पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २१६) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. सांत गुंजा पांढरा सोमल होता. दोन पासून तीन गुंजा सोमल पोटांत गेला असता तो मनुष्यास मारण्यास बस आहे असा वैद्य लोकांचा अभिप्राय आहे, आणि ह्याच एका पुडींत सात गुंजा सोमल होता असे मी आपल्यास सांगितलें आहे आता कमीशनास, व जे माझें हे बोलणे ऐकत आहेत त्यांस, समजतच आहे कीं कर्नल फेर साहेबांस ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दलचा आरोप महाराजांवर शाबीत होणे किंवा न होणे हे दामोदरपंत, नरसू व रावजी या तिघांच्या साक्षावर भरवसा किता ठेवावा यांजवर अवलंबून आहे. परंतु या तिघांच्या साक्षी कमिशनांनी एक- ल्यावर कमीशनास ह्यांचें ह्मणणें खरें आहे असे वाटेल. कारण या तिघांचा ही परस्परांशीं कांहीं एक संबंध नसून तिघांनी ही आपल्या जबान्धा स्वतंत्रपणें दिल्या आहेत व तिन्ही जबान्यांचा एकमेकांशी पुष्कळ मेळ पडत आहे. रावजी व दामोदर पंत हे दोघे हो माफीचे साक्षीदार आहत हैं मी कबूल करितो; परंतु न रसू जमादाराचा मात्र तसा प्रकार नाहीं. तुला माफी बिलकुल दिली जाणार नाहीं असे व्यास निक्षुन सांगितल्यावर त्यानें आप खुषीनें व स्वसंतोषानें आपली जबानी लिहून दिली आहे ह्मणून त्याचे साक्षीस ह्या खटल्याचा निर्णय ठरवितांना पुष्कळ महत्व दिले पाहिज. नरसचे संबंधानें दुसरी हा आणखी एक गोष्ट आहे ती ही कीं, तो फार दिवसाचा रोसडेंन्सींत नौकर आहे व पटेवाल्या मध्ये त्याची असा. मी मोठ्या हुद्याची होती. वर सांगितल्याप्रमाणे त्यानें आपली जबानी लिहून दि ल्यावर त्याला आपल्या बेमानपणाची इतकी लाज वाटली की, त्यानें विहिरींत उडी घालून जीव देण्याचा प्रयत्न केला. ही विहीर कमिशनांनी जाऊन पाहिली व ती किती मोठी व खोल आहे याचा विचार केला, ह्मणजे नरसूने आपला जीव देण्याचे हेतूने तींत उडी घातली असें कमिशनास खास वाटेल. आतां रावजी व नरसू यां- नीं सांगितलेल्या हकीकतीचे दामोदरपंताचे जबानीवरून दृढीकरण होतें, एवढेंच नाहीं तर महाराजांच्या खाजगी खर्चाचे हिशेबावरून दामोदरपंताचे जबानीस पु. ष्कळ बळकटी येते. ह्या हिशेब पैकी कित्येक कागद मी कमिशनापुढे आणीन व हे हिशेब तपशीलवार असून वेळच्या वेळीं लिहिले होते असे कमिशनाचें ल क्ष्यांत येईल. यशवंतराव व सालम ह्यांस दिलेल्या रकमा ह्या हिशेबावरून मी शा- बीत करून देईन; इतकेच नाहीं तर आया, नरसू व रावजी ह्यांस ज्या ज्या दिव- शीं देणग्या पोंचावण्यांत आल्या त्याच सुमारास ह्या रकमा यशवंतराव व सालन यांच्या नांवावर पडल्या आहेत. असें मी शाबीत करून देईन. सालम व यशवंतराव यांच्या नांवे पडलेल्या रकमा आणि आया व नरसु वगैरेस दिलेल्या रकमा अगदीं सारख्या नाहींत तरी अगदी जवळ जवळ आहेत आणि म. ला असे वाटतें कीं खर्ची लिहिलेल्या रकमांमध्यें जो तफावत आहे तो कांहीं असंग- त नाहीं. खर्च करणारांनी त्यापैकी काहीं ऐवज आपल्याजवळ ठेविल्यामुळे तफावत पडला आहे. कर्नल फेर यांस विषप्रयोग केल्याबद्दल तपास सुरू झाल्यानंतर ह्या