पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२४४) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. णत्याही कारणावरून माफी मिळाली जाणार नाहीं असें निक्षून सांगितलें असतां त्याने सत्यास स्मरून सांगितलेली हकीगत, व पुढे आपल्या हातून घडलेल्या पापाचा त्यास पश्चात्ताप होऊन त्यानें विहिरींत उडी घालून आत्महत्या करण्याचा केलेला प्रयत्न; तिसरा मार्ग तारीख ९ नवंबर रोजी कर्नल फेर साहेबास आपले सरबतात काही तरी पदार्थ घातला आहे असे कळून आल्यानंतर नेहमींच्या वहिवाटीप्रमाणे मल्हारराव महाराज त्या दिवशी त्यांस भेटा- वयास आले तेव्हां त्यांच्या बोलण्यात निघलेला प्रकार; या तीन मागांपैकी पहिल्या मार्गाविषयों मला जें कांहीं बोलावयाचें तें बोललोंच आहे. एक तर पोलिसांचे ता- ब्यांत असलेले साक्षीदारांच्या जबान्यांत मेळ पडतो या ह्मणण्यांत कांहींच अर्थ नाहीं; परंतु विशेष महत्वाची गोष्ट अशी आहे कीं, जो साक्षीदार गजानन विठ्ठल आदिकरून पोलीस अधिकारांच्या ताब्यांत नव्हता व ज्याची मूळ जबानी स्वतंत्र रीतीनें मुंबईस एका जस्टीस ऑफ दी पीस समोर झाली असा साक्षीदार जो पेट्र् यानें • तर प्रासिक्यूशनचा खटला हाणूनच पाढला आहे असे ह्मटल्यावांचून राहवत नाही. आतां नरसूचें जबानीविषयीं विचार करतांना तो जरी माफीचा साक्षीदार नाहीं, तथापि जो गुन्हा घडून आला असे त्याचें ह्मणणे आहे त्या गुन्ह्यांत रावजी प्रमाणे- च त्याचेही मुख्य अंग असल्या कारणानें, त्याचे जबानीवर फारसा विश्वास ठेवतां येत नाहीं. नरसने रोसडेन्सीच्या आवारांतील एका विहीरीत उडी घालून आत्म- हत्या करण्याचा प्रयत्न केल्याविषयी बोलतांना माझे विद्वान मित्र आडव्होकेट जन- रळ यांनीं सद्गदीत अंतःकरणाने त्याला आपल्या हातून घडलेल्या पापाविषयीं मोठा पश्चात्ताप होऊन त्यानें तसे करण्याचा प्रयत्न केला, असे बोलून दाखविलें; परंतु तशा प्रकारचा मजकूर नरसू आपल्या जबानीत मुळींच सांगत नाहीं. एक दिवस मी यथेष्ट जेवल्यानंतर माझें मस्तक फिरून मला गिर्की आली व मी विहीरींत पड- लों परंतु मीं होऊन विहीरींत उडी घातली नाहीं अशी त्यानें आपल्या जवानी दिली. . आतां तिसरे प्रमाणांविषयीं आपण विचार करूं. फिर्यादीतर्फे आप- ल्यास असे सांगण्यांत आले आहे की, तारीख ९ नवंबर रोजी मल्हारराव महाराज कर्नल फेर साहेबांचे भेटीस आले तेव्हा त्यांनी कर्नल फेर साहेबांस आपली प्रकृती कशी काय ह्मणून विचारिलें, व नंतर शहरांत हल्ला बराच अजार असून आपल्यास ज्या तऱ्हेचा अजार झाला आहे तसाच मला ही झाला होता, परंतु हल्लों मी बरा आहे असें बोलून आपल्या स्वतःला ज्या भावना झाल्या होत्या त्या कर्नल फेर साहेबांस सांगि- तल्या; व त्या ऐकून कर्नल फेर साहेब.स पराकाष्ठेचे आश्चर्य वाटलें; कारण साहेबा स्वतः त्या दिवशी ज्या प्रकारच्या भावना होत होत्या त्याच भावनांचे महाराजानी व र्णन केलें महाराजांचे ह्या प्रमाणें ज्या वेळेस भाषण झाले त्या वेळेस आपल्यास विष घातले आहे असे कांही कर्नल फेर साहेबांस खात्री पूर्वक माहीत नव्हते; परंतु रोसडें ●न्सींतून शहरांत परत जातांना वाटेत दामोदरपंतास गाडींत घेतल्यानंतर महाराजांचें व यांचे जे भाषण झाले अशाविषयीं तोच जो मजकूर सांगतो तो जर खरा असेल, तर