पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

((२३४) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. ती करणारांवर आहे. त्यांच्या कृत्यांचा जरी या कमिशनाच्या मनावर कांहीं असर होणार नाहीं तरी या कृत्यांच्यासंबंधानें जेवढे समर्पक दिसतें तेवढे बोलतों, व माझे हे बोलणे पूर्णपणे समर्पक आहे असे आपणही कबूल कराल अर्से वाटते. म. ल्हारराव गायकवाडांच्या सर्व जिंदगीचें चांचे लोकांच्या रीतीप्रमाणें हरण करण्यांत आले आहे असे मी ह्मणतो; परंतु त्याच कृत्यास सर लुइस पेली यांनी त्यांच्या "अशुभास शुभ बोलण्याच्या सवयीमुळे " गायकवाडाच्या मालाची कच्ची जप्ती " अ- से नांव दिले आहे परंतु हे जप्तीचे काम अझून चाललेच आहे व त्याचा अंत गा. यकवाडाच्या दृष्टीस अझुन पडतच नाहीं, झणून या कृत्याला गायकवाडाच्या समजुती प्रमाणे घर सांगितलेल्या दोहों नावांपैकी कोणतेंही नाव दिलें तरी चालेल, झणून मी त्याला कच्ची जप्ती हे नांव देऊन ह्मणतों कीं, गायकवाडांची अशी स्थीति हल्लीं झाल्यामुळे त्यांच्या बचावाचे साधन पण त्यांच्या हाती राहिले नाहीं. सारांश ते अशा दुःखसागरांत पडले आहेत कीं, हा त्यांजवर जो आरोप ठेवला आहे तो उडवून देण्यास त्यांस सहजच फार अडचणी उत्पन्न झाल्या आहेत; हे माझे ह्मणणे आपण ऐकतांच कबूल कराळ, ह्मणून आतां यांविषयीं मी पुन.. बोलणार नाहीं. आतां कमिशनरांची माफ मागून दुसऱ्या एका फार महत्वाच्या गोष्टीस आरंभ क करितों. ती गोष्ट ही की, या प्रकरणाच्या आरंभापासून मल्हारराव गायकवाडांची वर्तणूक कशी चालत आली आहे व त्यांचें खरें हित कशांत होते याचा आपण विचार करूं या-ह्मणजे हा मुकदमा खोट्या शपथांनी परिपूर्ण आहे असे आपण पण कबूल क राळच-तर अशा या मुकदम्यांत ज्याजवर आरोप ठेवण्यात आला आहे त्याची वर्तणूक कशी झाली आहे याचा विचार करणें अवश्य आहे, व ती या प्रकरणाच्या आरंभापासून कशी आहे याचाही विचार करणे जरूर आहे. या प्रकरणाचा आरंभ 'पहिल्या कमिशनच्या ह्मणजे सर रिचर्ड मीड ज्या कमिशनाचे अध्यक्ष होते त्यांच्या समाप्तीच्या दिवसापासून मी धरितों. इनसाफ करण्यास लायक, व व्हाईसरायांस आपला अभिप्राय देऊन मदत करण्यास समर्थ, अशा अधिकाऱ्यांनी जी चौक- शी केली तिजविषयीं मी कांहीं बोललो तर असमर्पक होईल एवढेच नाहीं, पण आपण देखील त्याविषयों कांहीं चौकशी या मुकदम्यांत कराल तर तें अप्रासंगिक होईल. ह्मणून मी एवढेच सांगतो कीं, ज्या गोष्टी त्या कमिशनास आढळल्या अ सतील त्यांपैकी कितीएक तर खचीतच गायकवाडाच्या आंगी लावण्यालायक नस तीळ. त्या फक्त त्यांच्या चाकरांस लागू असतील; पण याविषयीं जास्ती बोलणें नाहीं. त्या कमिशनाच्या समाप्तीच्या दिवसापासून मी माझी हकीगत सुरू करितों तर त्या दिवसापासून मल्हारराव महाराज यांची वर्तणूक कशी होत आली आहे इकडे आपण मनापासून लक्ष द्यावें असे माझे मागणे आहे. कारण ती वर्तणूक असा का- ळिमा आणणारा गुन्हा योजणाऱ्या व करणाऱ्या मनुष्यासारखी नव्हती असे तुमच्या- कडून मला ह्मणविणे आहे. त्यांची वर्तणूक सर्व प्रकारानें या उलट दिसते. ज्या मनुष्याचा जीव घेण्याच्या युक्त्या गुप्त रीतीनें गायकवाड शोधीत होते त्यांच्याशी 2