पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सारजंट बालंटाईनचें भाषण. ( २२७ ) ल्या मनांतूम काढून टाकावा, वही मी सूचना करितों यांजबद्दल मनांत रोष न आणिता ज्या दोषासंबंधी चौकशी करण्यास तुझांस नेमिले आहे त्याच्याविषयीं मात्र तुझीं विचार करावा, व पूर्वीच्या गोष्टी अगदीं मनांत आणूं नये व असे करणे. हें न्यायास अनुसरून होईल व असे कराल तरच तुझ गायकवाडाशी व तुमच्या दै- शाशी न्यायाने वागला असे होईल. कारण असे करणे हे तुमचें कर्तव्य आहे. ह्मणून पूर्वीच्या गोष्टींची आठवण व विचार अगदी मनांत न आाणितां ज्या गोष्टीकडे तुमचें लक्ष पोंचविण्याविषयीं तुझांस व्हाइसराय यांनी फर्माविलें आहे. तिचा मात्र वि- चार करा व आपल्या मनाला पुसा कीं, आरोप लागू झाला आहे का ? हो चौक. शी फार महत्वाची आहे हे सांगावयासच नको. राजकीय परिणाम इचे काय हो.. तील त्याचा विचार करा ह्मणून सुचविणें हे माझे काम नाहीं. या बाबतीत नामदार व्हाइसराय यांनीं जो रस्ता पकडला आहे त्याजवरून मला खचित वाटतें कीं, ते राजकीय परिणामाविषयों केवळ उदासीन आहेत. त्यांच्या कृतीवरून त्यांचा विचार असा दिसतो की, हिंदुस्थान देशांतील राजे यांजवर सचोटीने अमल चालवितां ये- तो असे सुधारलेल्या जगतास दाखवावें व प्रमुख राज्य व त्याच्याशीं विरोध राखणा- री किंवा त्याला काही अंशी नडणारी अशीं जी राज्ये वाटतील त्यांच्यामध्यें ने कांहीं तंटे उपस्थित होतील त्यांचा निकाल सर्व सुधारलेल्या जगास पसंत येईल अशा रीतीने करावा, व असे करण्याकरतां म्हणूनच ही अशी न्यायमंडळी नेमिली आहे, कौं, जि- जविषयीं पूज्यबुद्धि उत्पन्न न होण्यास जागा राहतच नाहीं. पा. न्यायमंडळींपैकी एतदे- शीय राजे लोक यांस त्यांच्या वर्गांपैकी असाम्यांच्या सवयींविषयी माहिती आहेच, त्यांजला कांहीं वेळानें मी या मुकदम्यांतील पुराव्यांपैकी एका गोष्टीसंबधी तुमचा अभिप्राय काय आहे ह्मणून विचारीन व ती गोष्ट प्रथमदर्शनीच अविश्वसनीय आहे असा माझा अभिप्राय आहे तो त्यांचे कडूनच कबूल करविण्यास मी प्रयत्न करीन. त्या राजे लोकांच्या सत्यप्रीतीवर व माहीतगारीवर विश्वास जाऊन जो त्यांजला या प्रसंगी अधिकार व अख्यार दिला गेला आहे तो त्यांनी कसा चालविला त्याज विषयों त्यांना या विस्तीर्ण भरतखंडांत नवाब देणे आहे. या न्यायमंडळींत जे माझे. देशबांधव आहेत त्यांजवळ मजला एवढ़ेंच मागणे आहे कीं, जो आपणास मी इंग्लंड देशांतील सचोटीचा गृहस्थ आहे असे ह्मणवितों तो जसा सदोदित्त निष्पपक्षपातीप णाने आपला अभिप्राय देतो तसा अभिप्राय तुली या वेळी द्या. कमिशनाचा अध्यक्ष कोणासही नेमला असता तरी चालते. परंतु इंग्लंडदेशीय जड्ज आसवा. झणजे बस आहे. कारण इंग्लंड देशीय जडन या शब्दाचाच अर्थ असा आहे कों, तो मनुष्य स्वतंत्र असलाच पाहिजे सत्य सोडून इकडे तिकडे पाहणे किंवा राजाच्या मर्जीस भिऊन चालणे हे त्याच्या स्वप्न देखील वसत नाहीं. आपल्या मनास जो खरा अभि- प्राय वाटेल व ज्याविषयों पूर्ण विचार करून आपली खात्री झाली असेल असाच अभिप्राय तो सांगतो. आपल्या अभिप्रायापासून परिणाम काय घडतील, त्यापासून कोणाचें नुकसान होईल की काय, किंवा कोणाचा फायदा होईल की काय, याचा तो