पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२१८) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास... नीं महाराजांस सांगितल्या नाहीत. डाक्टर सीवर्ड यांची गांठ न पडल्यामुळे त्यां आपण घेतळेळें विषच होते अशा विषयी खाली नव्हती. परंतु दामोदरपंत सांगतो हें खरें आहे तर विषप्रयोग करण्याचा यत्न झाला होता व तो निष्फळ झाला हे महाराजांस पक्के माहित होते; कारण महाराजांनीं रेसिडेन्सींतून परत राजवाड्या क डेस जातांना दामोदरपंतास बरोबर आपल्या गाडीत घेतलें तेव्हां त्याजबरोबर या संबंधी भाषण केले होतें, तें भाषण काय झाले हैं दामोदरपंतच स्वत: सांगे- ल. रेसीडेंटास विषप्रयोग झाला ही बातमी फार वेळ गुप्त राहण्या जोगी नव्हती. ती सर्व शहरभर पसरायाचीच; परंतु है कमिशनास फार आश्चर्यकारक वाटेल की, महाराजांचे भेटीचा दुसऱ्या पाळीचा गुरुवार येई पावेतों महाराजांनी या संबंधीं कर्नल फेर यांस सुचना केली नाहीं व त्या दिवशीं महाराजांनी आपले भाषणांत मात्र हा विषय थोडा आणिला. महाराजांनी लागलीच कर्नल यांस भेटून त्या विषयीं कांही सांगावयांचें होतें, गुरुवार पर्यंत वाट पहावयाचें कारण नव्हतें. त्यांनी आपल्या •भेटीची पाळी येईपर्यंत वाट पाहिली व भेटीचे दिवशीं ह्मणालेकी विषप्रयोगाचा म- जकूर भी आदले दिवशीं म्हणजे बुधवारी ऐकला. भेटीच्या वेळी महाराजांबरोबर तेव्हांचे दिवाण दादाभाई नवरोजी हे होते. व तेवेळीं जरी महाराजांचे व कर्नल 'फेरचे विषप्रयोग करण्याचे प्रयत्नाविषयीं बोलणे झाले तरी त्याविषयीं रीतीप्रमाणें या- दी दोन दिवस म्हणजे ता० १४ नवंबर पर्यंत आली नाहीं. त्या दिवशी खाली लिहिल्या प्रमाणे महाराजांनी दरबारांतून यादी पाठविली. ता० १४ नवंबर १८७४ रोजी संध्याकाळचे पांच वाजून पंचेचाळीस मिनि- दांनी नंबर २०५७ चे दरबारांतून आलेले यादीचें भाषांतर. “परवांचे दिवशीं आपले मेटींत आपल्यास विषप्रयोग करण्याचा प्रयत्न कोणी दुष्ट मनुष्याने केल्याची मजला कच्ची हकीगत समजून फार वाईट वाटले पण त्या दुष्टाचा बेत सिद्धीस गेला नाहीं ही ईश्वराची मोठी कृपा झाली. आपल्यास त्या अपराधाच्या तलासासाठीं कांहीं मदत लागल्यास ती आपल्यास दिली जाईल. हे आपल्यास कळावे. ता० १४ नवंबर १८७४ कर्नल फेर रेसिडेंट यांची सही. या पत्राविषयी मला इतकेच बोलावयाचें आहे कीं, ते इतक्या उशिराने येतें हैं मात्र फार आश्चर्य आहे. मी पुराव्यांतील मुख्य गोष्टींविषयीं जे सांगावयाचें होतें तं सांगितलेले आहे. आतां मी कोर्टाचा जास्त वेळ न घालवितां साक्षीदारांस बोलाव ण्यास एकदम आरंभ करतों. या प्रमाणे स्कोबळ साहेब यांनी आपले भाषण संपविल्यावर साक्षीदारांच्या साक्षी 'घेण्यास सुरूवात झाली. या मुकदम्यांत फिर्यादी तर्फे कमिशनापुढे पुष्कळ साक्षी झाल्या होत्या त्यांत खाळी लिहिलेल्या लोकांच्या साक्षी काय त्या महत्वाच्या होत्या:- १ अमिना अया.