पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सारजंट बालंटाईनचे भाषण. (२४७) दामोदरपंतांची जबानी वाचल्यावांचून व पूर्वीच्या गोष्टी मनांत आणील्यावांचून आणि त्यांवरून एकाएकी एका सिद्धांताला येऊन पोहोचल्यावांचून विषाच्या बाघा मला होत होया हे वेड कर्नल फेर यांचे डोक्यांत कोठून आणि कसे शिरले हें कांहीं कळत नाहीं. कारण त्याविषयीं त्यावेळेस त्यांनी एक- अवाक्षर काढिले नव्हतें. मी अजारी आहे असे ते म्हणत व दाळिवाचें सरबत त्यांस आवडत नसे; पण मला असे कशानें होतें हें कांहीं त्यांनी डाक्तर सीवर्ड यांस विचा रलें नाहीं. मला माहीत आहे कीं कालोडीयन या औषधाविषयी बोलण्यात आले होते परंतु पिकलेल्या गळवावर त्या औषधीचा उपचार डाक्तर सीवर्ड यांनी केला असेल असे मला वाटत नाहीं. पण जर केला असेल तर मग मात्र कर्नल फेर यांस ज्या भावना झाल्या त्या होण्याचा संभव होता. ही एक चमत्कारीक गोष्ट आहे कीं, कर्नल फेर वाईट दाळिंबाचें सरबत कुरकुर केल्यावांचून पीत असत. अगदी शांत मनोच्या मनुष्याने देखील तें प्राशन करतांना इतके तरी झटलें असतें कीं,"असें होते हैं आहे तरी काय?" पण कर्नल फेरसारख। तापड स्वभावाचा मनुष्य आपल्या जिव्हेंद्रियाचे दमन लेिल्या मोठ्या साधूप्रमाणे तें सरबत हूं कां चूं केल्या वांचून पीत असत. थोडेतें सरबत पिणे आणि बाकीचें फेंकून देणे असा प्रकार तोन दिवस सतत चालला होता. पण त्याबद्दल त्यांनी कुरकुर केली नाहीं, त्या ऐवजी दुसरे सरबत करण्यास सांगितलें नाहीं, किंवा हें असे वाईट कां होते, याविषयीं चौकशी केली नाहीं. कर्नल फेर यांची ही वर्तणुक अशी कांहीं विल. क्षण आहे की, त्याबद्दल कांहीं तर्कच चालत नाही. रावजीच्या साक्षीशी या गोष्टीचा कसा संबंध जुळतो, त्याविषयीं आतां आपण विचार करूं या. जर त्याचें ह्मणणे खरें आहे तर त्याला जी पुडी मिळाली होती, त्यांतून सोमल निराळा काढून त्याने एका निराळ्या पुडीत ठेविला होता, आणि हि- ज्याच्या भुकटीपासून कांही इजा अथवा उपद्रव होणार नाही, असे जाणून त्यानें त्या वस्तुचा उपयोग केला होता. असे असतां कर्नल फेर यांस ज्या भावना होण्याचा संभव नवता त्या भावना त्यांस झाल्या हा केवळ त्यांच्या मनोरथ सृष्टीचा व्यापार होता. आपल्यास विषप्रयोग करण्याचा प्रयत्न झाला होता, या बद्दलच्या जवान्या वाचल्यावर ह्या गोष्टी त्याच्या मनांत भरल्या. आतां आपण तारीख ६-७-९ नवंबर रोजी काय गोष्टी घडल्या त्याविषयी विचार करूं. सप्तंवर आणे आक्टोबर महिन्यांत कर्नल यास ज्या भावना झाल्या होत्या तशाच प्रकारच्या भावना त्यांस ता. रोख ६-७ रोजी झाल्या. आणि तारीख ६-७ रोजी ज्या लक्षणांचा त्यांच्या देहावर संस्कार झाला होता. तीच लक्षणे त्यांस तारीख ९ रोजी झालीं. ही गोष्ट फार च मत्कारीक आहे कीं, रावजीच्या साक्षीप्रमाणे या रोजी त्यानें सरबतांत विष काल- विले नसतांही कर्नल फेर यांस विषाच्या भावना झाल्या, दाळिंबाचा रस पुन्हा वाईट झाला; त्यांनी पुन्हा त्या वाईट सरबताची चव घेतली. पण त्यांच्याने ते सगळे पिवविले नाहीं, तथापि ग्रानी याबद्दल काही एक कुरकुर केली नाही आणि तारीख ९ वी