पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

'सारजंट बालंटाईनचें भाषण. ( २२९ ) येथे कायदाच मला कांहीं सांपडत नाही. त्या लोकांना पाहिजे तसे करण्यास अम- र्यादित अधिकार आहे असे दिसतें. त्यांजवर देखरेख ठेवून त्यांजला मर्यादेने वागवि ण्याचा अधिकार येथें माजिस्टांसही नाहीं व जज्जांसहीं नाहीं असे दिसते. पोलि सचा शिपाई याला वाटेल तसे तो यथेच्छ वागूं शकतो. ह्मणूनच या मुकदभ्यांतील बहुत साक्षी ( किती, हे माझ्यानें सांगवत नाहीं ) पोलिसच्या लोकांनी या आरोपा- च्या चौकशीसाठी अटकेत ठेवले आहेत व ही गोष्ट ते नि:शंकपणानें कबूल करता- त; परंतु असा मर्यादाव्यतिरिक्त अंमल पोलिसांस दिल्याचें फळ असे होते की, ते लोक कहर उडवून देतात व त्यामुळे त्यांच्या भितींतून कोणीच मुक्त राहत नाहीं. को- णी ह्मणेल कीं, मी माझ्या घरी बसलो आहें तर पोलीस माझे काय करील. तर ते त्यांचे लणणे चालतच नाहीं. हवा त्याला व हव्या त्या ठिकाणाप सून हे लोक ओढून आणितात. व त्याला हवे तितके दिवस अटकेत ठेवतात, परंतु काणी माजिब्रेट त्या लोकांच्या तर्फे कांहींच पोलिसांस विचारीत नाहीं. व अटकेत पडल्याबद्दल कांहीं दादच कोणी घेत नाहीं. त्या वेळेसही घेत नाहीं, व मगही घेत नाही असा या शहरांतील हल्लींचा कायदा आहे असे मला भासतें. कायदा तसा नसला तरी हल्लींची येथील कृती तशी आहे यांत तर संशयच नाहीं. ज्या ज्या मनुष्यांनी या मुकदम्यांत साक्षी दिल्या त्यां च्याशी पोलिसचे लोक कसे वागले हे आतां आपणास कळोन आलेच आहे व याचे असंख्य दाखले आपणास समजलेच आहेत. या स्थितीपासून प्रत्येक साक्षीदारावर पोलिसाने कसकसा अंमल चालविला आहे हे मी पुढे तपशीलवार दाखवून देईन. हल्लीं एक या संबंधी सामान्य विचार सुचला आहे तो सांगून ठेवतों. तो हा की, ही स्थीति माझ्या समजुतीप्रमाणे तर केवळ राक्षसकृतिसारखी दिसत आहे व तिच्या पासून घोर अन्याय होत असेल. जो पोलिसचा अम्मलदार हा मुकदमा तयार करीत होता, ह्मणजे ज्या मनुष्यावर या आरोपाचा वहीम आला आहे त्याजवर तो लागू व्हावा ह्मणून जो अम्मलदार त्याच्याने होईल तितका प्रयत्न करीत होता, त्याच मनुष्याला नंतरच्या होणाऱ्या तपा- सांत, मग त्याला चौकशी ह्मणा किंवा इनसाफ ह्मणा, त्यांत ज्या जबान्यांचा वहीम- दार मनुष्याविरुद्ध उपयोग करावयाचा आहे त्या जबान्या घेण्याचा अधिकार अस णे यापासून घोर अन्याय घडला आहे असे मी या मुकदम्यांत दाखवून देईन असे मला वाटत आहे. ज्या मनुष्याच्या मनांत एकाद्या वस्तूची शिकार पाडावयाचा नि. श्चय होतो त्याला ती वस्तु प्राप्त होण्याची तीक्ष्ण इच्छा उप्तन्न होते व मग तो सुध्या मार्गाने न मिळाली तर तिचा तो घाणेरड्या रस्याने पिच्छा पुरवितो, असा मनुष्या. चा स्वभाव आहे. पोलिसचा अम्मलदार झाला ह्मणून काय, तो मनुष्य धर्मापासून मुक्त असतो काय ? जे कागद इनसाफाच्या कामांतील दस्तऐवज होणें आहेत व ज्यांचा न्याय करणारांच्या मनावर ठसा उमटावा झणूनच ते तयार करण्याचा हेतू असतो ते कागद तयार करण्याचें काम ज्या मनुष्याचे मनांत - स्वाभाविकरित्या झटले तरी चालेल एक तर्फी मजबूत ग्रह उत्पन्न झाला असेल त्याला सोपणें हें यथान्याय