पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सारजंट बालंटाईनचें भाषण. (२३३ ) नाहीं, व त्यांनी स्वतंत्ररित्या केलेले एकादें कृत्यही या मुकदम्याच्या आरंभापासून तो शेवटपर्यंत दाखविण्यांत आले नाहीं. सारांश सामील साक्षीदारांच्या बोलण्यास पुष्टी- करण देणारा कांहींच पुरावा नाहीं, व तो तर अवश्य असलाच पाहिजे. मी कांहीं वेळाने प्रत्येक साक्षीदाराच्या जवानीची जेव्हां फोड करून दाख- वीन तेव्हां पुष्ठीकरणासारखी दिसणारी जी त्यांची सांगणी आहेत त्यांचा खुलासा करून देईन. आतां मी आशा बाळगितों कीं, जो पुष्टीकरणसंबंधी विषयावर मी आतां विचार सांगितला आहे तो संपूर्णरिया खरा आहे असे आपण कबूल कर राल. कारण कायद्याचे शास्त्र जाणणारे अनुभवी विद्वान असतात त्यांच्या खेरीज जे सामान्य विद्वान व सामान्य अकलेचे लोक असतील त्यांसही तो सुयुक्तिक दिसेल, पण एवढेच नाहीं तो कायद्यास अनुसरूनच आहे. आतां आणखी एक सामान्य विचार आहे तो सांगतोंः-- कितीएक ह्मणतात की "न्या- याच्या कोटांत चालणाऱ्या रीतीसंबधी बारीक खुबीदार नियमांची अशा मुकदम्यांत कांहीच गरज नाही." असे मत दर्शिवणारांपैकी कांहींची हे मत दर्शिवण्याची मुळींच योग्यता नसते; परंतु किती एक समजदार लोकही, विचार केल्यावाचून असें मत एखाद्यावेळी दर्शवितात हे पाहून मला फार आश्चर्य वाटतें. याच मुकद- ग्यासंबंधी असे मत दिलेले माझ्या पाहण्यांतही आल्याचें मला स्मरतें. त्या लि हिणाराने असे लिहिले आहे की, "या मुकदम्यांत कायद्यासंबंधी बोलण्याची लपेट चालणार नाहीं, व सामान्य अक्कल व साधारण बुद्धीच्या नियमानें याचा निकाल केला जाईल-ह्मणजे कायद्याच्या खुबीदार नियमांचा ह्या मुकदम्यांत न्यायकर्ते शिर- काव होऊ देणार नाहीत." परंतु ज्या कायद्याच्या खुबीदार नियमांविषयीं अशी लोक तिरस्कारपूरित बडबड करितात ते हें विसरतात की, ज्या ह्या खुबीदार निय मांस अनुसरून न्यायाची को हमेशा वागतात ते खुबीदार नियम महान् महान् पुरुष व मोठे मोठे कायद्याचे शास्त्र जाणणारे यांणी आपल्या अनुभवावरून ठरावले आहे. त-झणजे सत्य कोणत्या नियमानें उत्तम प्रकारे बाहेर पडते याचा ज्यांणीं विचार केला आहे त्या पुरुषांनी हे नियम बांधिले आहेत-सारांश अविचारी व नादान मनुष्य ज्या खुबीदार नियमांस धिकारितात तेच हे खुबीदार नियम आपल्या देशांतील प्रत्ये क मनुष्याच्या बचावाचे केवळ किल्ले बनून राहिले आहेत. त्यांच्या द्वारानेंच असय निवडतां येतें, व त्यांच्यावरूनच सयाची शात्रिती करण्याचा उत्तम मार्ग निघतो; असे आजपर्यंत शेकडों वर्षांत ने शहाणे पुरुष होऊन गेले. त्यांचे ह्मणणे आहे व त्यांणी ते अनुभवूनही पाहिले आहे, एवढे सांगून हा विचार संपवितों; कारण, या विषयाचे जास्ती स्पष्टीकरण करण्यांत ह्मणजे मोठी गम्मत आहे असे नाही. या मुकदम्यांत आणखी एक महत्वाची तन्हा आढळली आहे तिजकडे आतां मी वळतो- ज्या स्थितीत मल्हारराव महाराजास हल्ली ठेविले आहे तिजविषयों मी पूर्वी एक- दां बोलुन चुकलो. त्याहून जास्ती बोलणे ह्मणजे काही गाणे किंवा फिर्याद मी आतां करीत नाही. या स्थितीसंबंधी जी कृत्ये झाली आहेत, त्यांजबद्दल जबाबदारी २७