पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सारजंट बालंटाईनचें भाषण. 1 कांहीं सांगितलें झणजे त्या सांगितलेल्या मजकुराचा विचार, त्यासंबंधी चौकशी, व त्यांचे पृथक्करण केल्यावांचून त्या सांगितलेल्या मजकुरास पुष्क लोक घडलेली गोष्ट असें मानतात; ह्मणून घडलेली गोष्ट म्हणजे काय हे समजणे अवश्य आहे. एका प्रकारच्या घडलेल्या गोष्टी व सांगित लेले मजकूरही न्यायाच्या कोर्टापुढे वारंवार येत असतात. त्यांचा योग्यरीतीनें उपयोग कसा करावा याविषयों महान् महान् विद्वान लोकांसही विचार पडतो. ते सांगितलेले मजकूर कोणते, तर गुन्हे करणाऱ्या मनुष्याचे सामील यांनी सांगितलेले मजकूर- म्हणजे गुन्हे करण्यांत सामील होतो असे आपल्याच तोंडाने म्हणणारे लोक यांनी सांगितलेले मजकूर ह्या मजकुरांची किंमत किती व ते सांगणारांची योग्यता किती याचा पूर्ण समज या मुकदम्यात अवश्य झाला पाहिजे. तर याविषयीं माझी समजूत अशी आहे की, इंग्लंड देशांतील कायद्यांवरून स्थापलेल्या कोणत्याही न्यायाच्या कोत, सामील मनुष्यांची साक्ष इतर पुराव्यानें पुष्ट झाल्याशिवाय पुगव्यात घेतली जाणार नाहीं. हा विषय फार महत्वाचा आहे; परंतु याबद्दल पुनः बोलण्याची जरूर पडूं नये म्हणून याबद्दल जे काहीं मला बोलणे आहे ते येथच पुरे करून सांडितों. फक्त एका सामील मनुष्याच्या साक्षीवरून कोणत्याही मनुष्यास गुन्हेगार ठरवूं नये अशी कायद्याची मनाई नाहीं, हें मजला ठाऊक नाहीं असे कोणी समजूं नये; परंतु न्यायाच्या कोटांत एक प्रघात पडत चालला आहे कीं, इनसाफ करणाऱ्या जज्जाने जुरीस मुद्दाम सुचविलेंच पाहिजे कीं, तुझी फक्त एका सामील मनुष्याच्या साक्षीवरून कोणत्याही मनुष्याचे स्वातंत्र्य किंवा शरीर किंवा जीव जोखमांत घालूं नये; व हा प्रघात कायद्याप्रमाणेच इतका पूज्य होऊन गेला आहे की, वर सांगितलेल्या प्रकारची सूचना जज्जाने जुरीस न केली तर जज्जानें जुरीची भलतीच समजूत पाडून दिली असा त्याजवर दोष येतो. ही जी मी कर्तव्य म्हणून सूचना केली ती आपल्या ध्यानांत सहज येऊन आपण पसंत करण्यासारखी आहे; परंतु तिच्यालगत एक विचार आहे तो विशेष महत्वाचा आहे व त्याची किम्मत चीफ जस्टिस महाराज विशेष पूर्णपणे जाणतात, म्हणून त्याविषयी फार विस्तार नलगे. तो लगतचा विचार हा की ज्या मनुष्यावर आ रोप करण्यांत आला आहे त्याजवर गुन्हा लागू होण्यास सामील मनुष्यांचे साक्ष/स पुराव्यांत घेण्यास योग्य असे पुष्टीकरण पाहिजे त्याचे स्वरूप काय ? हा प्रश्न कम- ती महत्वाचा आहे असे नाही; परंतु उलटा तो जास्त कठीण आहे. या प्रश्नाचें नि राकरण करण्यास साफ मगज व साफ मने पाहिजेत, ह्मणून या प्रश्ना संबंधों काही विचार सांगतो. पण ते विचार केवळ माझे एकट्याचेच आहेत असे आपण समजूं नये. तर सर्व कायद्याचे शास्त्र जाणणारांचे हेच विचार आहेत. सामिलाचे सा- क्षीचें पुष्टीकरण असे असले पाहिजे की, त्या पुष्टीकरणावरून (ह्मणजे इतर पु- राव्यांवरून किंवा साक्षीवरून ) आरोपेत मनुष्यावर थोडाबहुत तरी गुन्हा लागू झा ला पाहिजे, व त्या पुष्टीकरणांत आरोपित मनुष्य व सामील मनुष्य यांचा कोणत्या तरी रीतीने गुन्हा करण्यांत निकट संबंध दिसला पाहिजे. उदाहरणार्थ सांगतों की, ए- (२३१ )