायकवाडांचा खाजगी दिवाण होता वू महाराजांचा त्याजवर विश्वास होता; अशी जरी याची स्थिति होती तरी त्यानें