पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २८ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. होते ते त्यांस कळत नव्हते, व कोणी कळावेले नव्हते, यांत त्यांजकडे दोष कोणता ? त्यांची सर्व प्रजा त्यांस आपल्या आईबापाप्रमाणे मानीत असे. इतके ते लोकप्रिय होते. चांगल्यांत वाईट आणि वाइटांत चांगले असतेंच, त्याप्रमाणे पूर्वीच्या राज्यकारभाराच्या रीतींत जसे कांहीं दोष होते तसे गुणही होते, त्यांत पंचांच्या विद्यमानें तडजोडीनें निकाल कंरण्याची रीत लोकांस फार सुखावह होती. या योगानें कज्याचा निकाल झटपट होऊन लोक आपल्या धंदे रोजगारास लागत. इंग्रज सरकारच्या राज्यकारभाराची पद्धत फार सुधारलेली आहे, परंतु कोर्टें व अनेक प्रकारचे कायदे करून दिवाणी फिर्यादी संबंधी जो कांहीं घोटाळा केला आहे, आणि दोन्ही पक्षकारांवर जो कोर्टाचा खर्च घातला आहे, तेणेंकरून महाराष्ट्र दश तर अगदर्दी भिकेस लागला आहे. निरनिराळ्या वेळी वेगळे वेगळे का- यदे करून लोकांस सुख करूं पाहतात, पण ती गोष्ट सिद्धीस जात नाही. आमची तर पूर्ण खात्री आहे कीं, पंचांच्या विद्यमाने वादाचे निकाल करावयाची अगदी पुरातन रीत प्रचारांत आणिल्यावांचून प्रजेची स्थिति कधीही सुधारावयाची नाहीं, आणि बडोद्याच्या राज्यांत खंडेराव महाराज याणीं जी सुधारणूक केली त्यांत पंचाच्याद्वारे कज्जाचा निकाल करावयाची रीत अजीबात मोडून टाकली नाहीं, तरी ती समग्रतेने कायम ठेविली नाहीं हें फार वाईट केलें. * खंडेराव महाराज यांच्या अमलांत जुन्या राज्यकारभाराच्या पद्धतीत पुष्कळ फे- रफार झाला. महाल इस्ताव्याने देण्याचें महकूब केले. ऐन मालांतून सरकारचा भाग घेत असत तो चाल बंद करून रोकड घेणे ठरविलें. जमिनीची मोजणी करून प्रतबंदी केली, आणि जमिनीवर धारा बसविला. फौजदारी आणि दिवाणी खात्याच्या दोन शाखा निराळ्या करून त्याजवर एक एक मुख्य अधिकारी नेमला, आणि सर्व तालुक्यांत दिवाणी व फौजदारी कोर्टें स्थापित केली. महालच्या कमाविसदाराच्या अधिकाराची मर्यादा केली, व त्याच्या अधिकाराबाहेरच्या फिर्यादी ऐकण्यासाठी व त्याच्या फैसल्यावर अपील ऐकण्यासाठी निराळी योजना केली. तालुक्यांतील मुख्य फौजदार, फौजदारीचे मुख्य अधिकारी याणी व दिवाणी कोर्टाचा कामदार महालानीहाय सर न्यायाधीश याणी नेमावा असा नियम केला. स्थापित नियमाप्रमाणे काम चालते किंवा नाही याबद्दल चौकशी करण्याकरितां दोन्ही खात्याच्या अधिकाऱ्यानीं आपल्या हाताखाली दुसरे कामदार नेमले असत. त्या काम- दारांच्या तपासांत महालाच्या कामदारांनी काही गैरशिस्त केले असे दिसून आले तर त्याबद्दल त्यांस योग्य शासन करण्यांत येत असे. महाराजानी सेनापतिखातें स्थापित करून फौजेची व्यवस्था फारच उत्तम रीतीची

सर टी. माधवराव यांच्या कारकीर्दीत तर जिकडे पहावें तिकडे कोर्टेच कोर्टे आणि खुर्च्या टेबलें झाली आहेत. त्यापासून लोक भिकेस लागले आहेत असे घडधडीत पाहतात, तरी त्याचे अनुकरण करितातच ! ! !