पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २३२) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. का सामील मनुष्यानें कांहीं मजकूर सांगितला आहे. त्यापैकी कांहीं मजकूर आरो पिताच्या हातच्या एकाद्या लेखांत लिहिलेला सांपडला तर त्या लेखी मजकुरावरून सामील मनुष्याच्या बोलण्यास कांहीं अशीं पुष्टीकरण मिळेल, व ते पुष्टीकरण फारच क्षुद्र जरी मानिले तरी ते पुष्टीकरण पुराव्यांतून काढून टाकतां येत नाहीं. ज्या पु. ष्टीकरणावरून सामील मनुष्यांचे कृत्यांविषयी मात्र प्रत्यंतर मिळत असेल, झणजे ज्याचा आरोपिताशीं कांहींच संबंध नसेल व ज्याची आरोपितास कांहींच माहिती नसेल, झणजे आरोपिताच्या परोक्ष जें झालें असेल त्यापासून ( आरोपिताविरुद्ध ) कांहीं एक पुष्टीकरण होत नाहीं. आतां हीच गोष्ट अगदर्दी उघडी करून सांगतो. सामील मनुष्य रावजी याणें कर्नल फेरे यांच्या प्याल्यांत (ग्लासांत ) विष घातलें. ते घालतां भ्यां पाहिले असें ह्मणणारा कोणी अब्रूदार साक्षीदार असला तर ( परंतु तसे होणें केवळ अशक्यच आहे ) त्याचें ह्मणणें रावजीच्या विरुद्ध ( पुष्टीकरण ) व निरुत्तर पुरावा होईल; परंतु ते ह्मणजे गायकवाडाविरुद्ध किंचितही पुरावा होत नाहीं. ही गोष्ट एवढी उघडी करून सांगितली ती एवढ्या करितां की, जे जे मीं आतां विचार सांगितले ते ते तिजवरून स्पष्ट ध्यानांत येतील. हें माझें ह्मणणें या मुकदम्यांतील प्रत्येक साक्षीदारास लागू आहे असे मला वाटतें व तसें क- मिशनरांसही वाटेल अशी माझी समजूत आहे. आरोपित मनुष्याविरुद्ध सामील मनुष्यांनी जे मजकूर सांगितले असतील त्यांच्या सांगण्यास पुष्टी- करण असा जो कायदा आहे त्यांत वर्णिलेल्या प्रकारचें पुष्टीकरण या मुकदम्यांत आरंभापासून ते शेवटपर्यंत कोठच नाहीं असे मी सिद्ध करून देईन असे मला वा टर्ते - म्हणजे या मुकदम्यांतील सामील मनुष्यांच्या साक्षींस कोणयाही तरी प्रकारचें पुष्टीकरण देण्यासारखा न बिघडविलेल्या साक्षीदारांच्या तोंडून निघालेला पुरावा अणु- मात्र देखील खचीतच नाहीं. याविषयीं मी थोडक्यांत उदाहरणं पण दाखवितों. नु. रूद्दीन याजपासून मी विष आणले असे दामोदरपंताचें सांगणे आहे त्या सांगण्यांत एखादा बोल खरा आहे (नसेल असे माझे म्हणणे नाही) असे आपण मानं या, नंतर नुरुद्दीन याजला साक्षी देण्यास बोलावले व त्याणें शाचीत केलें कीं, त्याचेपासून दामोदरपंतानें विष घेतले असेंही आपण मानूं या, व अशाच रीतीने असे पण मानूं या कीं, एका मनुष्यापासून हिण्याची भुकी अथवा बारीक हिरे दामोदरपं गर्ने घेतले व ती गोष्ट त्या मनुष्यानें शाचीत केली, आणखी असेंही मानूं या हा पुष्टीकरणीय पुरावा आहे; परंतु म ग प्रश्न निघतो कीं, तो लागू कोणावर दामोदरपंत आरोपी असून त्याचा इनसाफ चालला असेल तर वरच्या दोन गोष्टींपासून दामोदरपंताविरुद्ध पुष्टांकरणीय पुरावा झाला; परंतु त्यापासून गायकवाड विरुद्ध कांहींच पुष्टीकरण होत नाहीं- ह्मणून सांगतों कीं, या मुकदम्यांतील संपूर्ण पुरावा लक्ष पुरवून वाचल्यावर कमिशनरांस दिसून येईल कों, खुद्द गायकवाड मल्हारराव यांच्या हातून अमुक गोष्ट घडली किंवा अ- मुक कृत्य त्यांनी केले असे सामील साक्षीदारांच्या सांगण्याखेरीज कोणत्याही स्वतंत्र साक्षीदारांच्या तोंडून निघाले नाही व मल्हाररावांच्या हातचा कांहीं लेखही निघाला