पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २३६) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. होती व तिजबद्दल फिर्याद करण्यास गायकवाड यांस योग्य कारण झाले. या म्हणण्याच्या बळकटीस फक्त एक लहानशी गोष्ट बस आहे. जरी एतद्देशीय लोकांच्या विचारांची माहिती आपणासारखी मला नाहीं, तरी कर्नल फेरच्या एका वर्तणुकीविषयीं गायकवाडास काय वाटले असेल हे मी देखील सांगू शकतों, व आपणही त्या मतास मिळाल असे मला वाटते. ती वर्तणूक ही कीं, जो मनुष्य गायकवाडाचा कट्टा दुसमान त्याच्याशी कर्नल फेर यांची दररोज तर काय, पण अहोरात खलबतें होत असत. तर ही गोष्ट पाहून कर्नल फेरची आपल्याशी रास्त वर्तणूक होईल असे गायकवाडास करें वाटेल, व तुझास तरी वाटते कां, की अशा मनुष्यापासून गायकवाडाशीं रास्त वागणे होईल ? तर तो मनुष्य ह्मणजे भाऊ पुणेकर, हा मोठा प्रामाणिक व सचोटीचा मनुष्य आहे असे जरी क र्नल फेर यांस वाटतें व तसे तो म्हणतो तरी त्याच्या मताविरुद्ध अभिप्राय देण्याची मी छाती करितों; व मी ह्मणतों कीं, तो पुणेकर हेर आहे, व गुप्त बातमी मि व्ळविण्याचेंच काम तो करीत असे व त्याने या कामाचे असंख्य सोबती घेऊन तो हैंच काम रात्रंदिवस करीत असे. त्याला कदाचित ह्या कर्माबद्दल नक्की रुपयां च्या रकमा मिळाल्या नसतील, परंतु त्या रुपयांपेक्षा जे फारच अमूल्य किमतीचे साध- न तें त्यास मिळाले होतें – ह्मणजे कर्नल फेरचा आश्रय व तो सांगेल ते कर्नल फेर ऐकतो हा लौकिक व तो लौकिक मिळाल्यावर त्याच्या खिशांत किती रुपये याणें उतरिले असतील ते कोण जाणे- तर अशा मनुष्याशीं कर्नल फेरचा अत्यंत संबंध होता त्याजवरून जें जें कर्नल फेर करतो तें तें बहुतकरून या मनुष्याच्या सां- गीवरून करितो, व कर्नल फेर याच्या अगढ़ीं मुठींत आहे असे गायकवाडास वाट- "लेच असेल. मग त्या गायकवाडानें ता. २ नोवेंबर रोजी खलीता लिहून पाठविला यांत काय बरें अश्चर्य ? ही तारीख ध्यानांत ठेवली पाहिजे. या तारखेच्या पूर्वी खळता तयार होत होता. तो तयार करण्यास फार विचार करावा लागला असेल, कारण माझा अभिप्राय असा आहे कीं तो खलीता फार वर्णनीय रीतीचा दस्तऐवज आहे. त्यांत सर्व गोष्टी रास्त रीतीने व शांत भाषेनें लिहिल्या आहेत. असे अ सून त्या तर्कशास्त्राच्या नियमाप्रमाणे एका मागून एक अशा दिल्या आहेत. पु राव्यावाचून एकही गोष्ट त्यांत लिहिलेली नाही, व कर्नल फेर यांणी गायकवाढावर केलेल्या ढळढळीत अन्यायांपैकी दोन | तीन दाखले पण त्यांत दिले आहेत. तर असा हा खलिता तयार करण्याचे काम चालू असतांना-ह्मणजे एकीकडे हैं काम ज्या दिवसात चालले होते त्याच दिवसांत दुसरीकडे तें दुसरें घाणेरडें कर्म- चालले होते असे या मुकदम्यांत फिर्यादीतर्फेचे ह्मणणें आहे, ते किती संभवनीय आहे याचा आपणच विचार करावा- ह्मणजे ज्या काळी फारच महत्वाचा राजकीय प्रकरणीं खलिता तयार होत होता, व जो तयार करण्याचे काम फार जपून व वि चारपूर्वक चाल होतें, व जो खलिता खुद मल्हारराव व त्यांची प्रधान मंडळी मि ळून तयार करीत होती त्याच वेळीं ज्या मनुष्याला त्या खलित्याचा जबाब द्यावा