पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सारजंट बालंटाईनचें भाषण. ( २४५ ) कर्नेल फेर साहेबांस त्या राजांस माहीत होती. दिवशीं विष घालण्याचा प्रयत्न झाला होता ही गोष्ट महा- खटला सुरू होण्यापूर्वी फिर्यादीतर्फे झालेल्या भाषणांत अशाच प्रकारचा मजकूर आपणास सागण्यांत आला होता. आतां विषप्रयोग झा- ल्यावर कोणत्या प्रकारच्या भावना होतात हे साधारणपणे महाराजांस माहीत अस ल्यामुळे त्यांनी तशाच प्रकारच्या भावना आपल्यास स्वतः स्वाभाविक रीतीने झाल्या असे बोलण्यांत दाखवून कर्नल फेर साहेबांचे मनांत आलेला वहीम दूर करावा असा त्यांचा विचार असावा असे खटला चालविणाराचे म्हणणे दिसते; परंतु खरा प्रकार कसा आहे तो पहा. डाक्टर सीवर्ड साहेबांस त्याच दिवशीं कर्नल फेर साहेबांनी लिहिलेल्या पत्रांत आपल्यास कोणत्या व कशा प्रकारच्या भावना होतात ह्यानविषयी लिहिले आहे तो मजकूर असा. “सरबताचे मी दोन तीनच घोट घेतले परंतु ते घेतल्यापा- सून सुमारें अर्ध्या तासांत माझे पोटांत ढवळू लागले, डोके फिरावयास लागले, दृष्ट ही थोडिशीं मंद झाली, मनांत येणाऱ्या विचारांचा घोटाळा होऊं लागला, तोंडाची स्वाभावीक चव जाऊन कळकटचव लागूं लागली, व तोंडास पाणी विशेष सुटायला लागले” येणे प्रमाणे भावना कर्नल फेर साहेबांस होऊं लागल्या असे त्यांचे लेखा वरूनच स्पष्ट होतें; व त्या दिवशीच्या आपल्या भेटीचे वेळी अशाच भावनांचे वर्णन महारा- जांनी कर्नल फेर यांजजवळ केले असे फिर्यादीतर्फे म्हणणे आहे. परंतु कर्नल फेर साहेबच स्वतः आपले जबानींत काय लिहून देतात तें पहा. ते असे ह्मणतात कीं, "मी महाराजांस आपली प्रकृती कशी काय आहे असे विचारल्यावरून मा- झी प्रकृती बरी नव्हती व शहरांत हिंवाचा अजार बराच असून दिवाळीत पक्काने माझे खाण्यांत विशेष आल्यामुळे माझी प्रकृती बिघडली असावी असे महाराज ह्मणाळे. माझें मस्तक दुखत असें व पोटांतही थोडीशी कळ करी परंतु आतां माझी प्रकृती बरी आहे असें ही महाराज ह्मणाळें" प्रासिक्यूशनतर्फे झालेल्या पहिले भाषणांत व ह्या जबानीत यत्किंचितही मेळ नाहीं त्या दिवशीच्या महाराजां- चे वागणूकीत अतिशय संशयखोर मनुष्याच्याही मनांत त्यांचेबद्दल वहीम उत्पन्न करणारा असा काही प्रकार नव्हता असे ह्मणणे भाग पडतें. अशा लोकांच्या सा- क्षीवर भरंवसा ठेवून मल्हारराव महाराजांस दोषी ठरवून त्यांची अब्रू कमी करावी, त्यांचे संस्थान त्यांजकडून हिसकावून घ्यावें, व त्यास कायमची काळिमा लावून त्यांची नीच लोकांत गणना करावी असा अभिप्राय देण्याविषयी आपल्यास खटला चालविणाराकडून सांगण्यांत आले आहे; परंतु प्रतिज्ञा घेऊनही ढळढळीत खोट्या जगन्या देणाऱ्या साक्षीदारांवर आपण भरवसा ठेवणार नाही अशी माझी खात्री आहे. आतां ह्याच ठिकाणी कर्नल फेर साहेबांच्या साक्षीविषयीं मी दोन शब्द बोलतों. कर्नल फेर सा- हेब हे ह्या खटल्यांतील प्रमुख नायक आहेत ते फार प्रामाणिक, व अब्रूदार गृहस्थ असून सरकारच्या शूर व विख्यात कामदारांपैकी एक आहेत. ह्याजविषयी मला वि लकूल शंका नाहीं, व अशा कामदाराविषयीं वाजवीपेक्षां ज्यास्त कडू शब्द बोलण्याची माझी खरोखर इच्छा नाहीं; परंतु बडोद्याचे दरबारी ज्या नाजूक कामावर ह्यांची