पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २५० ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. कदम्यांत सांगितले नाही. यासाठी दामोदरपंत याच्या पुराव्या पासून क्रम धरला असतां फार सुकर होईल. दामोदरपंत व त्याचप्रमाणे नरसू आणि रावजी यांच्या पुरराव्या विषयी वाटाघाट करण्यापूर्वी हा पुरावा कोणत्या रीतीनें संपादन केला या बद्दल मी शनवारच्या भाषणांत जी थोडी सूचना केली आहे तिचा पुन्हां उल्लेख केला असता कांही अयोग्य होणार नाहीं. मला असे वाटतें कीं, ज कोणी पवित्र म नाने सिद्धासिद्ध विचार करतील ते सर्व माझे मतास मिळतील. आणि माझी खातरजमा आहे की, येथे तसाच योग्य विचार होईल. जेव्हां भी त्या पुरा- ब्यावर टिका करीन आणि जेव्हा आपणास कळेल कीं, जे साक्षीदार पराकाष्ठेचे बेअब्रूचे आणि कुकर्मसहचारी होते ते न्यायसभेपुढे येऊन उमे राहिले होते तेव्हां तो पुरावा पवित्र मनांच्या मनुष्यांनी मिळावेला असून ज्या रीतीनें तो मिळविला तो रीत न्याय सभेला मान्य होण्यासारखी आहे किंवा वाईट चालींच्या मनुष्यांनीं अयोग्य री- तोनें तो पुरावा मिळविला आहे याविषयीं फार बारीक चौकशी करण्याची पराका. ष्ठेची आवश्यकता आहे असा आपल्या मनाचा ग्रह होईल. जेणेकरून दु. सऱ्याचे अब्रूला कलंक लागेल अशा रीतीचें भाषण करण्याविषयों मी सर्वदा नाखुष आहे. पण या मोकदम्यांत व्यक्तीच्याच संबंधाने बोलण्याचा मला प्रसंग आला आहे असे नाहीं तर ज्या रीतीने त्या मनुष्यांनी पुरावा मिळविला आहे याविषयें। टिका कर- श्याची मला अवश्यकता प्राप झाली आहे. सटर साहेब हे अतिशय हुशार कामदार आहेत याविषयीं मला संशय नाहीं आणि मुंबई इलाख्यांत त्यांजकडे मोठ्या अधिका- राचा हुद्दा आहे असें मी मानतों या मोकदम्यांत गजानन, अकबर अल्ली, आणि अबदुल अल्ली हे जे लक्षांत ठेवण्याजोगें तीन असामी आहेत त्यांची चाल मूटर साहेब यांस पूर्णपणे माहीत होती, व त्यांस हेही चांगल्या रीतीनें माहीत होतें की हिंदुस्थानांतील एका पराकाष्ठेच्या, लौकिकाच्या आणि उंच पदवीच्या न्यायाधिशानें त्या लोकांची गर्दा केली होती. ती गहीवाजवी असो किंवा चुकीची असो या कामाकरितां त्यांचा मूटर साहेब यांस उपयोग करावयाचा होता त्या कामास ते योग्य नाहीत असे मानण्यास त्यांस योग्य कारण होतें. या का- माकरितां मुंबईत त्यास दुसरे लोक मिळाले नसते असे नाही परंतु हे तिघे तर त्यांनी मुद्दाम दुसऱ्या जिल्ह्यांतून बोलावून आणिले होते; तसे करण्याचे त्यांस काहीं देखील प्रयोज न नव्हते. त्या लोकांनी खोटा पुरावा बनावेला होता व खोटे मोकद्दमे उभे केले होते. अशा त्यांच्या वर्तनांवर दुसरे ठिकाणी टीका झाल्या होत्या त्या खऱ्या असोत अगर नसोत पण त्यांच्या हातांत सत्ता तरी किती द्यावी याविषयीं तरी सूटर साहेब यांनी काळजी ठेवावयाची होती. तीन साक्षिदारांनी या कामांत ज्या रीतीनें पुरावा दिला आहे त्यांजकडे बरीक आपण लक्ष दिले पाहिजे; कारण की या मोकदम्यांत हा एक भाग प्रथमदृगविषयपात आहे, आणि या देशांत व या जगावर जे सुधारलेले देश आहेत त्यांत एका शेवटापासून दुसऱ्या शेवटापर्यंत याविषयावर फार टीका होईल. ह्या त्रिवगाँस पाहिजे तितका वेळपर्यंत पाहिजेल त्या मनु-