पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सारजंट बालंटाईनचें भाषण. (२२५ ) एकवेळ माझ्या मनांत येतें. असो; आतां या मुकदम्याचें आपणांसमोर विवेचन आरंभतांना मला माझ्या जबाबदारीचा बोजा इतका भारी वाटत आहे कीं, तेणेंक रून ही हकीकत आपलेपुढे उघडी करून ठेवण्यास जी तर्कशक्ति पाहिजे तितकी माझे आंगीं नाहीं असे मला वाटतें; व हें माझें म्हणणे निगर्वीपणाचा दांभिक डौल घाळण्याकरितां मी म्हणत आहे असे आपण मानू नये. त्या दुःखी राजाविषयीं माझ्या मनांत खचीत फार कम्हवळा उत्पन्न झाला आहे, व हा कम्हवाळूपणा अयोग्य मनुष्याविषयीं झाला आहे अशी किती.. एक पट्टा करितीळ परंतु आपल्या मनांत तसे वागणार नाहीं ही माझी खा ली आहे. कारण त्यांजवरील आलेल्या या प्रसंगांतून त्यांजळा सोडविण्याची जबाब. दारी मी पतकरली आहे; मला असें ही वाटतें कीं, मी एकही शब्द बोललो नाही तरी या मुकदम्याचा निकाल आपण माझ्या इच्छेप्रमाणेच कराळ, झणजे न्याय व स त्य यांचाच आपण पक्ष स्वीकाराल, तरी काही गोष्टींविषयों कदाचित माझ्या हातून कांहीं खुलासा निघेळ झणूनच मी झणतों कीं, या कामाचा माझ्या मनःशक्तीवर फार बोजा आहे. या कोर्टापुढे ज्या दिवशी मी प्रथम आलों त्या दिवसापासून मी पाहतो आहे कीं, आपण केवळ सत्याचाच शोध लावण्याकडे फार बारीक लक्ष पोहचवीत आहां; जेवढी बनेल तेवढी आपणाकडून मजला मदतच होत गेली आहे. कदाचित मजब- र मेहेरबानी होण्याकरितां आपणास कांहीं म्यां तसदीही दिली असेल, परंतु आपल्या कहून मजला माझें काम सुलभ होण्याची मदतच मिळत गेली आहे; तर आतां मी जें भाषण करू इच्छितों त्यांतही मळा सौळभ्य मिळेल. सारांश मी कोर्टात आल्या दिवसापासून मजला कुरकुरण्याचें कांहॉएक कारण घडळेच नाहीं हो एक आनंदा- ची गोष्ट आहे. तरी आतां मी जें बोलेन ते शांतवृत्तीनेच बोलेन. माझ्या समजु तीनें ज्या योग्य तक्रारी दिसतील त्याच मी सांगेन, व माझ्या मनावरचा उसा तुमच्या मनावरही उठळा तर या मुकदम्याच्या निकाळाविषयीं द्वैतभाव राहाणारच ना हाँ, व मजला अशी उमेद आहे की, माझे मनोभाव मी तुमच्या चित्तावर उमटवीन: कदाचित असे खातीचे भाषण बारिस्टराच्या तोंडांतून विरळाच निघत असेल. परं- तु मी खाताने सांगतों कीं, माझे बोलणे ऐकून घेतल्यानंतर आपला ठराव माझ्या म ताच्या विरुद्ध झाला तर मला एवढेच वाटेल कीं, माझें मतंच चुकीचें होतें. माझ्या विचारांत चुकी झाली असेल, कदाचित जे मो सिद्धांत केले त्यांत केवळ माझ्या अंतःकर णाच्या स्थितीमुळे माझ्या चुक्पा झाल्या असतील त्याखेरीज आणखी काही मला वाट. णार नाही. हे ह्मणण्यांत मी न्यायाधिशाचो बेअदबी कारतो असें आपणास वाटू नये अशी माझी मार्थना आहे; कारण माझ्या मनाचे जे खरे उद्गार आहेत तेच मी सांगणार आहे व या मुकदम्याविषयों माझ्या मनावर जो ग्रह झाला आहे तोच मी स्पष्ट रीतीनें तुझांस कळवूं शकलों तर तुमच्याही मनाचा ग्रह माझ्या सारखा होईल अशी माझी समजूत आहे. २६