पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

M ( २४६) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास योजना झाली होती त्या हुद्यास ते सर्वांशीं ना लायक होते असे ह्मणणे भाग पडतें.. अशा जबाबदारीच्या व नाजूक हुद्यास अवश्य लागणारी करामत, पोक्त विचार, त्यां- च्या अंगीं नाहींत अशा प्रकारचा त्यांस पूर्वी एकदा सरकाराकडून टपका देण्यांत आला होता ही गोष्ट मल्हारराव महाराजांस माहीत होती. आतां पुढे आलेल्या दुस- ज्या एका गवरनराने कर्नल फेर साहेबांस सदरहू टपक्यापासून मुक्त केले हे खरें आहे परंतु त्यांस पूर्वी एके प्रसंगी असा टपका मिळाला होता, ह्याच एका गोष्टीवरून ते आपले हुद्यास ना लायक आहेत, व ही गोष्ट सरकारचे नजरेस आणल्यास ते त्यांस सदरहू हुद्यावरून काढतील असा गायकवाडांचा समज होता. अशांत जे लोक महाराजांचे कट्टे दुस्मान बनून राहिले होते अशा लोकांश कर्नल फेरसाहेबांनी उघडपणें स्नेह केला ही त्यांनी अतिशय अविचाराची गोष्ट केली. भाऊ पुणेकर हा ह्याच वर्गातील लोकांपैकी एक इसम होता. ह्या लोकांचें असें म्हणणे आहे कीं, आझांस कर्नल फेर साहेबांकडून द्रव्य वगैरे काही मिळाले नाही परंतु आह्मांस आ- श्रा मात्र होता. अशा लोकांचा सहवास करून कर्नल फेर साहेबांचा असा अभि- प्राय झाला कीं, भाऊ पुणेकर हा फार अब्रूदार मनुष्य आहे; असा त्यांचा अभिप्राय होण्यास काय कारण होते हैं त्यांच यांसच किंवा ईश्वरांस मात्र माहीत असेल. परंतु एवढी गोष्ट मात्र निर्विवाद आहे कीं, असा त्यांचा समज झाल्यावर भाऊ पुणेकरावर सर्वोपरी विश्वास टाकून कर्नल फेर साहेब त्याच्या तंत्रानें बागावयास लागले. याच प्रमाणे अधिकाराच्या जुलुमानें वस्त झालेल्या रयतेस व्यापासून मुक्त करणे हैं एक चमत्कारीक वेड साहेबांचे डोक्यांत शिरले होते. व आपण काय ते लोकांचे एक वाते आहोत असे त्यांस वाटत होते. साहेब बाहेर फिरावयास निघाले न निघाले कीं, त्यांचे सभोवत अर्जदारांच्या झुंडीच्या झुंडी जमत, व तेही त्यांचें सर्व ह्मणणे मो- ठ्या खुषीनें ऐकून घेत. असे प्रकार वृथा अभिमान बाळगणाऱ्या अशा पुरुषास आतां भाऊ पुणेकरासारख्या आपल्या कट्टया दुस्मानाशी कर्नल फेर साहेब हरहमेष खलबतें करीत बसतात, व आपले राजकारभाराविरुद्ध कोणीही कांही फिर्याद केली, की ती ऐकण्यास साहेब मजकूर आपले एके पाया- • वर तयार आहेतच, हा सर्व प्रकार पाहून महाराजांस काय वाटले असावें ह्याजविषयीं मीं बर सांगितलेंच आहे. अशा स्थितीत राज्यांत सुधारणा करणे किती परम दुर्घट हो- तें हैं तर सांगावयासच नको. ह्याच वेळी कर्नल फेर साहेबांचे डोक्यांत दुसरे एक वेड शिरले होते व तें हें की त्यास कोणी तरी विष घालून मारील; हें वेड त्यांचे डोक्यांत कसें शिरले हें समजत नाहीं; परंतु भाऊ पुर्णेकरासारख्या मनुष्यानें तें बेड त्यांचें मनांत मरून दिले असावें असें दिसतें. नेहमीं प्रीय असतात. सप्टेंबर किंवा आक्टोबरच्या सुमारास कर्नल फेर यांचे कपाळावर एक गळू झा- लें होतें. ह्या प्रकरणांत हैं गळं कांहीं मी महत्वाचा मुद्दा आहे असे समजूं नये. त्या गळवावर दुसऱ्या पुष्कळ गोष्टी अवलंबून असून त्याची हकीगत अंमळ गमती- ची आहे. ह्या गळवावर उपचार करण्याचे काम एका विख्यात वैद्याकडेस होतें.