पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्नल फेर यस विषप्रयोग केल्याबद्दलची चौकशी. (२१९ ) १ रावजी रामा हवालदार (सरबतांत विष काळवणारा.) १ नरसू राजण्णा जमादार ( रावजीचा साथी.) १ दामोदर त्रिंबक नेने ( महाराजांचा खासगी दिवाण.) १ पेट्र् ( कर्नल फेर यांचा विश्वासक बटलेर.) १ कर्नल फेर ( बडोद्याचे माजी रेसिडेंट.) या मुख्य साक्षीदारांनी काय साक्षी दिल्या त्याविषयीं तपशीलवार हकीगत सां- गण्यांत काही विशेष अर्थ आहे असे वाटत नाही. कारण दामोदर त्रिंबक नेने हा साक्षीदार खेरीज करून बाकींच्या साक्षीदारांनी काय साक्षी दिल्या होत्या तें सूटर साहेबांनीं सर लुईस पेली यांस रिपोर्ट केला त्यांत लिहिले होतें; आणि त्या रिपो- टँ,ताळ तात्पर्य आह्मीं पूर्वी दिले असून त्या साक्षीदारांनी कमिशनापुढे साक्षी दि ल्या त्यांत आणि पूर्वी दिलेल्या साक्षीत कांहीं अंतर पढले आहे किंवा पूर्वी दिलेली साक्षी कोणी ना कबूल केली आहे असा एकही साक्षीदार नाही. आणि सारंजंट बाळेंटाईन यांच्या भाषणांत साक्षीदारांनी काय साक्षी दिल्या आणि त्या पुराव्यास लागू पडतात किंवा नाहीं याविषयों तपशीलवार हकीगत पुन: येईलच. महाराजांस प्रतिबंध केल्यानंतर पोलिसांनी नवा पुरावा मिळावेला त्यांत दामोदर पंत नेने याची साक्ष काय ती महत्वाची होती. यानें फोर्टापुढे महाराजांचे विरुद्ध काय साक्षी दिली हेंही सार्जंट बालंटाइन यांचे भाषणांत येईल. सर्व प्रकारच्या दुष्ट गुणानी ज्यास आपले वसतिस्थान करून ठेविलें होतें त्या मनुष्यानें महाराजांचे विरुद्ध साक्ष दिली कशी याजबद्दल जे लोक साश्चर्य होत्साते दामोदर पंत यास दोष देतात त्या विषयीं मांत्र आह्मास मोठे नवल वाटतें. निमक- हरामीपणा हे पातक इतकें ओंगळ आहे की अतिशय क्रूर अशा राक्षसा पासून ते. घहलें असतां तो देखील त्याबद्दल पापी होईल. मग मनुष्याच्या कृतघ्नतेविषयीं तर बोलणेंच उरत नाहीं हें खरें. पण आपण उपकार कोणावर करावें आणि विश्वास कोणावर ठेवावा ह्या गोष्टी फार विचार पूर्वक करण्या सारिख्या आहेत. जे बेफाम आहेत व ज्यांस मनुष्याची परीक्षा नाहीं त्यांनी सर्पाचें अनुकरण करणारा मनुष्य आपल्या जवळ ठेवून त्याचे पालन पोषण केले आणि त्याजवर पूर्ण विश्वास ठेविला तर तो संधी सापडल्याबरोबर पहिल्याने आपल्या विषयुक्त जिव्हेने आपल्या पालन कर्याचे प्राणवायू भक्षण करण्याचा प्रयत्न करील यांत नवल तें कसच? सर्प आणि दुष्ट यांच्या. दौरात्म्यामध्ये असा लोकोत्तरपणा कोणता असतो कीं त्याबद्दल आपण साश्चर्य व्हावें? दामोदरपंत यांचा अंगीकार करून त्यास पराकाष्ठेचा कृपापाल केला याबद्दल तुझी महाराजांस पाहिजे ते ह्मणा पण बिचाऱ्या दामोदर पंतावर तुमचा एवढा कटाक्ष कां? त्याने त्याच्या कुळाळा, तामसगुणयुक्त स्वाभावाला, त्याच्या शिळाला, आणि यो यतेला जें कांहीं विशेष भूषणीभूत होतें तेंच त्यानें केलें. त्यानें नुसती महाराजांविरुद्ध साक्ष दिली इतकेच नाहीं पण महाराजांची मा.