पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जुन्या राज्यपद्धतीचें वर्णन व त्यांत पुढे फेरबदल.

(२९) केली होती. कवाईत शिकविलेले पायदळ आणि घोडेस्वार या फौजेची देखरेख ते स्वतः ठेवीत असत, आणि फौजेपासून कवाईत कशी घ्यावी वगैरे कामांत ते फार प्रवीण होते. ब्रिटिश सरकाराचे मोठमोठे लश्करी अधिकारी बडोद्यास आले म्हणजे महाराज सैन्या- ध्यक्षाचे काम स्वतः चालवून मोठया उत्छाहाने त्यांस आपल्या फौजेची कवाईत दाखवीत असत, आणि अधिकारी ती उत्तम व्यवस्था आणि विध्यनुवर्तित्व पाहून त्यांची फार प्रशंसा करीत. महाराज स्वच्छंदानुवर्ती असतां या लढाऊ लोकांच्या व्यवस्थेच्या संबंधाने ते इतके नियंत्रित होते कीं, जसे काय ते कोणा एका अक्षम राजाचे चाकर होते. असाच नियंत्रितपणा त्याणी सर्व राज्यकारभारांत ठेविला असता तर या अर्वाचीन काळांत त्यांजसारखा शहाणा राजा झाला नाही अशी त्यांची कीर्ति झाली असती. आले आहेत.

महालानीहाय सरसुभे हे खातें स्थापित झाल्यापासून रोव्हिन्यु खात्यांत पुष्कळच सु-

धारणूक झाली. रेव्हिन्यु खात्यासंबंधी जे नियम ब्रिटिश सरकारच्या राज्यांत चालतात त्यांपैकी जितके लागू करितां आले तितके बडोद्याच्या रेव्हिन्यु खात्यास लागू करण्यांत या खात्याची सर्व व्यवस्था बळवंतराव देव यांच्या हाताने झाली आहे.

महालानीहाय सरसुभे ( रेव्हिन्यु कमिशनर ) यांच्या हाताखालीं उत्तर आणि दक्षिण

प्रांतांसाठी दोन असिस्टंट रेव्हिन्यु कमिशनर नेमिले होते. त्यांस रेव्हिन्यु सर कामदार म्हणत. ते दोन्ही कामदार इंग्रज सरकारची नौकरी करून मोठी प्रतिष्ठा मिळविलेले असे होते.

रघुनाथ रामचंद्र माजी डेप्युटी कलेक्टर यांजविषयों मेहेरबान राजर्स साहेब याणी

बडोद्याचे रेसिडेंट साहेब यांस शिफारस केली होती. त्या शिफारशी पत्रांत असे लिहिले होते की, गायकवाड सरकारास जर रेव्हिन्यु कामासाठी कामदार पाहिजे आहे तर मी खात्रीने सांगतों र्की, रघुनाथ रामचंद्र यांजसारखा हुषार, अनुभवी आणि प्रामाणिक मनुष्य क्वचितच मिळेल. दुसरे विनायकराव माधवराव हे पूर्वी रेवाफाट्याचे दप्तरदार होते. त्याणी उत्तर प्रांतांतील एक महालचे वार्षिक रिपोर्ट तयार करून महाला- नीहाय सरसुभ्यांकडे पाठविले आहेत, त्यावरून त्यांची हुशारी समजण्यासारखी आहे, व त्याजवरून महालानीहाय सरसुभे यांचे काम त्या वेळेस कसे व्यवस्थापूर्वक चालले होतें हेही समजेल.

महालांत अव्वल कारकून यांची नेमणूक महालानीहाय सरसुभे करीत असत, व

महालाच्या तिजोरीवरील मुख्य मुनिमाची नेमणूक महालानीहाय सरसुभे यांचे दुकानावरील मुख्य मुनिमाकडून होत असे. महालचे कमाविसदारास अव्वल कारकुनाच्या सहीवांचून कोणताही खर्च करण्याची परवानगी नव्हती यामुळे नेमणुकीपेक्षां ज्यास्त खर्च करण्याचा मार्ग बंद झाला होता.

महालांचे अधिकारी वर्षाचे अखेरीस महालानीहाय सरसुभे यांस महालांचा

हिशेब देत असत. त्याचप्रमाणे तिजोरीचे मुनीम गुमास्ते दुकानचा हिशेब सरसुभे यांच्या दुकानाच्या मुनीमाकडे पाठवीत असत, आणि त्यावरून एकंदर हिशेब सरसुभे यांचे दफतरदार तयार करून दिवाणास व सरकारास समजावीत असत, म.दा. पातबार ग्रंथ संग्रह