पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सारजंट बालंटाईनचें भाषण. ( २३९ ) नित्याच्या क्रमाममाणे उद्योग करीत होता-झणजे दररोज सर लुईस पेलीच्या भेटी घेत होता व व्हाइसराय यांच्या सूचना अमलांत आणण्याकरिता पेली साहेबांशीं मोठ्या काळजीनें खलबतें करीत होता; पण मला तर असे वाटते कीं, या त्याच्या वर्तणुकीवरून तर असे दिसतें कीं, जो त्याजवर आरोप आला आहे त्यांजविषय तो निर्दोषी असावा. कारण रावजी व नरस हे जर त्याच्या दुष्कर्माचे गुप्त साधक होते व तो व ते नित्य शहरांतच होते तर त्याजला किंवा त्यांच्यांतून पा हिजे त्याला दररोज भेटण्याची व त्यांना मथविण्याची त्याला सवड नव्हती का ? असे असतां तो कसा वागला याचा कमिशनाने विचार करावा. याचप्रमाणे सा- टीम व यशवंतराव यांच्या संबंधानें मल्हारराव कसा वागला हें आता आपण शोधूं या. तर याविषयीं सर लुईस पेली यांनी साक्ष काय दिली ती पाहा व त्यांच्या सं. बंध पत्रव्यवहार पुराव्यांत आला आहे तो आपण पाहावा. तर त्यांजवरून त्या दो घांला कशासाठी बोलावले व त्यांची कशाविषयीं विचारपूस होणार याविषयीं तर कांहींच संशय राहिला नव्हता. असे असतां गायकवाडानें कशी वर्तणूक केली ब रें | तुझी ह्मणाल कीं, त्यांत काय मोठें नवल ! त्यांना पाठवून दिलें हें सगळे ढोंग व दगा व बाहेरचा डौल होता, व आंत एक व बाहेर एक अशी त्याची कृति हो- ती; पण ढोंग ह्मणावें तर त्याच्या पूर्वीच्या वर्तणुकीशीं त्याचा जमाव जमत नाहीं. पूर्वी याप्रमाणें कधींही त्या ढोंगी वर्तणूक केली न. व्हती. निदान ही तर गोष्ट उघड आहे कीं, काहीं कांकूं न करता त्या दोघाची त्याणें रवानगी करून दिली व त्यांच्याशी अगदीं तिळमात्र कोणाही मनुष्याचा संबंध होऊ दिला नाहीं. त्यांना रेसीडेन्सीमध्ये जाऊं दिले; व हुशार पोलिस अंग- लदार व इंग्रज सरकारच्या हाती दिले असता त्यांजवर किती अंमल चालेल व त्यांना काय काय सोसावें लागेल हे जाणत असतां त्यांना जाऊं दिले; पण हा राजा खुनी होता तर त्याणें त्यांना फितविण्याचा किंवा बिघडविण्याचा किंवा त्यांना अ गदींच नाहीसे करण्याचा इलाज का केला नाहीं? या वेळेस गायकवाड कांही अट- केत नव्हता, तो मोकळा होता, व त्यावेळेस सालीम व यशवंतराव हे त्याचे चाकर होते, एवढेच नाहीं; ते त्याच्या अमळांत होते. असे असतां जेव्हां जेव्हां त्यांस बोलावणे आले तेव्हां तेव्हा त्यांच्याशी कांहीं एक संभाषण किंवा व्यवहार न करितां त्यांस ताबडतोब पाठवून दिले, व आपण जातीनिशीं होऊन रोसडेंटास कळविले कीं, या चौकशीसाठी जी मदत लागेल ती करण्यास मी तयार आहे. अशी वर्त- णूक व हिम्मत खुनी मनुष्याची होईल कां? एवढाच आपण विचार करावा. मला तर ही गोष्ट संभाव्य दिसत नाहीं, ह्मणून मी ह्मणतों की, मल्हारराव गायकवाडा- ची या प्रकरणाच्या पूर्वीची वर्तणूक पाहिली असतां व त्याचें खरें हित काय हें तो जाणत होता असे मानिलें तर असे दिसतें कीं, विषप्रयोग करण्याचे त्याने मनांत आणिलें असे बिलकुल संभवत नाहीं, व नंतरची त्याची वर्तणूक पाहिली तर असे निःसंशय दिसतें कीं, त्यांत तो बिलकुल सामील नव्हता, हे त्याच्या वर्तणुकीसंबंधीं