पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२३०) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास नाहीं. ह्मणून मी सांगतों कीं, आतां जे म्यां विचार आपणास कळविले ते या मुक- दम्यास तर विशेष करून समर्पक आहेत. आता मी साफ सांगतों आणि साफ कां सांगतो. याचे कारण पण भी दाखवीन कीं, ज्या जबान्या घेतल्या आहेत त्यांपैकी कितीएकांस तर कांहींच घडलेल्या गोष्टींचा आधार नाहीं. त्या गैर रीतीने घेतल्या आहेत, क त्या जबान्या देणारांनी जे कांहीं सांगितले ते ह्यांत कितीएक ठिकाणी वास्तविक क जसेच्या तसे लिहून घेतलें नाहीं. या खोट्या गोष्टींच्या जमावांत जे काही किंचित सत्य सांगावयाचा हेतू होता तेही या जवान्यांत पुष्कळ ठिकाणीं वठविलें नाहीं. का- रण जे सांगावयाचें साक्षीदारांचा हेतु नव्हता असे दिसतें तें देखील या जबान्यांत लिहून घेतले आहे. हे माझे विचार आपण लक्षांत ठेवावे, व याविषयी मी पुष्कळ दाखले दाखवून देईन. सारांश या जबान्या विश्वास ठेवण्यास पात्र नाहीत. त्या थो- ड्या बहुत तरी संशय चिन्हित ठिकाणाकडून आलेल्या आहेत असे समजले पाहिजे.. आतां ची. ज. महाराज, दुसरा एक माझा ह्या सर्व मुकदम्यास लागू असा अ भिप्राय आहे तो मी आपणास कळावेतों, व तो इतर मेंबरांपेक्षां विशेषेकरून अध्य- क्षांस अनुलक्षून सांगतो; कारण त्यांत जरी किती एक विचार सर्वांस समजण्यासारखे आहेत तरी त्यांत कितीएक असे की, त्यांत कायद्याच्या शास्त्राची व इनसा- फाची कितीएक मुळतवें गर्मित आहेत. जेव्हां चार लोकांची मंडळी एकत्र जमते व त्या मंडळीत अशा विषयाच्या गोष्टी निघतात तेव्हां त्यांतील कितीएक लोक-ह्मणाजे बज्य- प्रतीचे लोक देखील—विशेषेकरून जेव्हां गोष्टीचा विषय या विषयासारखा सर्वांचें मन आकर्षून घेणारा असतो तेव्हां- असे बोलतात की, “ अमका ना ? तो तर खचीत दोषी आहे." हल्ला या बडोद्यांत जे इंग्रज लोक स्थाईक आहेत. बजे लोक कांही दिवस येथे काढण्यास आले आहेत त्यांच्या मं.ळीत तर असेच बोलणे बहुतेक ठिकाणी ऐकूं येईल याविषयों मला काडमिात देखील संशय नाहीं, व अशीं बोलणीं एकाच जातीचे लोक बोलतात असे नाही; बहुतेक मनुष्ये बोलतात. तर भातां हे बोलणे तर्कशास्त्राच्या नियमाप्रमाणे आपण जरा कसून पाहू, असे बोलणारा स विचारावें की, " अहो तो दोषी आहे असे आपण ह्मणतां तर ते कशावरून?". तर लागलेच उत्तर येते की " सर्व ह्मणतात की, तो दोषी आहे याविषयी संशय क शाचा ?-" पण जेव्हा आपण विचारावें कों, आपल्या ह्मणण्यास आधारभूत घडले. ल्या गोष्टी काय आहेत; तेव्हां मग उत्तर देण्याचा घोटाळा पडतो. कारण घडलेल्या गोष्टी दाखविणे फार कठीण आहे. माझ्या अवलोकनांत असें आले आहे कीं, जे लोक एकाद्या विषयाचा विचार केल्यावांचून याविषयों आपले मत निश्चयानें सांग - तात याच लोकांना त्या विषयाचा ज्या गोष्टींवरून सिद्धांत सांगायाचा त्यांची माहि ती अगदी नसते. मला वाटते कीं, मत झणून ज्याला ह्मणतात तें कांहीं अंतर्ज्ञाना- वरून करता येत नाहीं. निदान ज्या मतांवरून इनसाफ करणाऱ्या न्यायाधिशांन अभिप्राय दिला पाहिजे तें मत तरी घडलेल्या गोष्टीवरून झाले पाहिजे. आतां घड- लेल्या गोष्टी लणजे काय याविषयीं देखील पुष्कळ लोक चुक्या करतात. कोणी P