पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२४८) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. नवंबर पर्यंत त्यांत विष कालविल्यामुळे ते वाईट लागत होते, अशी कल्पना त्यांच्या मनांतच आली नाहीं; ह्या अशा कांहां चमत्कारीक गोष्टी आहेत कीं, त्याजवर माझी अक्कलच काम करीत नाहीं, जसे माझे मनांत आले आहे, तसेच दुसऱ्याच्याही मनात आले असेल की, कर्नल फेर यांस विषप्रयोग करण्याचा खरोखर उद्देश नव्हता विष मिळविणे शक्य असतां व कर्नल फेर यांच्या सर्व सवई- ची माहिती असतां, व त्या सवईची संधी साधण्याची सवड असतां, आणि सर्व 'प्रकारची साहियें अनुकूल असतां, कर्नल फेर यांचा प्राणनाश करण्याचा प्रयत्न सिद्धीस गेला नाही, ही गोष्ट आश्चर्य करण्यासारखी आहे. आणि वारंवार विष 'प्रयोग करण्याचे प्रयत्न करण्यांत आले होते, असे सांगण्यांत आले असून, कर्नल 'फेर यांच्या मनांत ती गोष्ट कधींही आली नाही. ह्या प्रकर्णांत अशा प्रकारच्या विलक्षण आणि असंभवनिय गोष्टी अलक्ष करण्यासारख्या नाहीत. त्या नंतर जी गोष्ट घडून आल्याविषयीं सागण्यांत आले आहे, त्या विषयीं जेव्हां मी विचार करतो तेव्हां माझें चित्त अगदीं घोटाळ्यांत पडतें. सरबताचे गलासांत जोगाळ होता त्याचा रंग काळा होता असें कर्नल फेर यांनी दृढ निश्चयाने सांगितले होते. आणि दुसरे सर्व साक्षीदार या गाळाचा रंग करडा होता, अशी साक्षी देतात. परंतु त्या गाळाचें मूळतःव वि- "वेचन केल्याबद्दल आपल्यास जी माहिती कळविली आहे, जर खरी आहे तर या गाळाच्या रंगाविषयों कर्नल फेर यानी जें सांगितले आहे, याशीं कांहीं मेळ ज- मत नाहीं. तो गलास खाली ठेवल्या नंतर अर्धा तास पर्यंत तो तसाच होता. नंतर त्यातले सरबत फेकून दिल्यावर त्याच्या बुडाशीं कांहीं गदळ दिसल्यावरून त्याजकडेस कर्नल फेर यांचे लक्ष गेले. या विषयावर डाकर सीवर्ड यांनी काय साक्ष दिली, हे आपणास माहीत आहे. मी त्यांची पुष्कळ मुद्यावर उलट तपासणी केली होती, व मी त्यांस दिलासा दिला होता की, तुमची अमर्यादा करावी असे काहीं माझे मनांत नाहीं. परंतु मी गलासांतील भुकीच्या रंगाविषयी त्यांस विचारिलें न विचा रिलें तोच त्यांस संताप आला. आणि त्यांनी मला त्याबद्दल खुलासा सागितला नाहीं तो नाहींच. यावरून मला असे वाटने की त्याविषयीं खुलासा सांगण्याची त्यांस मोठी पंचाईत पडली; कारण जी भुकी कर्नल फेर यांस काळी दिसली ती त्यांस करड्या रंगाची दिसली तेव्हां ते खुलासा सांगतात काय? माझ्या ह्मणण्याचा असा भाव नाहीं की, मनुष्याच्या दृष्टीला एकाद्या प्रसंगी भ्रांति पडत नाहीं. रंगाच्या संबंधानें अस भ्रम कधीं कधीं होतो, असे माझे ऐकण्यांत आले आहे. परंतु तसे नेहमीं होत नाहीं. आणि डाक्टर सीवर्ड आणि कर्नल फेर यांच्या सांगण्यांत अशी कांही विलक्षण तफावत आहे की त्याची एकवाक्यता कधींच करता येत नाहीं. डाक्टर सीवर्ड यांनी ज्या रीतीने त्या गाळाच्या मूळतचाचा शोध केला ती रीत सर्वदां निर्दोष आहे असे नाहीं. आणि डाक्टर ग्रे यांच्या साक्षीवरून माझी अशी खातरजमा झाली, नाही की, त्या गाळांतून सोमल शोधून काढण्यांत आला आहे. जरी ते दोघे डाक्टर तःव.न्वेषण करतांना कांचेच्या नळीला काळ्या डागाची अंगठी सारखी आकृति पडल्याव-