पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २१४ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास.. Y त्यांनी रोसडेंन्सी सरजन डाक्टर सीवर्ड झांस आपल्यास भेटण्याविषयों चिट्ठी लिहिली व ती डाक्टर साहेबांकडेस नेण्याकरितां महमद नांवाचे शिपायास दिली. डाक्टर सीवर्डसाहेब यांनी आपल्यास काय भावना होतात हे कर्नल फेर साहेबांजवळून ऐकि- ल्यानंतर सरबताचा गलास आपल्याबरोबर घरी घेऊन गेले व गलासांत शेष राहिलेल्या सरबतांत काय पदार्थ आहे याची त्यांनी परिक्षा केली. त्यावरून त्यांस असे दिसून आले की गलासाचे बुडास लागलेला पदार्थ सोमल व हियाची पूड ह्यांचे मिश्रण असावे व आपले स्वतःचे परीक्षेवरून त्यांची खातरी होईना ह्मणून त्यांनी सदहू गलास आंत राहिलेल्या अवशिष्ट सरबतासुद्धां मुंबईसरकारचे केमिकल अनलाईझर डाक्टर ग्रे यांजकडेस मुंबईस पाठविला. व डाक्टर ग्रेसाहेबांचाही अभि प्राय डाक्टर स्त्रीवर्डसाहेबांचे अभिप्रायाप्रमाणेच पडला. योजवरून त्या दिवशींचे सरबतांत विष होतें यांजबद्दल कमिशनास बिलकूल शंका वाटणार नाही असे मला वाटतें. आतां या विषप्रयोगाचे प्रयत्नाशी महाराजांचा व त्यांचे नौकरांचा कोणत्या तऱ्हेनें संबंध आहे हे मी आपल्यास दाखवितों. तारीख ९ नवंबर रोजी सकाळी यशवंतराव व सालम रेसिडेंन्सीच्या बंगल्यांत नेहमींच्या पेक्षा फारच लौकर आले होते असे कमिशनच्या ध्यानात येईल. त्याच- प्रमाणे ते दोघे जण भलया वेळीं रेसिडेंन्सींत आले होते असे सांगणारे साक्षीदार आपल्या पुढे येतील; त्या साक्षीदारांपैकी एकानें या दोघांस इतक्या लौकर येण्याचे कारण काय असे विचारता त्यांनी दिवाळीचा सण असल्यामुळे आह्मी फळफळा-- वळीची भेट घेऊन आलो आहोत असें सागितलें. परंतु ही त्यांची सबब अगदीं खोटी होती, असे आपल्यास समजून येईल; कारण वस्तुत: पहातां ते दोघेजण रे- सिडेन्सींत येऊन पोहोचल्यावर पुढें पुष्कळ वेळानें फळफळावळ येऊन दाखल झाली. ही फळावळ सुमारे ८॥ वाजतां आली असून हे दोघे मात्र रेसिडेन्सीचे बं गल्यावर ६ वाजण्याचे सुमारास दाखल झाले. महमद नांवाच्या शिपायाच्या हातीं डाक्टर सीवर्ड साहेबांकडे कर्नल फेर साहेबांनीं एक चिठी पाठविल्याचे मी वर स.गितलेंच आहे. महंमद चिठी वेऊन निघतो न निघतो तोच त्याला सालमने गांठलें; व शहरांत जाऊन मजकरिता कांहीं बिस्कीटें विकत आण असे त्यास सांगि- तळें. त्याप्रमाणे करण्याचे पटेवाल्यानें कबूल केले परंतु पहिल्याने डाक्टर सीवर्ड सा. : हेबांस चिठी देऊन मग तो शहरांत गेला. आतां महंमद शिपाई शहारांत गेला तो खरोखरीच बिस्कीटें विकत घेण्याकरितां गेला किंवा रेसिडेन्सीत घडून आलेल्या गोष्टीची माहिती देण्याकरितां गेला पाजविषयीं कमिशनरांनींच विचार करावा. त्याचप्रमाणे कर्नल फेर साहेबांनी सरबताचे दोन चार घोट घेऊन ग्लास टेबलावर ठेविल्या नंतर व त्याची चिठी घेऊन महंमद शिपाई डाक्टर सीवर्ड साहेबांकडे गेल्या नंतर यशवंतराव आपला घोडा अतिवेगानें दौडत रावजी व जगा शहरांत ज्या ठिकाणी राहत होते तेथे गेला. ही गोष्ट पुराव्यानिशीं आपल्या पुढे शाबीद करण्यात येईल. सदहू ठिकाणी यशवंतराव पोहोचल्यावर त्याने काय केले हे मीं