पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास.

संवत १९२४ अखेर एकंदर महालचे हिशेब आबाजी गोविंद घासकडबी, सरसुभे यांचे दफतरदार, याणी तयार केलेले त्या वेळच्या जमाखर्चाच्या उत्तम व्यवस्थेचे दर्शक आहेत.* हे गृहस्थ बडोद्याच्या राजधानीत जमाखर्चाचे कामांत चित्रगुप्ताप्रमाणें हुषार असून त्याणी एकसारखी चाळीस पंचेचाळीस वर्षे एकनिष्ठेनें राजसेवा केली होती व त्याबद्दल खंडेराव महाराज याणी त्यांस वंशपरंपरेने गांव इनाम दिले होते, परंतु मल्हारराव याणी ती खंडेराव यांची देणगी म्हणून त्यांच्या मुलापासून ते गांव हिसकून घेतले.

दिवाणी काम चालविण्याच्या रीतीचा कायदा व फौजदारी व मुलकी कायदे हे खंडेराव

महाराज यांचे अमलांत त्यांच्या दरबारांतील कामदार मंडळीनींच तयार केले आहेत. त्यावरून गायकवाडाच्या दरबारांतील कामदारांमध्ये स्वराज्याचा कारभार चालविण्यापुर ज्ञान होतें असे दिसून येतें.

पोलीस खात्याचा अधिकार मुख्य फौजदारीचे अधिकारी यांजकडे होता. त्यांणी

उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम असे राष्ट्राचे चार भाग करून त्याजवर सर फौजदार झणून कामदार नेमिले होते. त्यांजकडेसच पोलिसाचा अधिकार दिला होता. बडोदें शहरांत पोलिसाची व्यवस्था इतकी उत्तम होती की, चोरी वगैरे उपद्रवापासून बडोद्याचे लोकांस फारच थोडा उपद्रव होत असे. प्रत्येक महालामध्ये महालच्या विस्ताराप्रमाणे ठाणेदार नेमिले असत. पाटील कुळकर्णी याणी गांवचा वसूल करून महालचे अधिकारी यांजकडे पाठवावा, आणि त्याणी महाला- नीहाय सरसुभे यांचे दुकानांत पाठवावा अशी वहिवाट होती, आणि सरसुभे यांचे दुकानांतून सरकारच्या वरातीप्रमाणे ऐवजाची व्यवस्था होत असे. अनेक वर्षांपासून चालत आलेल्या जुन्या रीतिभातीमध्ये खंडेराव महाराजांच्या अमलांत एकाएक इतके स्थित्यंतर झाले, ही कांहीं सामान्य महत्वाची गोष्ट नाहीं. गणेशपंत भाऊ यांच्या राज्यकारभाराची पद्धत पाहिली असतां त्यांस ह्या नव्या नव्या चाली आवडत नसत, आणि ते होते तोपर्यंत खंडेराव महाराज यांचे अमलांत पूर्वापार चालत आलेल्या सांप्रदाया- प्रमाणे राज्यकारभार चालत होता. ते गेल्यावर कर्नल वालीस त्या वेळचे रेसिडेंट यानीं राजा सर टो. माधवराव यांच्या कारकीर्दीतील हिशेबी खात्याच्या कामदारांनी ते हिशेब पाहून लाजावें अशी हल्लींच्या हिशेबाची लाजिरवाणी स्थिति आहे. या खात्यांत हजारों रुपये पगाराचे लोक आणून भरले आहेत, आणि सहा वर्षे निघून गेलीं पण कशास कांहीं ताळ मेळ नाहीं. तिजोरींतून नुसते पैसे देण्याकरितां पाऊणशे रुपये दरमहाचा एक कामदार आहे !! व्यवस्था करणा- राने यापेक्षां ती उत्तम व्यवस्था काय करावी !! पण दिवाण यांस हैं खातें बेटे कांहीं यशच देत नाहीं. + राजा सर टो. माधवराव याणीं त्याबद्दल त्यांच्या मुलास कांहों नेमणूक करून दिली आहे, पण तीही अशाश्वत आहे. न्यायाने पाहिले असतां आबा घासकडवी यांच्या संततीस खंडेराव महाराज यांच्या सनदेप्रमाणे गांव परत मिळाला पाहिजे. मल्हारराव महाराज यांचा अन्याय- रूपी अंधःकार इतका गाढ होता की, त्यांत सर टी. माधवराव यांचें स्वल्प कृत्य देखील सूर्याप्रमाणे प्रकाशित होतें. आबा घासकडवो यांस खंडेराव महाराज याणीं वंशपरंपरेची करून दिलेली सनद सर टी. माधवराव याणी देखील मानिली नाहों, याबद्दल त्यांस कोणी वाईट ह्मणत नाहीं, परंतु त्याणों करून दिलेल्या नेमणुकीबद्दल त्यांची प्रशंसा करितात असे ते भाग्यशाली आहेत.