पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २२८ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. विचार करीतच नाहीं; पण इकडे तिकडे न पाहतां जो सरळ खरा मार्ग दिसेल तोच तो धरितो, असे इंग्लंड देशीय जज्ज असतात ह्मणून मी ह्मणतों कीं, ही अशी न्यायमंडळी व तीत एक इंग्लंड देशीय बज्ज आहे हे माझें मोठे भाग्यच आहे असे मी मानतों. कारण जशा रीतीने ह । मुकदमा या न्यायाधिशांस समजावून देणे योग्य आहे तशा रीतीनें तो समजावून देण्याचे माझ्या आंगी सामर्थ्य व पांडित्य ना- ह्रीं असे मला वाटतें तत्रापि इतकें मला पक्के ठाऊक आहे की, हे न्यायाधीश पूर्ण सचोटीचे आहेत, व विद्वान आहेत, व विचारवान आहेत, व सर्व जगाचें ही मत याप्रमाणेच आहे अशी माझी खात्री आहे, मग न्याय कसा होईल हे सांगावयासच नको.. आतां पुराव्याविषयों मी विवेचन करितों. प्रथमारंभींचा पुरावा साक्षीदारांशी गुप्त संबंध ठेविल्याविषयींच्या आरोपासंबंधी आहे परंतु ह्या आरोषासंबंधी हल्लीं मी बोलत नाहीं. मल्हारराव महाराजांवर जो दुसरा भारी आरोप आणला आहे त्याविषयों मी हल्ली बोलतों. असे करण्यास एक दोन कारणे आहेत. पहिले कारण हेंच कीं, वि. व देण्यास प्रयत्न केल्याच्या आरोपांत ज्या तपशीलवार गोष्टी सांगितल्या आहेत सां- तच त्या पहिल्या आरोपासंबंधी गोष्टींचा समावेश होतो. दुसरे कारण हें कीं, असे केल्याने पुष्कळ वेळही व्यर्थ जाणार नाहीं. व तिसरें कारण जें आहे तेही सांगित- ल्याविना मजला राहवत नाहीं ह्मणून ते सांगतों कीं, तो आरोप इतका क्षुल्लक आहे कीं, तो आरोप आहे असे देखील माझ्यानें लणवत नाहीं. तो आरोप इतका क्षुद्र व केवळ तर्कटी दिसतो की, त्याचें खरें स्वरूप व त्याची कायद्याचे रीतीनें किंमत काय, व त्यांचे कायद्याच्या नजरेनें धोरण काय हें देखील माझ्या ध्यानात येत नाहीं. ह्म- णून मी प्रथमारंभी त्या भारी आरोपाविषयी बोलतों. परंतु त्याची तपशीलवार हकीगत सांगण्यापूर्वी या मुकदम्यास लागू असे एक दोन विचार सांगून ठेवतों. प्रथम पोलि. सासंबंधों माझा विचार कळविण्यास माझा हक्क आहे. या देशांतील चालू कायद्याच्या अनेक ग्रंथांत पोलिसांसंबंधी नियम केले आहेत. व त्यांचा मुख्य पाया हाच दिसतो कीं, त्यांच्या साक्षीवर विश्वास ठेवतां येत नाहीं. कितीएक कोटत तर असा नियम आहे की, पोलिसासमोर कबूल केलेले जाब त्यांतील मजकूरास दुसरा प्रत्यंतरी पुराव इतर मनुष्याने केल्यावांचून पुराव्यांत ग्राह्यच नाहीत. झणजे पोलिसांसमोर झालेले कबुलजाब जात्या पुराव्यांत अग्राह्य आहेत. त्यांजला प्रत्यंतरी पुराव्याची बळकटी असलीच पाहिजे. याजप्रमाणें पार्लमेंटाच्या कितीएक कायद्यांत असे फर्माविले आ- हे की, पोलिसच्या लोकांनी साक्षीदार कोटाकडे जात असतील तर त्यांच्या बरोबर देखील नाऊं नये. कारण पोलिसांचा अंमल साक्षीदारांवर कसा चालतो व ते सा- क्षीदारांची मनें कशी बहकवितात हें न्यायाची कोर्टें व कायदे करणाऱ्या मंडळ्या यां स ठाऊक आहे व त्यांची ते लोक देखील भीति बाळागतात. परंतु असे दिसतें कीं, या बडोदें शहरांत वरील प्रकारचे कायदे व नियम चालतच नाहींत. पोलिसच्या लोकांना मर्यादेनें वागविण्याचा व ते कसे चालतात याजविषयों देखरेख ठेवण्याचा