पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २४२) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. परंतु असा मोठा गुन्हा शाबीत करण्याच्या काम प्रथमारंभी तो करण्याचा हेतु दाखविला पाहिजे हे त्यांजला माहीत आहेच; परंतु ते काय करतील ? कारण अम क्या हेतूने हा गुन्हा केला असे दाखविण्यास गायकवाडांचे एकही कृत्य त्यांस आ. ढळत नाहीं. प्रथम त्यांनी रेसिडेंटाच्या चाकरास फितविल्याविषयों सांगितले व त्यांत आया ही मुख्य संपादणी करणारी आणिळी; परंतु तिचा व रावजी व नरसू यांचा काही संबंध दाखविला नाहीं व याच बाबतीत पेद्र ह्मणून एक इसम त्यानी आ गिळा व त्याचे वर्णन केले कीं, तो कर्नल फेरचा पंचवीस वर्षांचा बुटलर होता. नंतर माझे मित्र ह्मणाले कीं, आतां मी या मुकदम्याच्या विशेष महत्वाच्या भागाची हकीकत सांगतों-ह्मणजे या मुकदम्याचे त्यांनी दोन माग केले व पहिल्या मागाच्या संबंधाने आया व पेद्र व आणखी एक दोन असामी यांच्या कृत्यांचे वर्णन केलें, व मग विषासंबंधी आरोपाच्या साक्षीदारांच्या कृत्यांचे वर्णन केले; परंतु पेडू याला कोणत्या भागांत घातळा हे पाहणे फार आ बश्यक आहे. कारण त्या मनुष्याचा संबंध खरें झटके म्हणजे या मुकदभ्याच्या दुसऱ्या भागाशीं आहे. तो असा की, या मुकदम्यांतील ज्या दुसऱ्या तकरारी आहेत त्या सोडून दिल्या तरी देखील त्याच्या साक्षीचा एका प्रकारचा आशय घेतला, तर त्याजवरून गाइकवाडांवर जेवढे आरोप केले आहत तेवढ्याविषयीं ते निर्दोष आहे असा ठराव होण्याचा त्यांस हक्क प्राप्त होतो. ह्मणून मी ह्मणतों कीं, पेट्रूला या मुकदम्यांत कोणत्या रीतीनें आणिला आहे याविषयों विचार करणे फार • महत्वाचे आहे. गुन्हा शाबीत करण्याकरितां मुकदम्यांत कोणत्या प्रकारचे साक्षी व कशा रीतीने आणावे लागतात त्यांच्या युक्ति चीफ जस्टिस महाराजांस ठाऊकच आहेत. ह्मणजे ज्याच्या साक्षीविषयी काहींसा संशय असेल तो साक्षी- बदार पुढे आणावा कीं न आणावा याचा विचार पडत असतो. पेद्रु हा साक्षीदार भरंवसा ठेवण्या लायक आहे असे आपणास कज्या चालविणारा- कडून सांगण्यांत आले आहे. हा साक्षीदार कर्नल फेर साहेबांजवळ पंचवीस वर्षे पयंत बटलरचें काम करीत असून त्यांचे फार विश्वासाचा आहे. माझ्या विद्वान मि वांनीं त्याच्या अब्रूस किंचित देखील कलंक लागला आहे असे दाखविलें नाहीं. त्यांनीं तो मोठ्या अब्रूचा आणि विश्वास ठेवण्यास योग्य ह्मणून त्यास न्यायसभेपुढे आणिला आहे. अशा साक्षीदाराने दिलेल्या जबानीवर विश्वास ठेवावयाचा म्हटलें म्हणजे कमीशनापुढे असलेल्या खटल्याचा निकाल लागलाच. कारण ह्या साक्षीदारा ची जबानी घाचून पाहिली ह्मणजे कज्या चालविणाराने आपला खटला नाशात्रीत झाला असे समजून कज्या काढून घेतला पाहिजे. ह्या सर्व खटल्यांतील मुख्य नायक रावजी ह्यांचे जबानीवर स्वतंत्रपणे भरंवसा ठेवतां येत नाहींच; कारण जो गुन्हा झा- लेला आहे असें त्याचें ह्मणणे आहे त्यांत तो मिलाफी आहेच; परंतु पेद्रूने दिलेल्या जबा नीचा विचार केला म्हणजे रावजीने दिलेल्या जबानीवर विश्वास ठेवावा किंवा नाहीं हा प्रश्नच निघत नाहीं; कारण रावजीने सांगितलेल्या कित्येक गोष्टींचें पट्र्ने खंडन केले