पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २२४ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. घाणेरड्या व आधाररहित खोट्या गोष्टी वधिःकारास पात्र अशा बनावू काहाण्या यांच्या जमावाशिवाय दुसरे काहीं मला सापडतच नाहीं. चीफ जस्टिस महाराज, हल्लीं हा मुकदमा चालत असतांना दिवसे दिवस जा पुरावा येत गेला त्याचा मी विचार करीत आलो आहे; परंतु अशी असंभाव्य गोष्टींनी भरलली हकीगतासारखी हकीकत आली- कडे कोठेही 'स गितली गेली असेल असे मला आढळले नाही. ही हककित असंगत गोष्टींनी अशी भरली आहे की, ज्या खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या त्यांचा एकमेका शीं मुळींच मिलाफ जमत नाही. यावरून मला असे वाटतें कीं, ज्या चांडाळाही ह्या बिनदिकत खोट्या गोष्टी सांगितल्या त्यांस असे वाटले असावें कीं, इंग्रजसरकारची ज्याजवर इतराजी झारी आहे त्या मनुष्याविषयी आपण आतां कहां जरी बो- लटों तरी तें खरेंच वाटेल, व ह्या आपल्या असंगत गोष्टी ऐकणारे त्या सर्व खऱ्या- च मानतील. जो मोठ्या योग्यतेचा मनुष्य एकदा पडत्या काळांत आला आहे व ज्याचा आतां उर्जितकाळ येईल असे वाटत नाही अशा मनुष्यावर अशीं नासकीं कुली घांवून जातात व त्याच्यावर भुंकतात व आपली लाळ टाकतात; ह्मणजे त्यांना जें वाटेल तें त्याच्या विरुद्ध बहकतात. ही गोष्ट हिंदुस्थानांतच घडत असेल असें नाहीं; सर्वत्र असेच आहे. या मुकदम्याच्या तुलनेस दुसरा मुकदमा मला जरी आढळत नाहीं तरी या मुकदम्यावरून इंग्लंड देशाच्या इतिहासांतील एका प्रसंगा- ची मजला स्मृति होते. ह्यणजे आपल्या देशाच्या इतिहासांत जो एक मोठा दुर्लोकि- काचा मसंग गुदरला होता त्याची मला हटकून या प्रसंगी आठवण येते. ची. ज- स्टिस महाराज, तो प्रसंग असा होता कीं, राजा केवळ अचल होता व रयत अग- दीं खवळून गेली होती. तशा प्रसंगी इनासाफ करणारे जज्ज भ्रष्ट बुद्धीचे होऊन त्या राजाला व रयतेला मदत करीत होते. व अगदीं अविश्वासनीय गोष्टींवर विश्वास ठेवून विचार शक्तीचा उपयोग न करितां जें कोणी काही सांगितलें तें खरें मानून शेकडों अब्रूदार व प्रामाणिक मनुष्यांचा पाठलाग करून त्याना त्यांहीं सुळी दिले. तो प्रसंग कोणता म्हणाल तर ओट्स व डेंजर फील्ड व त्यांचे दुष्ट सांगाती यांनीं अन्यायाची व अनर्थाची गर्दी उडवून दिली होती तो प्रसंग. त्या प्रसंगी इनसाफ करणारे जज्जांस त्या चांडाळ चौकडीनें सांगितलेल्या खोट्या गोष्टी मानणे भा- ग पडलें होतें, कारण त्या जज्जाचें स्वातंत्र्य नाहीं से झाले होतें, कारण ते राजाला ही भीत होते व प्रजेला भीत होते. ह्या देशांत एक मत असे आहे ह्मणून मी ऐकतों कीं, एका कुडींतला प्राण ती कुडी सोडून दुसया कुडींत जातो-ह्मणजे प्राणिमात्रांस जन्मांतर आहे असे कोणी कोणी या देशांतील लोक मानतात. तें जन्मांतरमत खरें असेल तर असे मला वाटतें कीं, वर सांगितलेल्या ओट्स व डेंजर फील्ड् या मनु- प्यांचे प्राणांनीं, योनिभ्रमण करता करतां या मुकदम्यांतील साक्षीदार रावजी व 'नरस प्रभृति चांडाळ यांच्या कुडीत प्रवेश केला असावा. नाहीतर आपणासारख्या अशा विलक्षण व प्रामाणिक न्यायाधिकाऱ्यासमोर ह्या चांडाळांही ज्या असत्य- • प्रतिज्ञापूरित जबान्या दिल्या त्या देण्याची त्यांचा छाती झाली नसती असे