पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(सारजंट बालंटाईनचें भाषण: ( २४३ ) - आहे व तो लबाड मनुष्य आहे असेही आपल्यास त्याने सांगितलें आहे. आतां पेठ्रनें हा भरवंशा लायक असा साक्षीदार नाही, अशा विषय फिर्याद चालविणाराकडून कोणत्याहि प्रकारचें प्रतिपादन झाले नाही तेव्हां ज्यास्त बोलण्याची आतां मला ज रूरच नाहीं. खटला सुरू होण्यापूर्वीच फिर्यादीतर्फे जें भाषण झाले त्यांत नवंबर महिन्याचे पूर्वी कर्नल फेर यांस विष घालण्याचा प्रयत्न यत्किचितदेखील उल्लेख नाहीं. होता परंतु झाला अशाविषयीं रावजी मात्र आपल्या जबानींत सप्टेंबर महिन्यांत अशा प्रकारचे प्रयत्न ल्याचे सांगतो. दुसरा आणखी असा चमत्कार आहे कीं, तारीख ६ व तारीख ७ नवबंर रोजी कर्नल फेर साहेबांस विष घालण्याचे प्रयत्न करण्यांत आले होते असे जरी खटल्याचे आरंभी झालेल्या भाषणांत आपल्यास सांगण्यांत आले होतें, तरी देखील रावजी आपले जवानींत त्यांजवदल एक अक्षरही सांगत नाहीं, इतकेंच नव्हे तर सदहू दोन तारखेस साहेबांचे सरबतांत मी विष घातले नाही असे त्याचे अग्रहपूर्वक ह्मणणे आहे. तो तर उलटे असे ह्मणतो कीं, सरवतांत घालण्याकरितां मज जवळ दिलेले सर्व विष मी एकेच दिवशी ह्मणने तारीख ९ नवंबर रोजों सरब- तांत घातले. फिर्यादीतर्फे आणखी आपल्यास असे सांगण्यात आले आहे कीं, सोमल व हियाची भुकटी या दोघांचें मिश्रण केलेली अशी एक पुडी शलमनें रावजीस दोन वेळा दिली. परंतु रावजीचे सांगण्यांत हा प्रकार मुळींच येत नाहीं. तो अ म्हणतो की, मला दोन पुड्या निरनिराळ्या व मिश्रण न केलेल्या अशा देण्यांत आल्या, व त्यांपैकी एक सोमलाची असून दुसरी हिऱ्याचे भुकटीची व गुलाबी रंगाची होती. रावजीच्या पञ्च.चे कप्यांत जी एक झाडा घेतेवेळी सोमलाची पुडी सांपडली असे दोषारोप करणाराचें म्हणणे आहे, त्या गोष्टीचें पुष्ठी कर णांत रावजीने हो बनावट हकीकत सांगितली असावी, असे मानल्या वांचून फिर्यादीतर्फे झालेल्या पहिल्या भाषणांत व रावजीच्या जबानींस जो विरोध दृष्टी- स पडतो त्याचा मेळ घालणे कठीण आहे. निरनिराळ्या साक्षीदारांचें एकमेकां- शीं यत्किंचितही दळण वळण झाले नसून, सर्वांनीही पुष्कळ अंशीं एकमेकांशीं मेळ पडणाऱ्या जबान्या दिल्या हे मल्हारराव महाराज अपराधी आहेत. असें मान.. ण्यास सबळ प्रमाण आहे असे फिर्यादीतर्फे ह्मणणे आहे; परंतु गजानन विठ्ठल, अकबर अल्ली व अबदुलअल्ली अशा सारख्या पोलीस अमलदारांचें स्वाधीन सदहू साक्षीदार असून त्यांचे एकमेकांशीं दळण वळण झालें नाहीं असें मानों परम दु- र्घट आहे. रात्रजी व दामोदरपंत हे दोन फिर्यादीतर्फे मुख्य साक्षीदार आहेत, परंतु दोघे ही माफीचे साक्षीदार असल्यामुळे त्यांचे साक्षीस. वजन येण्यास स्वतंत्र साक्षीदारांची जरूर आहेच. रावजी व दामोदरपंत यांच्या जबान्यांतील खरेपणा- चा पडताळा पाहण्यास तीन मार्ग आहेत. पहिला मार्ग ह्या खटल्यांतील निरनि- सळ्या साक्षीदारांचें एकमेकांचें कोणत्याही रोतीचे दळण वळण नसतां सर्वांनी ए- क सारखाच मजकूर सांगितला हा एक; दुसरा मार्ग नरस जमादार ह्यांस तुला को... झा-