पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२२६) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. राणी साहेबांचे नामदार प्रतिनिधी (व्हाइसराय) यांनीं जो जाहीरनामा प्रसिद्ध "केला त्याजवरून या चौकशीचा उद्देश मर्यादित आहे असे आपणास कळावण्यांत आलेंच आहे. त्या जाहीरनाम्यांत मुद्दाम फर्माविलें आहे कीं, या चौकशीत बाहेरचे दोष आणूं नयेत. रेसिडेंन्सीतील काही चाकरांशी गैरकायदा गुप्त संबंध ठेवळा की काय, हा एक मुद्दा व जो भारी गुन्हा गायकवाड यांनी केला असा त्यांजवर आरोप आहे तो घडला की नाही, हा दुसरा मुद्दा. हे दोन मुद्दे मात्र आपणापुढे सादर केले आहेत. व या दोन मुद्यांवर मात लक्ष पोंचविण्याचे व त्यांजवर आपला अभिप्राय सांगावयाचे या कमिशनाचें काम आहे, असे आपणास मी सांगण्याचे पूर्वीच सांग. ण्यांत आले आहे. या गोष्टींची मी आपणास आठवण देतों याचे कारण हेच आहे को, ही गोष्ट फारच लक्षांत ठेविली पाहिजे. कारण गायकवाड मल्हारराव यांजवर चोहॉकडून आग पारखढण्यात आली आहे एवढेच नाहीं, तर त्यांजला नानातऱ्हेच्या आरोपाभ्रपटलांनी झांकून टाकले आहे असे मी दाखवून देईन. मल्हाररावांनी पूर्वी काय काय कृत्यें केळीं व त्यांचा पूर्वीचा आयुष्यक्रम कसा होता है शोधण्याचा मला अखत्यार नाहीं व याविषयी माहिती भी शोधली नाहीं व मनला मिळालीही ना- हो; परंतु ग्रंथ वाचनावरून प्रत्येक मनुष्याला अशा राजाविषयी थोडीबहुत माहिती असतेच; त्याजवरून हे राजे लोक लहानाचे मोठे कसे होतात, यांजला खरे स्वातंत्र्य किती असतें, यांचे विचार थोडेबहुत तरी कसे दुसऱ्याच्या शिकवणुकीला अनुसरून असतात, हे सर्वांस ठाऊकच आहे. ह्मणून मी ह्मणतों को, ( व हें माझें ह्मणणे खरें असेल असे मला वाटतें ) महाराज मल्हारराव यांच्या आयुष्याच्या पूर्वभागांत अशा कांहीं तरी दुर्दैवाच्या हकीगतो बनून आल्या कीं, तेणेंकरून ते दुसऱ्याच्या स्वाधीन राहत गेले व तेणेंकरून आपला आपण विचार करून वागण्याचे त्यांजला फारच थोडे प्रसंग आले. याच देशाला ही गोष्ट लागू आहे असे नाहीं; परंतु सर्व पृथ्वी- भर दिसून येत आहे कीं, राजपुत्र व राजे लोक हे सदोदित नीचाहून नीच अशा चाकी घेरलेले असतात:-व हे चाकर लोक त्यांना लुटीत व फसवीत असतात व ठकवीत असतात तरी ही त्यांजवर हे राजे लोक विश्वास ठेवतात, हें भी आप 'णास ध्यानांत ठेवण्यास प्रार्थितों. कारण जी त्यांच्या चाकराने कामे केली अस तील व नी करण्याचे किंवा न करण्याचे त्यांच्या स्वाधीन नसेल तर ती कृयें वि- चारपूर्वक किंवा मनापासून त्यांनीच केली असावी असा आपण उतावळीने निश्चय करूं नये. गायकवाड हा कशा प्रकारच्या मनुष्यांनी घेरला गेला होता, व त्याच्या घरांत कशा प्रकारची मनुष्यें होतीं, ही गोष्ट ध्यानांत आणणे अप्रयोजक आहे असे . आपण मनांत समजूं नये. कारण जी मी ही गोष्ट सांगतो आहे ती सर्वांस ह्मणजे लहानांत व मोठ्यांसही लागू आहे. झणजे जो कोणी मनुष्य आहे त्याला मनुष्यदेह संबंधी विकार व मनुष्यदेहसंबंधी प्रमाणव्यतिरिक्त निश्चय हें लागूनच आहेत. ह्मणू- न मी ह्या कमिशनांतील न्यायाधिशांस विनवणी करितों कीं, मल्हाररावासंबंधी त्यां च्या पूर्वीच्या कृत्यांवरून जो तुह्मांतील कोणी काही ग्रह केला असेल तो तुझीं आप