पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सारजंट बालंटाईनचें भाषण (२५१) प्यास कैदेत ठेवण्याची सदर मुभा होती. नंतर त्याची साक्ष घेण्यास सूटर साहेब येत असत. त्या लोकांच्या जवान्या कोणत्या रीतीने घेण्यांत येत असत ते प्रत्येक साक्षीदाराविषयीं मी सांगेन तेव्हां सांगेन. अनुकूल साक्षी देण्याकरिता त्या लोकांचे कानांस चाप लावले नाहीत अथवा तशाच प्रकारच्या दुसऱ्या कांहीं यंत्रा- चा उपाय केला नाही, परंतु त्यांस दुःखांत आणि धास्तीत टाकून ठेविले होतें आ णि तितकें करणें इच्छित हेतु शेवटास नेण्यास बस होते. त्या लोकांस ठाऊक हो- तें कीं, आपका नान, माल, उमेद, स्वातंत्र्य आणि या जगांतील प्रत्येक वस्तूंचे अ स्तीत्व कैदेत असतानां जे काहीं आपण करूं याजवर आवलंबून आहे. ह्मणजे पोली- स ज्याप्रमाणे इच्छा करते त्याप्रमाणे आपण जबानी दिली तरच आपली सुटका होणार आहे. हिंदुस्थानांतील शहरांत असा क्रम चालणें असह्य असून तो अग दीं गैर कायद्याचा आहे. जेथील रहिवाशी लोक गरीब आणि गैर वाकच, संकटका- ळी कसे करावे आणि कोणापाशीं दाद मागावी हे ज्यांस माहित नाहीं, अडचणी- च्या प्रसंगी दाद देण्यासाठी जेथे कायद्याने स्थापित केलेली न्याय सभा नाहीं, ज्यां- चा स्वामी इतवीर्य झाला आहे, व पोलीसच्या जुलमापासून सुटका करून घेण्याची ज्यांच्या मध्ये ताकद नाहीं अशा लोकांवर कोपयांतील एका शहरांत जुलूम झाला आहे. मीं जो ही व्याख्या केली आहे ती फार विचारपूर्वक केली आहे; आणि आ- पण अनुभवी असल्यामुळे माझें ह्मणणे आपणास पसंत पडेलच पण ज्यास साधा- रण अक्कल आहे तो देखील कबूल करील की, माझे ह्मणणे अगदर्दी रास्त आहे आ णि मी जे विचार प्रगट केले आहेत त्याजवर या मोकदम्याचें अवसान आहे असे मी समजतों. आतां मी दामोदरपंत याच्या साक्षी विषयों विचार करतो. हा या मो- कदम्यांत मुख्य नायक आहे व त्याजपासूनच सर्व गोष्टी उद्भवल्या असून गायकवा डांचा तो खाजगत दिवाण मानला आहे यास्तव त्याच्या पुराव्याविषयी फार बारीक विचार केला पाहिजे. आणि तो पुरावा ग्राह्य करण्यास पात्र आहे किंवा नाहीं या जविषयीं दरयाफूती केली पाहिजे- मला या मोकदम्यांत ज्या मनुष्यांचे संबंधानें बो लावयाचें आहे त्याविषयीं मी उगीच कठोर शब्दांचा उपयोग करणार नाहीं आ णि मी ज्या शब्दांचा येथें उपयोग करीन तें उपपत्तिविशीष्ठ असतील. माझे मनांत जे विचार भरले आहेत ते जर या न्यायसभेतील कमिशनरांच्या मनांत भरविण्यास मी शक्त झालो तर मग गायकवाड अगदीं निर्भय आहे आणि माझी खात्री आहे. की सुधारलेल्या देशांतील न्यायसभेस अशा प्रकारच्या पुराव्यावरून गायकवाडांस अपराधी ठरविणें सर्वथैव अशक्य आहे. गायकवाडांस तरु. काय पण हलक्यांत हळक्या मनुष्यास देखील अशा पुराव्यावरून आपराधी ठरवितां येणार नाही अशी माझी खातरजमा आहे. गायकवाडांनी आपल्या सगळ्या राज्याचा, मानमर्तव्याचा, दौलतीचा, आणि त्या सर्वांहून त्यांस या जगांत अतिप्रिय आहे त्या अब्रूचा भरवसा आपले न्यायावर ठेविला आहे. ज्या दिवशीं गायकवाडांस प्रतिबंध केला त्याच दिवशी दामोदर यास पकडले आणि.