पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सारजंट बालंटाईनचें माषण: (२४९) रून सोमलाविषयों सांगतात आणि या चिन्हांवरून सोमलाचें दिग्दर्शन होतें, हे मी ना कबुल करीत नाहीं; परंतु तो कांहीं निर्विवाद पुरावा आहे, असे गृहीत केले जात नाही. आणि मला माहीत आहे की, इंग्लंडांत ज्या मुकदम्यांत सोमलाचा उपयोग केल्याबद्दल वाद असतो या कामांत मूलतत्त्वपृथक्कर्ते यांनी प्रत्यक्ष मूलरुपाने सोमल शोधून काढल्यावांचून केवळ या नळीवरील काळ्या डागाच्या अंगठीवरून सोमलाचा उपयोग केला आहे असे मानीत नाहीत. आतां हिन्याच्या भुकटीविषयी विचार केला असतां यांत त्यापैकीं कांहीं सापडले आहे असे ह्मणणे अगदर्दी असंगत आहे. त्या गाळांत चकाकणारा व तो कांचावर घासला असतां "रेघा पडतात असा काही पदार्थ आहे; परंतु यास हिण्याची भुंकी म्हणण्यास कांहीं देखील प्रमाण सांपडावयाचें नाहीं, ती केवळ कल्पना होय. आणि याबद्दल ज्यां- नीं साक्षी दिल्या आहेत, त्यांजवर एखादा अविचारी मात्र विश्वास ठेवील; परंतु या कमिशनच्या मनावर त्या साक्षींचें कांहीं वजन पडणार नाहीं, अशी माझी खात्री आहे. कर्नल फेर यांनी निश्चयपूर्वक असे सांगितले आहे की, डाक्टर सीवर्ड यां- च्या हवाली गलास केला त्यापूर्वी त्यास कोणी स्पर्श केला नाही किंवा त्यांत कांहीं टाकले नाही. परंतु त्यांच्या सांगण्यावर माझा विश्वास बसत नाहीं. कारण तेथे पुष्कळ लोक होते, आणि त्यांस त्या गलासाला स्पर्श करण्याची पूर्ण संधी होती. मला विषप्रयोग करण्यांत आला होता है जे त्यांचें मनांत भरले होते त्यामुळे यांस सर्व विषरूपच दिसत होते. ह्मणून त्यासंबंधानें त्यांनी जे काही प्रतिज्ञापूर्वक सांगितले ते सर्व खरे असे मानतां येत नाहीं. आपल्यास स्मरत असेल कीं, कर्नल फेर यांच्या गलासांत जो पदार्थ होता, त्या च्या रंगाविषयीं जा तफावत आहे साजकडे आपले लक्ष मी पोहोचविले आहे. विषप्रयोग करण्याचा प्रयोग चार वेळा किंवा साहा वेळां घडला असे लणण्यांत आले आहे. मी असे घेऊन चालतों की, विषप्रयोग करण्याचा प्रयत्न सहा वेळां घडला. प्रत्येक प्रसंगी कर्नल फेर यांच्यानें गलासांतील सगळे सरबत पिववले नाही. कारण त्याचा थोडा भाग पिण्यापासून त्यांस वाईट चत्र लागली. या गोष्टीकडे आपण लक्ष द्यावें. ज्या द्रव्याचा कर्नल फेर यांस विषप्रयोग करण्याकरिता उपयोग केला असे मा. निले आहे, तें द्रव्य सोमल आणि हिऱ्याची भुकटी याचे मिश्रण होते. त्यांपैकी ए... कासही कोणत्याही प्रकारची रुची नाहीं; आणि कर्नल फेर यांनी तो सर्व रस प्राशन केला असता तर त्यांस अर्ध्या तासापर्यंत त्यांत कांहीं प्राणनाशक पदार्थ होता असे . समजले नसते. असे असता त्यांस तें सरबत वाईट कसे लागले ही गोष्ट कमिशनानी ध्यानांत ठेवण्या जोगी आहे. आतां मी महाराजांवर अतिदुष्ट आरोप आणिला आहे याविषयीं बोलतों आणि दामोदर पंताच्या पुराव्या पासून आरंभ करतो; कारण प्रत्ये. क गोष्ट त्या पासून निष्पन्न झाली आहे व या मोकदम्यांत सांगितलेले विष प्राप्त होण्याचे मूळस्थान कायतो तोच आहे असे सांगितले आहे. विष मिळविण्यास किंवा त्याचा पुरवठा करण्यास दुसरा कोणी मनुष्य प्रवृत्त झाला होता असे कोणी या मो.