पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सारजंट बालंटाईनचें भाषण. (२२३) वरून त्यांचे रयतेसमोर त्यांची मानखंडना केली आहे; कोणत्या आधारावरून त्यांच्या स्थितीच्या मनुष्यास सख्त कैदीसारख्या दुःखावस्थेत त्यांना टाकले आ • हें आतां समजून आलें आहे. कश। पुराव्यावरून हे आरोप करण्यांत आले आहेत व तो कोणत्या प्रकाराने मिळविला आहे हेही आतां समजून आले आहे. ही फि- र्याद कोणी चालविली आहे हेही आतां समजून चुकले आहे. झणजे हुशार व मनांत किंचितही किंतु न बाळगणाऱ्या अशा पोलिसच्या लोकांनी जितका प्रयत्न करवेल. तितका करून ही फिर्याद चालविली आहे. सारांश या फिर्यादीचा आधार काय, पुरावा काय, व तो पुरावा मजबूत करणारे साक्षी कोण हे सर्व आता आपणास समजन चुकले आहे. असा असंगत व पूर्वापर विरुद्ध पुराव्याचा गोळा-ह्मणजे असंभाव्य किंबहुना अशक्य गोष्ठींचा जथा कोणत्याही काळांत निदानः अर्वाचीन काळांत तर खचितच कधींही इनसाफाच्या कोटीपुढे ठेवला गेला नसेल असे मी चकचकीत 'सांगतो; व माझी पक्की खात्री आहे कीं, या माझ्या ह्मणण्यास कोणताही विचारी व तर्क चालविणारा मनुष्य खंडण करण्यास प्रवृत्त होणार नाहीं. ह्या आरोपाचा पुरावा करण्यास जे साक्षीदार आणले आहेत ते सामान्य प्रतीच्या दुर्लौकिकाचे आ- हेत एवढेच नाहीं, तर ते केवळ निलाजरे, व कोडग बनलेले आहेत असे मी ह्मणतों- व या झणण्यास कोणी बाध आणील अशी मला किंचितही मीति वाटत नाहीं. का- रण, महाराज गायकवाड यांचा बचाव करण्यांत अमक्या साक्षीदाराने कांहीं अंशीं तरी खरी गोष्ट सांगितली आहे असे दाखविण्याचे माझ्या वांटणीस येतच नाहीं. कारण जसा काय प्रत्येक साक्षीदाराच्या तोंडावर खेटेपणाचा ठसाच उमटलेला. दिसत आहे असेच सर्व साक्षीदार या मुकदम्यांत आले आहेत. एकाहून एक जा स्ती कोडगा आहे हेच मात दाखविणे राहिले आहे. ज्यांनी हा पुरावा ऐकला. असल त्यांस दिसून आलेंच असेल कीं, अत्यंत नोचपणाच्या खोट्या प्रतिज्ञांनी हा पुरावा भरला आहे, व तो कोणीही सचोटीचा व अब्रुचा गृहस्थ खरा मानणार ना- हैं. सारांश या पुराव्याच्या जथ्यास व त्याच्या स्वरूपास व साक्षीदारांच्या योग्यतेस तुलनाच नाहीं. या सारखा मुकदमा अर्वाचीन काळांत कोठे घडला असेल असे माझ्या स्मरणात येत नाहीं. या देशांतील न्यायाच्या कोर्टाची मजला माहिती नाहीं, म्हणून मी ह्मणतों कीं, त्या कोर्टात अशा प्रकारचे निलाजरेपणाचे मुकदमे कदा- चित येत असतील; परंतु मजला ज्या कोर्टाची माहिती आहे त्या कार्टात माझ्या उमरींत असा मुकदमा मला कधींच आढळला नाहीं. सारांश या मुकदम्याला किं. चितही मिळता असा मुकदमा माझ्या पाहण्यांत आला नाहीं. म्हणून मजला असे ह्मणणे भाग पडतें कीं, या अभाग्य व दु.खी राजाचे स्वातंत्र्य अशा पुराव्यावरून नाहीसे केले ही एक मोठी अचंब्याची व आश्चर्याची गोष्ट आहे, व तसे करून, आतां ज्यांचे बोलणे त्याजला फारच मर्मभेदक लागेल अशा अती नीच साक्षीदा- रांच्या तोंडून त्यांजवर अतिशयित घाणेरड्या शिव्यांचा भडिमार करविला हे पाहून हो मज़ला फारच अचंबा वाटतो असे म्हणणे भाग पडतें. पुरावा मी शोधतों, पण