पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जुन्या राज्यपद्धतीचें वर्णन व त्यांस पुढें फेरबदल

गोविंदराव रोडे यांस राज्य सुधारणुकीच्या संबंधाने ज्या ज्या सूचना केल्या त्या त्या त्यानी तात्काळ प्रचारांत आणिल्या. खंडेराव महाराजानी सर्व राज्यभार गोविंदराव यांजवर टाकिला होता, व त्यांस रोसेंडेंटाचें पाठबळ असून त्यांचा उद्देश मिथ्या करील असा कोणी दरबारांत त्यांस प्रतिस्पर्धी नव्हता, यामुळे रावसाहेब यांच्या आज्ञा अनुलंघनोय होत्या.

पूर्वीची राज्यव्यवस्था कशी होती, आणि खंडेराव महाराज यांचे अमलापासून मल्हारराव

यांस राज्याधिकार प्राप्त होईपर्यंत कोणत्या रीतीने राज्यकारभार चालला होता, याजविषयीं जरूरी पुर्ते विवरण केले आहे.

जे उद्देश मनांत धरून राज्य चालविण्याची योजना केली होती ते समग्रतेने सिद्धीस गेले

होते असे म्हणतां येत नाही. केलेल्या योजनेंत बरीच उणीव होती व स्थापित नियमांचे देखील कधीं कर्धी उल्लंघन होत असे, आणि भाऊ शिंदे यांचे दिवाणगिरीपासून तर ज्यास्त गोंधळ झाला होता; तथापि देखील जुन्या रीतीपेक्षां नवी रीत चांगली होती.

अति सुधारलेल्या राष्ट्रावरोबर गायकवाडाच्या राष्ट्राची तुलना करून पाहिली असतां

त्यांत दोष सांपडतील यांत नवल काय, परंतु न्यायाने पाहिले असतां मुकाबल्यास अति सुधारलेली राष्ट्र घेतां कामा नये. गायकवाडाच्या राष्ट्राच्या पूर्व स्थितीशी व हिंदुस्था- नांत जी इतर देशी राज्ये आहेत त्यांच्या राज्यकारभाराच्या स्थितीशी खंडेराव महाराजांच्या राज्यव्यवस्थेचे साम्य करून पाहिले पाहिजे, आणि तसे साम्य करून पाहिले असतां त्यांच्या कारकीर्दीतील राज्यव्यवस्थेवर दोषारोप करणे वाजवी होणार नाही.

खंडेराव महाराज यानीं प्रजेपासून अनेक निमित्ताने पुष्कळ द्रव्य घेतले, व त्याचा

अविनयानें यथेच्छ व्यय केला असे म्हणतात, परंतु त्याजबद्दल थोडासा विचार केला म्हणजे निराळाच प्रकार दिसून येतो. बडोद्याच्या राज्यांत कांही महाल खेरीज करून ऐन उत्पन्नांतून निमे माल सरकारचा धारा म्हणून वसूल करून घेत असत, व त्याखेरीज दुसरे कांहीं रोकड घेणे जमिनीवर असे. ही रीत पूर्वापार चालत आलेली होती. संवत १९९८चे साली जेव्हां रोख चसूल घेण्याचा ठराव केला तेव्हां मागील काही वर्षांच्या उत्पन्नाच्या सरासरीवर दहा वर्षांच्या कराराने जमाबंदी कायम केली होती, नंतर अमेरिकेतील लढाईमुळे कापसाचे भा- वास मनस्वी तेजी आली व धान्यही फार महाग झाले. या समयास मागील वहिवाटीप्रमाणे जर ऐन मालांतून निमे हिस्सा घेतला असता, तर खंडेराव महाराज यानी दुसऱ्या कांहीं निमित्तानें ठरीव धान्याशिवाय जो कांहीं पैसा घेतला त्याच्या कितीएक पट त्यांस ज्यास्त. पैसा मिळाला असता, व त्या प्रसंगी तशी कितीएक लोकांनी महाराजांस सल्ला दिली होती, परंतु त्यांनी तसे न करितां रयतेबरोबर केलेले करार बऱ्याच अंशी पाळले, व रयतेनीं देखील धाऱ्याशिवायचा कर कांहींएक कुरकूर न करितां दिला; कारण भावाचे तेजी मुळे त्यांस तें देणे अगदर्दी जबर वाटले नाही. आतां महाराजानी द्रव्याचा अपव्यय केला, असे जे म्हणणे आहे तेंही तसेच काहींसें अविचारमूलक आहे. महाराजानी ज्या रीतीनें खर्च केला त्यापेक्षां चांगल्या रीतीनें तो