पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सारजंट बालंटाईनचें भाषण (२३७) सा- . लागेल हे त्या राजाला ठाऊक झाले व ज्या मनुष्याशी त्या खलियाचा जबाब आ ल्याच्या पूर्वी आणखी एकाद्या रीतीने वागल्यापासून आपणास काहीच उपयोग घ डणार नाहीं असे ज्या राजाला ठाऊक तोच राजा काही लुच्चांच्या नादी लागून या. मनुष्याला विष देण्याचा प्रयत्न करण्याचें कर्म करीत होता असे फिर्यादी तर्फेचें सांग.. णे आहे, व त्या घाणेरड्या कर्माचें वर्णन तर काय विलक्षणच केले आहे.. सोमल, हिप्याची भुकी, विषाच्या शिशा व विष तयार करण्याच्या कृति तर पुरातन- काळी भयंकर अज्ञान्यांपैकी अवशिष्ट राहिलेल्या ज्या काही असतील त्याच. रांश ज्या विषाचे व कृतीचें वर्णन आरबी भाषेतील सुरस गोष्टींमधील वर्णनासारिखें दिले आहे, व ज्यांचा या एकुणविसाव्या शतकांत आता कोणी उच्चार देखील का ढणार नाहीं असे मला वाटत होते तशा विषयाचें व तशा कृतीचे वर्णन फिर्यादीतर्फे सांगण्यात आले आहे. आतां असे कर्म करण्यास गायकवाडास हेतु काय बरें ? परंतु या विषयावर मी आतां बोलत नाहीं, पुढे बोलेन. हा भयंकर गोष्टींनी भरले- ला मुकदमा संपण्याच्या पूर्वी मला वाटते क, खरा गुन्हेगार कोण आहे तो दिसून येईल; परंतु तो गुन्हगार गायकवाड आहे की काय, ह्या गोष्टीच्या संभवाविषयी विचार केला तर असे दिसून येईल की, ही गोष्ट असं- भाव्य आहे. ज्याणे वर लिहिलेला खलिता लिहिला त्याने त्याचा विचार व्हावा झणून लिहिला असेल, व विष देण्याचा प्रयत्न पार पडी किंवा न पडो; पण प्रयत्न केल्यापासून असा मोठा कल्होळ होईल की, त्या खलित्याकडे कोणी लक्षच देणार नाहीं हें ज्याला समजण्याचें ज्ञान असेल तो असा प्रयत्न करील असे संभवतें कीं काय, याचा आपण फारफार विचार करावा. हल्लींचा खलिता पोहचतांक्षणीं व विष दि- ल्याचा प्रयत्न करण्यांत आला ह्मणून ह्मणत असतां, त्याचा विचार ताबडतोब झाला व त्याचा अनुकूल जाब आला ही गोष्ट घडली खरी; परंतु मला वाटते की, रोसडेंट विषानें मेला असता तर सहस्र वाट्यानें गायकवाडांच्या खलित्याचा विचार झालाच नसता, व रोसडेंट ह्मणजे राणीसाहेबाचा वकील मेला कशाने याची चौकशी चाल- ती व दुसया लहानसहान चौकशा त्या मोठ्या चौकशी खाली चिरडून जात्या व कदाचित हल्लीं ज्या रीतीने या राजाला पदच्युत केला आहे तिजहून भिन्न रीतीनें त्याला पदच्युत केले असते -- म्हणजे आपणाला व्हाइसराय यांच्या हातानें न्याय मि.. ळावा ह्मणून जे गायकवाडानी प्रयत्न केले होते ते सर्व संपले असते. सारांश अ सा दुष्ट प्रयत्न सिद्धीस जाओ कीं न जाओ; पण तो जर झाला असता तर त्याचा स्वाभाविक परिणाम- त्याचा खचित परिणाम खचित वर सुचविल्या प्रमाण झाला असता. म्हणून मी म्हणतों कीं, असे हे दोन प्रयत्न असंगत आहेत म्हणजे खालता लिहिणें व विषाचा प्रयोग करणे हे दोन्ही प्रयत्न एकमेकांशी जुळत नाहीत. सारांश ते एकावेळी कोणाच्या तरी हातून होतील असे वाटत नाहीं, एवढेच नाहीं तर ते असे एकमेकांशी विरुद्ध आहेत की, ते कदापिही एका ठिकाणी संभवत नाहीत. सारांश ज्या मनुष्याचें मन खलिता तयार करण्याकडे C