पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सारजंट बालंटाईनचें भाषण.. (२३५ ) ते ज्या उघड रीतीनें वागत होते असे शाबीत झाले आहे तर्से. त्यांच्यानें कदापि ही वागवले नसते. कारण तसे वागणे कोणत्याही मनुष्याच्या हातून घडणारच नाही- झणजे ज्या रीतीनें गायकवाडांनीं विष देवावळें ह्मणून सुचविण्यात आलें आहे, तसा विष देवविणारा मनुष्य ज्या मनुष्याला विष देण्याचा इरादा करीत असेल त्याच्याशी अगदीं प्रेम दाखवील व आपली दुष्ट बुद्धी त्या मनुष्याला जेणेकरून समजेल. असा पुरावा नाहींसा करील-कारण तसे जर तो करणार नाहीं तर एखादा अगर्दी मूर्ख बुद्धीचा मनुष्य असेल तो देखील ह्मणेल की, या मनुष्याच्या रीतीवरून तर गड्या हाच तें कृत्य करणारा असावा असे दिसते. तर अशा कापस्य वेषाने कर्नलः फेरशी गायकवाड वागळे नाहीत. त्यानीं कर्नल फेरशीं जी लढाई केली ती केवळ रास्त, खुल्या, व सचोटीच्या रीतीनेंच केली. गायकवाडांच्या ज्या कारखान्यांची. कांहीं स्थीति बिघडली होती त्याविषयीं मीड साहेबांनी चौकशी केली. त्यांत त्यांनी, आपली हुशारी व माहिती व पुष्कळ दिवसांचा राजकीय प्रकरणाचा अनुभव यांचा उपयोग करून जो रपोट केला होता, व त्यांत ज्या सूचना केल्या होत्या, त्यांचा हिं दुस्थानचे व्हाईसराय यांनी पूर्ण विचार करून निर्णय केला कीं, कितीएक अटी. ठरवून वर सांगितलेल्या बिघडलेल्या कारखान्याची सुधारणा करण्याचें काम. गाय- वाड यांस फर्माविले असतां ते ती करण्यास लायक आहेत, व म्हणूनच जी सुधा: रणा करणे जरूर होती ती करण्यास गायकवाड यांस व्हाईसराय यांनी संधि दिली, व सन १८७५ अखेरपर्यंत मुदत दिली. तर ही मिळविण्याचा जो मोठ्या महत्वाचा खलिता तो प्रथम गायकवाड़ांनीं व्हाईसराय यांजपासून मिळविला. त्याजवरून गाय कवाडांची खात्री झाली कीं, व्हाईसराय व त्याचे कौंसलदार हे माझ्या ह्मणण्याचा. रास्त विचार करतील व मजला सुधारणा करण्यास जो रास्त संधि पाहिजे तोही. देतील असे असतां फेरसाहेब हे मध्येच ढवळाढवळ कां करूं लागले बरें? जे जे गाय- कवाड करीत गेले व जें जें व्हाईसराय यांच्या फर्माविण्याबरहुकूम उपाय योजिले त्यांत क र्नल फेरकडून हरकतच होऊं लागली. तर असे होण्याचे कारण काय? गायकवाडांची. वर्तणूक की, कर्नल फेरची वर्तणूक ? तर आतां या ठिकाणीं गायकवाडांच्या वर्तणु- कीविषयीं सर लुईस पेली यांनी जो आपला अभिप्राय काळ सांगितला तो ध्यानांत. आणण्याची आपणास सूचना करणें अप्रासंगिक होणार नाहीं ह्मणून करितों. त्यां- नीं गायकवाडांविषयी आपला अनुभव सांगितला कीं, गायकवाड हा सर्व रीतीनें समजुतीचा मनुष्य आहे. याच्याशीं मी अगदीं फार गोडीनें वागू शकलों. याच्या राज्याच्या हिताची व व्हाइसराय यांच्या मर्जीला अनुसरून असणारी अशी काही गोष्ट त्याला सुचविली, तर त्याप्रमाणे करण्यास तो अगदीं तयार असे. अशी तर गायकवाडाची वर्तणूक आहे. तर फेर साहेबांशी बेबनाव कसा उत्पन्न झाला ? फेर साहेबांस विनाकारण वाईट शब्द मी लावीत नाहीं. तरी या मुकदम्यांत पा- हिजे तेवढा पुष्कळ पुरावा सांपडतो की, ज्या नेमणुकीवर त्याला नेमळे होते त्या ने. मणुकीस त्याच्याहून वाईट मनुष्य मिळणें कठीण. त्याची वर्तणूक अगदी अविचाराची.