पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २४० ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. विचार जे मी सांगितले स्यांपासून जरी आपल्या मनावर त्याजला फार अनुकूल असा ग्रह न उत्पन्न झाला तरी कांहीं तरी हाईल अशी मी अशा बाळगतो. आता मी नवा विषय आभितों या पुराव्यात असे सांगण्यात आले आहे की, आया वगैरे यांस क्षुल्लक बातम्या कळविण्याबद्दल मोठमोठ्या रकमा गायकवाडाने दिल्या. अ सा हा पैसा उधळणारा असून हे खुनाचे ज्यावेळेस घाटत होते त्यावेळेस त्याणे कोणास एक पैसाहा दिल्याचा पुरावा नाहीं हैं कसें बरें ? ह्मणजे बातम्या मिळविण्याकरितां त्यॉग शेकडों रुपये दिले; परंतु खून करण्यास जे याला सामील झाले त्यांना याणे त्या संघास कबडी देखील दिली नाहीं असा ह्या मुकदम्यांतील पुरावा आहे, तो किती असंभाव्य आहे याचा आपण विचार करा-ह्मणजे नरसू व रावजी हे बापडे किती भिडस्त व मनमानणारे होते की, त्यांनी खुनाकरितां कधीं पैसा मागितलाच नाहीं असे ते ह्मणतात. असे ते बोललं ही त्यांची परंतु कृपाच ह्मणायाची; कारण त्यांच्या हाती आझी सांपडलो होतो; पैसा घेतला असे सांगितले तर त्याची व्यवस्था काय केली हें दाखवावे ·लागेल व तें कठिण पडेल ह्मणून, किंवा तो परत द्यावा लागेल असे त्यांस वाटले असेल म्हणून, कदाचित त्यांनी असे सांगितलें असेल. कसेही असो; परंतु ही गो- ष्ट केवढी सृष्टिक्रमाविरुद्ध आहे याचा आपण विचार करा. पैसा घेतल्याशिवाय विष देण्यास ह्मणजे र्ूवन करण्यास कोणी तरी मनुष्य तयार होईल का ! आणखी एक अलौकिक गोष्ट या मुकदम्यांत झाली आहे ती आता सांगतों. एक साक्षी- दार म्हणतों कीं, मल्हारराव गायकवाड मोठा हुम्या आहे म्हणजे आपल्या मनां- तील विचार कोणास सहसा कळू देत नाहीं. तर असा हा गुप्त विश्वारी मनुष्य • सुमारे अर्ध्या खंडीभर मनुष्यांस आपला खनी विचार कळवून त्यांच्या हाती आप- 'ही मान देईल का ? असे असता जसे काय कर्नल फेरचा जीव घेण्याचा गायक- वाडाने उघड बाजारच मांडला होता अशी फिर्यादीतर्फे हकीगत सांगण्यांत आली आहे तर ही अलौकिक गोष्ट नव्हे काय ? जसें काय आपणावर पक्का पुरावा बना- वा ह्मणूनच तो झटत होता असे दाखविण्यांत आलें आहे. कारण जर हे कृत्य त्याच्या मनांत करावयाचे होते तर एखादा मनुष्य त्याणे मिळवून घेतला असता ह्मण- जे ते झाले असते. असे असतां जसे काय आपल्या विरुद्ध पक्का मजबूत पुरावा व्हावा ह्मणूनच तो ज्याला त्याला आपला विचार सांगत सुटला व खंडीभर दार आपल्या भोवती जमवले व पुनः एवढ्यांचे कामही काही दिसत नाहीं. पैकी चार पांच तर धारलेल्या मतलबाच्या कांहींच उपयोगी नव्हते. हें माझें खरें दाखविण्यास नरसू हा उत्तम दाखछा आहे. नरसूची आरंभापासून तो शेवट पर्यंत जबानी पाहा ह्मणजे चकचकीत दिसून येतें कीं, त्याला साक्षी करण्यांत राव- जीच्या गोष्टीचें पुष्टीकरण करविण्याच्या मतलबाशिवाय दुसरा कांहींच उपयोग दि. सत नाहीं. मग या गुन्ह्याच्या संबंधानें त्याची गायकवाडाशीं कां गाठ घालून दिली असेल याचा मतलब वर सांगितल्याशिवाय दुसरा दिसत नाहीं. त्याला फि. साक्षी- सां ह्मणणे