पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२३८) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. लागलें होतें त्याचें मन ज्या प्रयत्नापासून तो खलिता अगदी निष्फल होईल, एवढेच नाहीं, परंतु ज्यापासून कदाचित् दुसरा कठीण रोसडेंट येईल व सख्तीची चौकशी उत्पन्न होऊन तिचें परिणाम भयंकर होतील अशा प्रयत्नाकडे कदापि ही लागायाचें नाहीं असे मला वाटतें. हा खलिता जा. ईपर्यंत गायकवाडाची वर्तणूक कशी होती याविषयीं मी आतां बोलून चुकलों. आ तां तेव्हांपासून तो व्याजवर संशय येण्याच्या पूर्वीच्या वेळांत त्याची वर्तणूक कशी होती हैं आपण पाहू या.. त्या वेळांत तो कसा वागत होता याविषयों सर लुईस पेली यांनी साक्ष दिलीच आहे कीं, त्या वेळांत त्याजला कांहीं प्रतिबंध नव्हता; तो मोकळा होता, त्याजवर पाहारा नव्हता व कोणत्याही रीतीने त्याला हवेंतसे वाग ण्यास मोकळीक होती. आतां फिर्यादी तर्फे असे सुचविणें आहे कीं, यावेळीं या भयंकर गुन्ह्याची माहिती या मनुष्याला होती, व ज्या मनुष्यावर संशय आला होता तेच या गुन्ह्याचे प्रत्यक्ष कर्ते आहेत असे त्याला ठाऊक होते व कांहीं चौकशी झाली व कांहीं होणे आंह; व असा भांग लागत चालला आहे कीं, सरते शेवटी खरा गुन्हेगार सांपडल्यावांचून राहाणार नाही. हेही त्याला ठाऊक होते. यावेळी त्याचा चिटणीस दामोदरपंत याजवर आरोप ठेवला गेला नव्हता. दामोदरपंताच्या आंग आणखी काही गुण नसात; परंतु त्याच्या आंगीं बुद्धीची कांहीं कमताई दिसत नाहीं. असा तो दामोदरपंत मोकळा होता. तेव्हां जें जे अधिक उणें वर्त्तमान झाले असेल तें तें यानें गायकवाडास कळविलेंच असेल व तें कळवीत गेलों अशी त्यागें साक्षच दिली आहे. तर दामोदरपंताची जबानी खरी मानिली असतां असे. निघतें कीं, या मकरण गायकवाडाचें चित्त जागृत झाले होते. निदान रावजी व नरस यांस कैद केले होते व या प्रकरणाची चौकशी चालू झाली होती याजवरून तरी त्याचे मन जागृत व्हावें. म्हणजे अशावेळी आपल्यावर गुन्ह्याची शाबिती न होण्याचे मार्ग त्याणे शोधूं लागावे. राजाची जीं साधनें असतात ती त्याच्या हाती. पूर्णपणें होतीं. अशावेळी जी कामे तो करू इच्छितो ती करण्यास पाहिजे तितका पैसा त्याचे हातीं होता. तर अशावेळी त्याची वर्तणूक कशी होती है तुझी पाहा. गुन्हेगा र असता तर तो वागला तसा तो वागता का? मी ह्मणतों कीं, तसा तो कधीही वागळा नसता. त्याची वर्तणूक निरपराधी मनुष्यासारखी होती; कारण रावजीशीं किंवा नरसूशीं त्याचा त्यावेळीं कांहीं व्यवहार चालला होता का ? मुळींच नव्हता; पण तो होता असे कोणी खोटें देखील या मुकदम्यांत बोलूं शकला नाही. मग खरा व्यवहार कोठून असेल ? अशावेळी त्याणे जातीनिशीं किंवा कोणी मनुष्याच्या द्वाराने त्या दोघांना लांबविण्याचा प्रयत्न केला असें तरी कोणी सांगतो आहे का ? सारांश फिर्यादीतर्फेची हकीकत खरी असेल तर असेंच झटले पाहिजे कीं, व्याच्या बैठकीखाली जसा काय दारूचा सुरुंगच केला आहे व त्याला पेटविण्याचा मात्र अवकाश आहे व तो पेटला की, आपली एकदम जळून खाक होऊन जाईल असे त्यास ठाऊक असतां तो निश्चित त्या बैठकीवर स्वस्थ बसला होता व आवस्था