पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्नल फेर यांस विषप्रयोग केल्याबद्दलची चौकशी. (२१७ ) हिशेबांत जेथें साळमचे नांव आलें होतें तेथें शाई ढवळून तें नांव पुसून टाकण्यांत अडाणीपणा केला आहे असें मी दाखवून देईन; व त्याविषयीं कमीशनाच्यानें संशय घेववणार नाही असे मला वाटतें. आणखी त्या हिशेबावरून मी असे दाखवून देईन कीं, हेमचंद यांजपासून भुकटी करण्यासाठी जे हिरे खरेदी घेतले त्याबद्दलचा ऐवज कोणत्या रीतीने त्यास दिला आहे. त्या हिशेबाचा आणि दामोदरपंत यानें सांगि- तलेल्या हकिकतीचा अगदीं जम बसतो आणि ज्यावेळेस दामोदर पंतानी हकिकत सांगितली त्यावेळेस ते हिशेब कांहीं त्याचे ताब्यांत नव्हते त्याने स्मरणानें हकिकत सांगितली आहे. हेमचंद फत्तेचंद यांजला अदमासे तीन हजार रुपये दिले होते. आणि त्याबद्द ल कांहीं उलट ज़माखर्च झाले आहेत त्याविषयी थोडक्यांत सांगतों. त्या हिशेबांत ए क खाजगी खातें होतें व त्यांत कांहीं कसरीच्या रकमा जमा होत्या त्यांतून दोन र कमा हेमचंदास हिऱ्याचे किमतीबद्दल तीन हजार रुपये द्यावयाचे त्या पोटीं दिल्या आहेत. हिऱ्याची पूड करण्यासाठी जे हिरे खरेदी केले त्याबद्दल जव्हेरी यास किं- मत दिली असे दिसून येऊ नये ह्मणून निराळ्या खात्यांतून हिन्यांच्या किमतींचा ऐ वज दिला आहे व खर्चाची बाब निराळी लिहिली आहे, पण तो खर्च झाला नाहीं असें कोर्टास दिसून येईल. कोर्टापुढे साक्ष देण्यासाठीं हेमचंद यांस बोलाविण्यात येईल आणि खरेदी केलेल्या हिऱ्याबद्दलची गोष्ट गुप्त ठेवण्याची खटपट केली त्या- विषयीं तो सांगेल; आणखी त्याच्या वह्यांतील कांहीं पानें फाडून टाकण्याविषयीं त्यां- स सागितलें व त्याने कबूल केले ही गोष्टही तो सांगेल; त्याच्या वह्या कोर्टात रुजू करण्यांत येतील आणि त्याच्या वह्यांत कोणत्या रीतीनें आणि कोणाच्या इच्छेवरून फेरफार केला हें तोच कमीशनास सांगेल. ह्या खटल्यांतील विशेष महत्वाच्या व स्वतः महाराजांस लागू पडणाप्या पुराव्या विषयीं मी आतां बोलतों. महाराज आठवड्यांतून दोनदां सोमवारी व गुरुवारी क र्नल फेर यांस मेटत असत. मीं पूर्वी सांगितलेच आहे कीं विषप्रयोग करण्याचा प्रयत्न ता० ९ नवंबर रोजी झाला व ते दिवशीं सोमवार होता व महाराज नित्या- प्रमाणे त्या दिवशी भेटीस आले होते. कर्नल फेर यांस विषाचे अपाय होत होतेच परंतु पिण्यांत आलेला पदार्थ विषच होता व त्या पासून हे अपाय होत होते असे त्यांस महाराज भेटीस आले ते वेळपर्यंत डाक्टर सीवर्डकडून समजलें नव्हते. महाराजांचे त्यांनीं नित्याप्रमाणे आगत स्वागत केले; व महाराजांनी जेव्हां आपणास काय होत आहे हे अगदी बरोबर सांगितलें व त्याप्रमाणे दुरवणीं गांवांत पुष्कळ आहेत असे बोलून दाखविले तेव्हां त्यांस फार आश्चर्य वाटले. महाराजांनी यांस असेही सांगितले की आपल्या प्रमाणे आजार मला ही पण झाला होता; अशा प्र कारचे भाषण तेच दिवशी व्हावें हे चमत्कारिक आहे. कर्नल फेरनें आपण काय घेतळे आहे हे मल्हाररावास सांगितलें नाहीं; त्यांना आपले गलासांत कांहीं टाकलें आहे इतकें माल वाटले असावे पण ते काय होते याविषयींच्या त्याच्या कल्पना त्यां- २५